असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मामृतम् गमय
बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28
म्हणजेच
मला असत्याकडून सत्याकडे ने
अंधाराकडून प्रकाशाकडे ने
मृत्यूकडून अमरत्वाकडे ने
अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात. कोलकात्यातील व्यापारी कमी शेयर ब्रोकर अरविंद बगाडिया आणि मुंबईचा नावारूपास येत असलेला डॉन टर्न राजकारणी अरबाज शेख यांच्या तीन पिढ्यांच्या पॉवर गेम ची हि गोष्ट म्हणजे 'सियालकोट सागा'. १९४७ साली सुरु झालेली गोष्ट पुढच्या ६० वर्षातल्या महत्वाच्या घटनांना ओझरता स्पर्श करून जाते. या बरोबरच स्टॉक मार्केट, शेल कंपन्याची उलाढाल असं बरंच काही वाचायला मिळतं. बऱ्याच राजकीय नेत्यांचे त्यांच्या घोटाळ्यांचे उघड उघड उल्लेख पण आहेत, त्यामुळे आपण कथेसोबत बऱ्यापैकी रिलेट होतो. एवढं सगळं असूनही फारसा ट्विस्ट नसल्यमुळे कथा बरीचशी अंदाज बांधण्याजोगी झालेली आहे. तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं. पण ते का आहे याचा उलगाडा उपसंहारात केलाय.
अगदी थोडक्यात सांगायचं तर पुस्तक अगदी एकदा वाचण्याजोगं असलेलं आहे.

वाचने
5562
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला रिव्यू!
तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये
तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये
दा विंची कोड कित्येक पटीने
In reply to तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये by कानडाऊ योगेशु
हो. दा विंची मध्ये इतिहास हा
In reply to दा विंची कोड कित्येक पटीने by महासंग्राम
मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही
शोध बद्दल सहमत.
In reply to मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही by राजाभाउ
शोध बद्दल सहमत त्यात रहस्य
In reply to मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही by राजाभाउ