आरोग्य

दोघांत 'तिसरा' : एक मुलायम स्पर्शक

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
28 May 2023 - 5:11 pm

स्त्री-पुरुषांच्या कामक्रीडेतील सुखाची सर्वोच्च पातळी म्हणजे संभोग. ही क्रिया संबंधित जोडप्याला सुख देण्याबरोबरच मानवी पुनरुत्पादनाशीही जोडलेली आहे. सुयोग्य काळात केलेल्या संभोगातून स्त्री-बीजांडाचे फलन होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. जेव्हा एखाद्या जोडप्याला नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती नको असते त्या काळात विविध गर्भनिरोधक साधनांचा वापर केला जातो. या प्रकारची साधने पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

जीवनमानआरोग्य

हवाईजन्मांच्या अघटित घटना !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
7 Mar 2023 - 11:53 am

गरोदरपणाच्या अखेरच्या महिन्यातील वाहनप्रवास हा एक संवेदनशील विषय आहे. सर्वसाधारणपणे मानवी गरोदरपणाची कालमर्यादा 40 आठवडे मानली जाते. परंतु, “नववा लागल्यानंतर काही खरं नसतं!”, हा पूर्वापार चालत आलेला आजीबाईंचा सल्ला देखील दुर्लक्ष करण्याजोगा नसतो. एखाद्या गरोदर स्त्रीला डॉक्टरांनी व्यवस्थित काढून दिलेली “तारीख” दरवेळेस अचूक ठरतेच असे नाही. कित्येकदा अपेक्षेपेक्षा बऱ्याच लवकरही प्रसूतीवेदना चालू होतात. कधी कधी या वेदनांचा प्रारंभ आणि बाळाचा जन्म या घटना आश्चर्यकारक वेगाने घडतात. अशा प्रकारे नको तिथे बाळंत होण्याचे काही प्रसंग आपण अधूनमधून ऐकतो.

जीवनमानआरोग्य

Chatbot : डॉक्टर व रुग्णांचा संवादी यंत्रमित्र ?

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
20 Feb 2023 - 12:50 pm

गेले काही महिने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या Chatbot या नव्या अवतारामुळे तंत्रजगतात धुमशान चालू आहे. एका संगणक उद्योगाने त्यांची संबंधित प्रणाली बाजारात आणली. त्यानंतर थोड्याच काळात अन्य बलाढ्य उद्योगाने पण या क्षेत्रात उडी घेतली आणि त्याच तोलामोलाचा किंबहुना अधिक सरस नवा अवतार आपण तयार करणार असल्याचे जाहीर केले. सध्या बऱ्याच जणांनी कुतूहलापोटी ही यंत्रणा वापरून पाहिली आहे. त्या अनुभवातून बऱ्याच जणांचे असे मत झाले आहे, की ही यंत्रणा सध्या बाल्यावस्थेत आहे. कालौघात जसा जसा अधिकाधिक अनुभवसंपन्न विदा या यंत्रणेमध्ये भरला जाईल त्यानुसार ती अधिक उपयुक्त आणि विश्वासार्ह ठरेल.

तंत्रआरोग्य

जन्मजात दुखणे येता (३) : ओठ व टाळू

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
28 Dec 2022 - 5:29 pm

भाग २ इथे

गर्भावस्थेच्या चौथ्या ते सातव्या आठवड्यादरम्यान ओठ तयार होतात. किंबहुना या काळातच खऱ्या अर्थाने चेहरा तयार होत असतो. ही प्रक्रिया होत असताना जर संबंधित पेशीसंयोगात काही बिघाड झाले तर बाळाचा वरचा ओठ दुभंगलेला राहतो. ओठाला पडलेली फट काही वेळेस छोटी असते तर अन्य काही वेळेस ती मोठी होऊन थेट नाकात घुसलेली असते. ह्या प्रकारचे दुभंगणे शरीराच्या एका किंवा दोन्ही बाजूंनाही असू शकते. अगदी बरोबर मध्यभागी असणारी फट तशी दुर्मिळ आहे.

