COVID19 च्या नावानं बो बो बो बो
आयनाच्या बायना
करोना काय जायना
कायप्पाच्या भात्यातले
रामबाणबी चालंना
लसूण झाली कापूर झाला
गोमूत्रानंबी हटंना
एक एक करत
देश गिळतोय
तोडगा काय सापडंना
वेट मार्केटी जलमला ह्यो
शेअर मार्केटला सोडंना
चिनी माल तकलादू पन
ह्यो माल तुटता तुटंना
आयनाच्या बायना
करोना काय जायना