मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

मनिष ·

मनिष Wed, 11/28/2007 - 02:25
जमल्यास "कैफी आज़मी" ह्यांच्याविषयी लिहिण्याचीही इच्छा आहे, शिवाय अदिम हाश्मी यांच्या "फासलें ऐसे भी होंगे..." ह्याविषयीही लिहायचा प्रयत्न करेन. प्रतिसाद अवश्य लिहा! (उर्दूप्रेमी) मनिष

In reply to by मनिष

धोंडोपंत Fri, 11/30/2007 - 10:32
मनिषराव, अवश्य लिहा. त्याचप्रमाणे मीर तक़ी मीर च्या शायरीबद्दल ही लिहा असे आमचे सांगणे आहे. कारण उर्दू शायरीचा हा बादशहा अनेकांना अपरिचित आहे. ग़ालिबसारखा शायरही मीर बद्दल लिहून गेलाय की रेख़्ते के तुम ही उस्ताद नहीं हो 'ग़ालिब' कहते है अगले ज़माने मे़ कोई 'मीर' भी था.... क्या बात कही है ग़ालिबने? ग़ालिब सारखा माणूस मीरबद्दल हे उद्गार काढतो...सही.. ग़ालिबने मीर च्या काव्याला दिलेले हे सर्टिफिकेट कुठल्याही ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा मोठे आहे. आपला, (मीरप्रेमी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्किट Wed, 11/28/2007 - 02:47
मावळतीच्या सूर्याने जाता जाता कृष्ण्वसना संध्येच्या अंगावर क्षितिजाच्या तबकातील लाल फुले उधळली. आकाशगंगानी आपले सोन्याचे अलंकार तिच्यावर चढवले आणि निसर्गाने आपले चांदीचे दागिने (पांढरशुभ्र सुर्यप्रकाश) उतरवूने ठेवले. ओ हो हो ! काय सुंदर वर्णन आहे ! असलेलं मोडून त्या जागी नवीन निर्माण होणे, अशा अविरत बदलातूनच हे जग घडलेले आहे, आणि म्हणूनच ज्याचा ‍र्‍हास होत जातो (जे नाशवंत असते), ते सुंदर असते. क्लास ! आजानुकर्णाचे मतपरिवर्तन लवकाराच होईल असे दिसते. - (कलिजा खलास) सर्किट ता.क. स्वतःचे नाव आपण "दीवाना-ए-मानिष असे लिहिले आहे. म्हणजे मनिषचा दीवाना, असा अर्थ होतो ना ? आपल्याला दीवाना-ए-इक्बाल लिहायचे होते का ?

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मनिष Wed, 11/28/2007 - 03:01
ता.क. स्वतःचे नाव आपण "दीवाना-ए-मानिष असे लिहिले आहे. म्हणजे मनिषचा दीवाना, असा अर्थ होतो ना ? आपल्याला दीवाना-ए-इक्बाल लिहायचे होते का ? हो, चुकलंच. आता - "मनिष दिवाना" करतो! :)

आवडाबाई गुरुवार, 11/29/2007 - 21:37
दीवाना-ए-मानिष ह्यावरून एका अलीकडेच अत्यंत गाजलेल्या एका गाण्यामधील गंमत आठवली ऐ मेरी मेरी मेरी जोहराजबीं (गायक-हिमेश रेशमिया ; गीतकार-समीर ; चित्रपट-फिर हेराफेरी) ह्याची पुढचीच ओळ "फुर्कत-ए-गम मिटा जा" अशी आहे. येथे विरहाचे दु:ख असा अर्थ अभिप्रेत असावा, त्यामुळे तो गम-ए-फुर्कत असायला हवा (असा माझा कयास, बरोबर आहे ना?).

