Skip to main content

रंग रंग तू, रंगिलासी

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 12/05/2020 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
रंग रंग तू, रंगिलासी दंग दंग तू, दंगलासी भंग भंग तू, भंगलासी वेड्यापिश्या रे जिवा जाशी उगा जीवाशी अव्यक्त बोल रे तुझे शब्दांचे झाले तुला ओझे का धावीशी उगा तू रे कुणी नाही वेड्या रे तुझे तो सूर्य देई एकला शक्ती समिंदराची ओहोटीभरती आकाश झेलते तारे मग का हवे रे , तुला सारे ? का जन्म घेतलासी ? हा डाव साधलासी रंगात रंगुनिया साऱ्या संसार मांडलासी गती मंद होत तुझी जाईल मग हार गळ्याशी येईल अग्नीत दग्ध होई सारे आला तसाच रिता जाशील ऐक साद अंतरात्म्याची शमेल खाज त्या बुडाची घे नाम त्या शिवाचे लाभेल गती तुला मोक्षाची ======================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचने 3584
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया