मंदीत संधी

रानरेडा's picture
रानरेडा in जनातलं, मनातलं
20 Aug 2019 - 12:35 pm

मंदीत संधी
लेखक हेमंत वाघे.

मी दुबईला जंबो इलेक्ट्रोनिक्स म्हणून कंपनीत काम केले होते . हि मनु छाब्रिया म्हणून एक अत्यंत श्रुड आणि धाडसी माणसा ने स्थापन केलेली कंपनी होती ,( मी होतो तेंव्हा तो मेला होता ) हा मनु कर चुकवून दुबईला पळाला होता व तिकडून तो त्याच्या भारतातील काही कंपनी चालवायचा ! ( तो दुबई मध्येच मेला ) त्याची एकदा एका अति सिनिअर स्टाफ ने त्याची गोष्ट सांगितली होती .

शिक्षणमाहिती

द सियालकोट सागा

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
20 Aug 2019 - 11:40 am

असतो मा सद्‌गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मामृतम् गमय

बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28

म्हणजेच
मला असत्याकडून सत्याकडे ने
अंधाराकडून प्रकाशाकडे ने
मृत्यूकडून अमरत्वाकडे ने

मांडणीवाङ्मयकथाप्रकटनविचारप्रतिक्रियाआस्वादलेखशिफारससल्लामाहिती

.. शी मस्ट बी राइट !

उन्मेष दिक्षीत's picture
उन्मेष दिक्षीत in जनातलं, मनातलं
19 Aug 2019 - 10:49 pm

शनिवार रात्र
स्थळ :- घर (आमचं)
.....
ती : नाही! मी चालले आहे झोपायला, तुझं संपलं की ये.
मी : थांब की. ११ वाजलेत फक्त
ती : .......
मी : ओके, जा
------------------------------------------------------------
साधारण १५ मिनिटांनी,
मी (डिश हातात) : श्रद्धा ss.. !?
ती : काय ?
मीठ कुठाय ? मिळत नाही आहे ! .... , इकडं ये जरा..
ती आली.
मी : थांब जरा, तुला आता डेमो दाखवतो, दर वेळी नेमकं काय होतंय वस्तू शोधताना ते बघ आता (आमच्या श्रद्धाचा वस्तूंच्या जागा बदलत राहणे हा एक छंद म्हणा, किंवा "स्थायी" भाव म्हणा, तो आहे )

विनोदप्रकटन

देवघर

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
19 Aug 2019 - 9:33 pm

देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला
पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला

दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला
बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला

देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते
त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते

समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती
मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती

हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो
मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो....

-शिवकन्या

कविता माझीकालगंगामाझी कवितावृत्तबद्ध कवितासांत्वनाकरुणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकवितासाहित्यिकसमाजजीवनमान

*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?* (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - दोन.

सुनिल प्रसादे's picture
सुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं
19 Aug 2019 - 8:38 pm

*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?*
(Beyond the 'Rainwater Harvesting')

भाग - दोन.
--------------
जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन
-------------------------------------------------------------

समाजप्रकटनविचारलेखमाहिती

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३४

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
19 Aug 2019 - 6:55 pm

"प्रणाम द्रोणाचार्य."
"प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?"
"तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते."
"हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?"
"का नसेन, द्रोणाचार्य?"
"कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही."
"म्हणजे?"
"दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.a

इतिहासलेख

टारंटिनो

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
19 Aug 2019 - 8:26 am

वर्षातून एकदा येणाऱ्या एखाद्या उत्सवाची किंवा घटनेची आपण जशी आतुरतेने वाट बघतो तसा वार्षिक ऑस्कर सोहळा म्हणजे माझा एक राखून ठेवलेला दिवस, मग ते बघणे, त्यात कोणते चित्रपट आपले राहून गेले वैगरे आढावा घेणे असा वर्षानुवर्षे चालेल प्रघात, हे नमूद करण्याचे कारण असे कि उत्तम चित्रपट ( कोणत्याही भाषेतील) हा एक छंद आणि आवड असणाऱ्यामाझयासारख्याची जेव्हा घनघोर निराशा होते एखाद्या चित्रपटाकडून तेव्हा किती लागेल हे कळावे म्हणून...
असो

सेक्रेड गेम्स २

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
18 Aug 2019 - 6:23 pm

लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल.

या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले.

नाट्यधर्ममुक्तकप्रकटनविचारप्रतिक्रियाआस्वादलेख