In reply to by आवडाबाई

धनंजय गुरुवार, 11/29/2007 - 22:05
काय धमाल गाणे आहे ते! पण समीर यांचा शब्दप्रयोग ठीक असावा. इदाफ्याचे नियम (म्हणजे अमुक--तमुक--ढमुक) चे नियम मला अजून नीट कळले नाही, म्हणून भाष्य करायला कचरतो. पण इदाफ्यात (असले तर) विशेषण शेवटी येते याची नोंद घेतली पाहिजे. म्हणजे "मजनूच्या लैलेचे सुंदर स्मित" = "तबस्सुम-ए-लैला-ए-मजनू-ए-हसीन" असे काहीसे यावे. मनिष यांच्या लेखातल्या इक़्बाल यांच्या कवितेत "शाम-ए-सियाहक़बा" असे रूप आले आहे. त्याचा अर्थ "कृष्णवसना हिची संध्या" नसून "कृष्णवसना (अशी) संध्या" असा मनिष यांनी दिला आहे, तो ठीकच आहे. त्यामुळे अमुक--तमुक चा अर्थ "तमुकचा अमुक" असा घेता येतो आणि संदर्भानुसार "तमुक असा अमुक" असा घेता येतो, असा ढोबळ अर्थ मी काढतो. हा प्रकार मला नीट कोणी समजावून सांगितला तर हवा आहे. मनिष, धोंडोपंत, चित्तर, कोणी सांगू शकतील...

In reply to by धनंजय

सर्किट गुरुवार, 11/29/2007 - 22:48
यामुळे अमुक-ए-तमुक चा अर्थ "तमुकचा अमुक" असा घेता येतो आणि संदर्भानुसार "तमुक असा अमुक" असा घेता येतो, असा ढोबळ अर्थ मी काढतो. अच्छा म्हणजे अर्थ-ए-वाक्य असा आहे होय? - सर्किट

In reply to by धनंजय

मनिष गुरुवार, 11/29/2007 - 23:18
मला उर्दू भाषेत रस आहे आणि प्रेमही आहे पण मला फार व्याकरणाचे ज्ञान नाही. मला वाटते, धोंडोपंत किंवा चित्तर जास्त सांगू शकतील. पण माझ्या माहितीप्रमाणे "ग‍म-ए-फुरकत" हे बरोबर आहे, जसे "शब-ए-फुरकत" - "फुर्कत-ए-गम मिटा जा" हे गाण्यासाठी असावे असे वाटते. तरी एकदा खात्री करून घेइन. अर्थ-ए-वाक्य अफलातुनच!!! :)

In reply to by मनिष

कोलबेर गुरुवार, 11/29/2007 - 23:22
'अर्थ-ए-वाक्य' ह्या हिशोबाने 'दिवाना-ए-मनिष' पण योग्यच मग बहुतेक. इंटरेष्टींग पॉइंट आहे. जाणकारांच्या भाष्याच्या प्रतिक्षेत.

In reply to by धनंजय

मनिष गुरुवार, 11/29/2007 - 23:42
मला वाटते, ह्याला "इज़ाफ़त" म्हणतात आणि ते इंग्रजी of सारखा करतात. जसे - हाल-ए-दिल तसेच विशेषण आणि विशेष्य ह्यांच्यातील नाते दाखवण्यासाठीही वापरतात. जसे - इस्मे-शरीफ़ (शुभनाम)

In reply to by मनिष

धनंजय Fri, 11/30/2007 - 00:02
बरोबर. हाच शब्द अपेक्षित होता. अरबीप्रमाणे उर्दूतही إضافة 'इदा़फ़[त] असा लिहितात. पण तुम्ही म्हणता तसा " इज़ाफ़त " असाच उर्दूत उच्चार आहे. नियम दिल्याबद्दल धन्यवाद. त्यावरून विशेष्य-विशेषण म्हणून "मनिषे-दीवाना" म्हणण्यास हरकत नव्हती असे वाटते. तरी ऐकायला जरा वेगळेच (थोडे विचित्र) वाटते खरे. म्हणून तुम्ही केलेला बदलही पटतो.