विज्ञानआरोग्य

जन्मजात दुखणे येता (2) : हात व पाय

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Dec 2022 - 9:49 pm

भाग-1 इथे :
…………….

या भागापासून जन्मजात शारीरिक दोषांची शरीरभागानुसार उदा. पाहू. या भागात हात व पायाच्या अशा दोषांचे विवेचन करतो. हे दोष मुख्यतः तीन प्रकारचे आहेत:

१. हात किंवा पायाचा पूर्ण अभाव अथवा खुरटलेली वाढ. या दोषांचे प्रमाण दर 10,000 जन्मांमध्ये ८ इतके आहे. पायांच्या तुलनेत हातांचे दोष अधिक प्रमाणात दिसतात. खालील प्रकारचे दोष बऱ्यापैकी आढळतात :
• Forearm मध्ये रेडियस हे हाड नसणे.
• गुडघा ते घोटा या पायाच्या भागातील fibula हे हाड नसणे.

जीवनमानआरोग्य

अस्वस्थ मनाचा ‘ताप’

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
22 Nov 2022 - 9:55 am

ताप येणे हे बऱ्याच आजारांचे प्राथमिक व महत्त्वाचे लक्षण असते. शरीराचे तापमान नियंत्रण आणि ताप येण्याची मूलभूत प्रक्रिया आपण यापूर्वी “गरम आणि ‘ताप’दायक” या लेखात समजावून घेतली आहे.
त्या लेखात संसर्गजन्य आणि अन्य शारीरिक आजारांमध्ये येणाऱ्या तापाचे विवेचन आहे. परंतु त्या व्यतिरिक्त, मानसिक बिघाड हे सुद्धा ताप येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. या प्रकारचा ताप वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यासंबंधी स्वतंत्रपणे काही लिहावे अशी सूचना एका वाचकांनी नुकतीच केली. त्यानुसार हा लघुलेख लिहीत आहे.

जीवनमानआरोग्य

मानवी कामजीवन:प्रश्न आणि उत्तर

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
29 Sep 2022 - 8:52 am

कामजीवनावर डॉक्टरांची विविध मते असतात. नेमके कोणते सत्य मानावे ?

विविध मते ही सर्वच विषयांत असतात. कामशास्त्रात आधुनिक व जुन्या काळातील असे प्रकार जर म्हटले तर संशोधनातून नवीन जे समजले ते सत्य मानावे. धर्म, संस्कृतीच्या पगड्याने कामजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. डॉक्टर जर खूप धार्मिक असेल तर तो विज्ञान सांगण्यापेक्षा संस्कृती रक्षणाच्या नावाखाली खोटे सांगू शकतो व तसे काही डॉक्टर बिनधास्त सांगतातही. कामजीवनातल्या प्रत्येक क्रिया, पद्धतीमागे विशिष्ट वैज्ञानिक कारण असते. ते तुम्हाला समजले तर तुम्ही तो 'सेक्स' प्रकार बिनधास्त करावा.

आरोग्यलेखसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्य

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
28 Sep 2022 - 9:19 am

स्त्रियांना गुदमैथुन आवडते का ? त्यातून कोणते आजार होतात का?

भारतासहित काही देशात याला विकृत मानले गेले आहे. तरी दोघांच्या इच्छेने कोणताही आजार पसरत नसेल अशी खबरदारी घेऊन जर कोणी त्याचा आनंद त्यांच्या खाजगी आयुष्यात घेत असेल तर त्याला तिसरा कोणताही व्यक्ती विरोध करु शकत नाही. स्त्रीयांना गुदमैथुन आवडते असे नाही. यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पुरूषांनाही फार आवडते असेही नाही.

औषधोपचारविज्ञानशिक्षणलेखसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्य