वळण
गुलमोहरांच्या आपल्या त्या
कावळ्या चिमण्यांच्या
ओट्यावर.
काल तु म्हणालीस 'वाट बघ'
आता आपलं कसं म्हणून
पुस्तकांची पानं उचकत
आतल्या आत गोठून गेलो
एका पानावर,
मोगर्याच्या वेलीशी,
फांदी सोडून घेतेय
आपले हात.
दारातून दिसतेय मला,
आयुष्याचा हिशेब
बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी,
आणि हळद लावून बसलेली
भेदरलेली नवरी.
शहरापासून मरणा अगोदर
कोण पोहोचतो, म्हणुन.
भूके कंगालांचे तांडे
सरकताहेत हळू हळू
गावांकडे.