In reply to by धनंजय

दिगम्भा गुरुवार, 12/06/2007 - 13:20
अमुक-ए-तमुक हा समास षष्ठी-तत्पुरुष आणि कर्मधारय अशा दोन्ही प्रकारांनी सोडवता येतो अशी माझी समजूत आहे. उदा. ग़मेफ़ुर्क़त, मुग़ले-आज़म धनंजय, उर्दूतला ज़्वाद हा ज़ व द च्या मधला आहे असे एका हैदराबादी गृहस्थाने मला सांगितले होते (आधीच सांगतो की चित्तरंजन यांना हे मान्य नाही, त्यांच्या/तज्ज्ञांच्या मते उर्दूत तिन्ही-चारी/सगळ्या ज़ चा उच्चार एकच होतो असे त्यांनी पूर्वी एकदा लिहिले होते). यामुळे अरबीमध्ये त्याचा बरेच वेळा द होतो, जसे रमदान. मराठीतही तकाज़ा चा तगादा याचमुळे झाला असावा. - दिगम्भा

In reply to by धनंजय

मनिष Fri, 11/30/2007 - 00:02
विकीपीडिया म्हणते - Standard Urdu uses many prepositions directly borrowed from Persian, and also some from Arabic. The most common is इज़ाफ़त اضافه izāfat, the particle -e- meaning "of" that links two words together. Example: रंग-ए बहार / رنگ بہار / rang-e-bahār (lit., colour of spring). त्या न्यायाने मग गम-ए-फुरकत हे बरोबर आहे. बाकी गाण्याबद्दल समीर लाच विचारले पाहिजे!

In reply to by मनिष

आवडाबाई Fri, 11/30/2007 - 15:40
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल-ए-तारिफ आहे :-)) गीतकार समीर असल्यानेच मी (जवळजवळ ऍज ऍन आफ्टरथॉट) प्रश्नार्थक लिहिले, एरवी मी एकदम आत्मविश्वासाने लिहिले असते. बघू जाणकार काय सांगतात ते !

In reply to by आवडाबाई

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 10:41
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल-ए-तारिफ आहे :-)) आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं? कमाल आहे. आपला, (चकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

आवडाबाई गुरुवार, 12/06/2007 - 15:08
आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं? कमाल आहे. हो उर्दू आहेच, पण सध्या थोडा ट्रॅक चेंज केलाय. आजपासून सवाई गंधर्व !! तेव्हा ४ दिवस शास्त्रीय संगीत !! संपल्यावर रिपोर्ट देतेच !

मनिष Wed, 11/28/2007 - 03:05
अर्थात हेच इक्बाल पुढे कट्टर धर्मवादी झाले, पाकिस्तानच्या निर्मितीचा एक खंदा पुरस्कर्ता हा आरोपही त्यांच्यावर झाला. पण त्यांच्या (आणि अर्थातच उर्दू शायरीच्या वैविध्याविषयी, दर्जाविषयी ही चर्चा असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन, उदारमतवादी ते कट्टर धर्मवादी हा प्रवास हे इथे वगळले आहे.

In reply to by मनिष

किमयागार गुरुवार, 11/29/2007 - 07:28
अर्थातच उर्दू शायरीच्या वैविध्याविषयी, दर्जाविषयी ही चर्चा असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन, उदारमतवादी ते कट्टर धर्मवादी हा प्रवास हे इथे वगळले आहे. होऊ द्या की त्यावरही चर्चा. हवं तर स्वतंत्र लेख सुरू करा पण आम्हालातरी त्यातच तुमच्या शेरो शायरी पेक्षा जास्त रस आहे. -कि'गार

In reply to by मनिष

धोंडोपंत Fri, 11/30/2007 - 14:03
सर महंमद इक़्बाल यांनी स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव कधीही मांडला नाही. त्यांना पद्धतशीरपणे त्यात गोवण्यात आले. सारे जहाँसे अच्छा, हिदोस्ताँ हमारा.... म्हणणारा माणूस हिंदोस्ताँला तोडायची मागणी कशी करेल? एडवर्ड थॉमसनने त्याच्या पुस्तकात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा उल्लेख करून ती कल्पना सर महंमद इक़्बालांच्या डोक्यातून बाहेर आली आहे असे म्हटले. त्यानंतर लगेच इक़्बाल यांनी आपली अखंड भारताची भूमिका असल्याचे स्पष्ट करतात थॉमसनने फक्त दिलगीरी व्यक्त केली. पण तोपर्यंत जीना आणि लियाकत अली मंडळीना आयताच बळीचा बकरा मिळाला होता. अलाहाबादच्या मुस्लिम लीगच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर महंमद इक़्बाल यांची निवड 'करण्यात' आली आणि त्या अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा ठराव संख्याबळाच्या आधारे पास करण्यात आला असे इतिहास सांगतो. वास्तविक सर महंमद इक़्बाल यांचे मत पंजाब, वायव्य सरहद्द आणि बलुचिस्थानचे एक राज्य बनवून ते अखंड भारतात सामावून घ्यावे असे होते. आपला, (इतिहाससंशोधक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

