समीक्षा
तेंडुलकर अजूनही अ-जून !
शालेय वयात असताना पेपरांत मनोरंजनाच्या पानावरती विजय तेंडुलकर लिखित ‘शांतता ! कोर्ट चालू आहे’ या नाटकाची जाहिरात नेहमी दिसायची. जाहिरातीची रचना आणि या वैशिष्ट्यपूर्ण नावावरून त्याबद्दल खूप उत्सुकता वाटायची. पुढे कॉलेज जीवनातही अधूनमधून ती जाहिरात पाहिली. पण ते नाटक काही पाहणे झाले नाही. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केलेले ‘घाशीराम कोतवाल’ पाहिले होते. सन 2000 च्या सुमारास टीव्हीवर तेंडूलकरांच्या नाटकांवर आधारित काही कार्यक्रम पाहण्यात आले. तेव्हा त्या चर्चांमधील दिग्गजांनी ‘शांतता’चा आवर्जून विशेष उल्लेख केलेला आढळला. दरम्यान ‘तें’ ची काही मोजकी पुस्तके मी वाचली.
अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण
काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या.
आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.)
एका विटीत दोन कोल्या..
- डॉ. सुधीर रा. देवरे
पुस्तक परिचय अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -
अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -
समापन
पुस्तक परिचय भाग ३ - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर
भाग 3 आग्रऱ्याहून सुटका
लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९
शिवाजी महाराज कसे निसटले ?
पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर
पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका
पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र
नव्या प्रमेयाप्रमाणे -
पुस्तक परिचय भाग १ - आग्रऱ्याहून सुटका - जुन्या धाग्यात न दिसणारे काही फोटो , लेखक डॉ. अजित जोशींचा फोटो, मो. क्र, घालून पुनर्प्रकाशित करत आहे.
शिवरायांचा आठवावा प्रताप !
शिवाजी रायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित
आग्रऱ्याहून सुटका
- पुस्तकाचा परिचय करून देत आहे. जुन्या धाग्यात न दिसणारे काही फोटो , लेखक डॉ. अजित जोशींचा फोटो, मो. क्र, घालून पुनर्प्रकाशित करत आहे.
गोव्याचा इतिहास भाग -२ ( शिवोत्तर काल )
संभाजी राजांचा उदय
'सातपाटील कुलवृत्तांत': इतिहासासोबतच्या निरंतर वाटाघाटी
(पूर्वप्रकाशन: शब्दालय 2020 दिवाळी अंक. मिपावर टाकताना काही मामुली फेरबदल केले आहेत)
मी बहुतकरून महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असतो. मराठी साहित्य हा आवडीचा विषय असला तरी नवे लेखक, नवी पुस्तके याबद्दल अद्ययावत माहिती त्वरित मिळत नाही. आंतरजाल व समाजमाध्यमे यामुळे काही प्रमाणात ही समस्या सुलभ झाली आहे असे म्हटले तरी प्रादेशिक भाषांतील पुस्तके ठेवणाऱ्या वाचनालयांचा भारतात अभावच आहे. (सर्व मराठी पुस्तके स्वतः विकत घेऊन वाचणे शक्य नसते).