चैतराम पवारांना पद्म श्री: एक खूप मोठा क्षण!
नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे.