पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
25 Aug 2019 - 3:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.

मोदींना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रिय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही महत्वाचे असे आहेत :

१. Order of Zayed, २०१९ : संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार.

२, Order of St Andrew the Apostle, २०१९ : रशियाचा सर्वोच्च व १६९८ सालापासून आस्तित्वात असलेला सर्वात जुना सन्मान.

३. Seoul Peace Prize, २०१८ : दक्षिण कोरिया.

राजकारणबातमी

जन्माष्टमी२.*

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जे न देखे रवी...
25 Aug 2019 - 3:28 pm

कृष्णाच्या नांवे जो होतो आजकाल दहीहंडीचा खेळ
तो खेळण्या, पाहण्या सगळ्यांनाच असतो अमाप वेळ
पुन्हा पुन्हा जे कष्टतात, गोविंदांचे थर रचण्या
अनेक पाठीराखे, सम्राट असतात हजर त्यांचे प्रयत्न पाहण्या

खेळकऱ्याना वाटते, अरे वा, आज आपल्याला बराच मिळाला भत्ता
सम्राटांना वाटते, चला, आणखी काही काळ राहायला हवी सत्ता
जिथे कुठे मारता आला डल्ला, त्यातलाच थोडा लुटवा आज खेळावर
खेळाडूंना होऊ दे खूष, दिसू दे जोरदार जोश, होऊ दे जोरदार कल्ला

मांडणी

दुनिया

तमराज किल्विष's picture
तमराज किल्विष in जनातलं, मनातलं
25 Aug 2019 - 8:57 am

माझी आजी नेहमी अनेक म्हणी रोजच्या बोलण्यात सहजच बोलून जायची. " दुन्या ही दिल्या घेतल्या ची आहे " , "उसनं मांडं नी उसनं दांडं ", "दिलं तर गोड नाहीतर दोड" अश्या अनेक म्हणी आपोआप तिच्या बोलण्यात यायच्या. लहानपणी मला तिच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ लागायचा नाही.

समाजप्रकटन

पत्राद्वारे दासबोध अभ्यास उपक्रम - चाळीशीत

विटेकर's picture
विटेकर in जनातलं, मनातलं
25 Aug 2019 - 6:48 am

घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे सकळ जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा. वा. केळकर व गीताताई  केळकर यांनी  "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" हा  उपक्रम सुरू केला. कितीतरी उपक्रम येतात व जातात, नंतर त्यांची आठवणही नसते . पण पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम निरंतर राहिला व सातत्याने वाढला. *क्रिया करून करवावी* या समर्थ उक्तीप्रमाणे ती.

धर्मप्रकटन

पत्राद्वारे दासबोध अभ्यास उपक्रम - चाळीशीत

विटेकर's picture
विटेकर in जनातलं, मनातलं
25 Aug 2019 - 6:47 am

घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे सकळ जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा. वा. केळकर व गीताताई  केळकर यांनी  "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" हा  उपक्रम सुरू केला. कितीतरी उपक्रम येतात व जातात, नंतर त्यांची आठवणही नसते . पण पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम निरंतर राहिला व सातत्याने वाढला. *क्रिया करून करवावी* या समर्थ उक्तीप्रमाणे ती.

धर्मप्रकटन

वर्तुळ......

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
24 Aug 2019 - 4:44 pm

हजारो वर्षांची संस्क्रुती असलेल्या आपल्या भारतात कर्तबगार स्त्रीयांची वानवा कधीच नव्हती. पुराणकाळात ज्यांनी वेद्याध्ययन केले अशा गार्गी आणि मैत्रेयी आणि गणीत शिकणारी लिलावती तसेच द्रौपदी तारा मंदोदरी अहिल्या सीता या पंचकन्या अशी फार जरी नसली तरी उदाहरणे आहेत. राज्यकारभाराचे धडे देवून एक आदर्श राजा घडवणार्‍या जिजाऊसाहेब, लढवय्यी झाशीची राणी , गोरगरीबांचे जीवन सुकर करणार्‍या अहिल्या देवी होळकर , या स्त्रीयांनी एक इतिहास घडवला.

संस्कृतीविचार

नेनचिम - विज्ञान कादंबरी

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
24 Aug 2019 - 2:13 pm

नारायण धारपांच्या " नेनचिम " ही विज्ञान काल्पनिका कादंबरीत अतिप्राचीन काळात चंद्रावर मनुष्यसदृश्य जातीची वसाहत होती अशा विषयावर आधारित आहे ... त्या जातीची खूप वैज्ञानिक प्रगतीही झाली होती .. त्यातच त्यांचा ग्रह कालांतराने जीवनासाठी अयोग्य होणार , सर्व जीवित नष्ट होणार असा शोध तिथल्या शास्त्रज्ञांना लागतो आणि तिथे हलकल्लोळ माजतो ... हळूहळू परिस्थिती नियंत्रणाखाली येते आणि या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी एक मोठी शास्त्रज्ञांची संघटना उभारली जाते ... वसतीयोग्य असा दुसरा ग्रह शोधणं त्यांना शक्य होत नाही ...

वाङ्मयकथाप्रकटन

सहजच..

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
24 Aug 2019 - 11:26 am

कधीतरी असं वाटतं ना की एखादं आपलं आवडत गाणं ऐकाव .आठवतं अचानक आणी ऐकायची इच्छा होते.मग लगेच एखाद्या म्युझिक ॲप मधुन ते शोधुन ऐकतोही आपण.पण तेवढी मजा नाही येत.एक फक्त इच्छा झालीये आणी ती पुर्ण करणं लगेच शक्य आहे म्हणून असेल कदाचित् पण नाही येत मजा .आणी मन कोरडंच रहातं.

मानसिक अस्वास्थ्य असेल ,विमनस्क अवस्थेत बाहेर पडतो एखाद्या चहाच्या टपरीवर सिगरेट पेटवतोय समोर चाच्याने चहा आणून ठेवलाय.आणी अचानक fm वर तेच गाणं लागलं तर ..मुड झकास होउन जातो.हे छोट्या आयुष्यातलं छोटसं सरप्राइज असतं .

मुक्तकआस्वाद

सूर

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
24 Aug 2019 - 11:02 am

सूर
अष्टमीच्या अंधाऱ्या रात्री कारागृहात जन्मलेल्या बाळाला डोईवरल्या टोपलीत टाकून वसुदेवानं यमुना पार केली आणि गोकुळातल्या नंदाच्या राजवाड्यात यशोदेच्या झोळीत आपलं बाळ टाकून डोळे पुसत त्या बालिकेला घेऊन तो कारागृहात परतला.

संस्कृतीप्रकटन