मनिष Fri, 11/30/2007 - 14:11
म्हणूनच मी "आरोप" असे म्हट्ले.
पाकिस्तानच्या निर्मितीचा एक खंदा पुरस्कर्ता हा आरोपही त्यांच्यावर झाला
मला वाटते, त्यांची राजकीय, धार्मिक मते बाजुला ठेवून (मला तरी त्यात रस नाही, आणि त्याने वाद-विवाद वाढतो.) त्यांच्या शायरीचा आस्वाद घ्यावा हे उत्तम. :)

In reply to by मनिष

धोंडोपंत Fri, 11/30/2007 - 14:26
मनिषराव, तुमचे म्हणणे खरे आहे. पण सर महंमद इक़्बाल यांच्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज असू नयेत म्हणून वरील गोष्ट स्पष्ट करणे अगत्याचे वाटले. आपला, (दक्ष) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर Wed, 11/28/2007 - 07:19
मनिषराव, अतिशय सुंदर लेखन! आपला उर्दू भाषेचा एवढा व्यासंग आहे हे माहितीच नव्हतं. आपल्याकडून अजूनही अश्याच लेखांची अपेक्षा आहे.... उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. क्या बात है! त्या भाषेचा रुबाब काही वेगळाच... तात्या.

धोंडोपंत Fri, 11/30/2007 - 10:25
वा मनिष राव, बहोत ख़ूब. अप्रतिम लेख. अभिनंदन. आपला, (आस्वादक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे.

अविश्वास ठराव

कोलबेर ·

कोलबेर Tue, 11/27/2007 - 12:44
अरे वा! २५ मिनिटे झाली तरी एकही प्रतिसाद नाही? काल, अवकाश आणि पुंज भुमिती वरील क्लिष्ट लेखाला ३० मिनिटात प्रतिसाद देणारे एका 'यूसलेस' संकेतस्थळाचे इथले सभासद कुठे गेले?

विसोबा खेचर Tue, 11/27/2007 - 13:26
उगाच प्रतिसाद/लेखांची कापाकापी करत सुटणार्‍या "अति कार्यक्षम"संपादक सदस्यांवर जाहीर अविश्वास ठराव आणण्यासाठी हा प्रस्ताव आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर तूर्तास तरी मी कुणावरही अविश्वास ठराव आणू इच्छित नाही. माझा मिसळपाववरील सध्याच्या पंचायत समितीवरील प्रत्येक सदस्यावर पूर्ण विश्वास आहे, तेव्हा तूर्तास तरी अविश्वासाचा वगैरे प्रश्नच येत नाही! आणि हो, आम्ही मालक आहोत, पण ते फक्त कोपर्‍यातलं चित्र बदलण्यापुरते! :) मुख्य मुद्दा असतो तो संकेतस्थळावर काय लिहिलं जावं, काय जाऊ नये, या बाबतच्या कंटेंटचा. तसेच कुणाचा प्रतिसाद संपादित करायचा, कुणाचा नाही, या बाबतचा. त्या करता चूक/बरोबर ठरवायला पंचायत समिती समर्थ आहे! आपला, (एक सामान्य मिसळपाव ग्रामस्थ) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 11/27/2007 - 13:50
मुख्य मुद्दा असतो तो संकेतस्थळावर काय लिहिलं जावं, काय जाऊ नये, या बाबतच्या कंटेंटचा. --- क्या बात है!!!!!!! (चकित!)बेसनलाडू

सर्किट Tue, 11/27/2007 - 22:42
वरुण देवा, या आठवड्यात सोमवारी रात्रीच का रे ? व्हॉलंटियर्स जिंकले म्हणून ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/27/2007 - 23:21
आमच्याकडे दर सोमवारी रात्री 'फ्लाइंग सॉसर' ह्या आमच्या लाडक्या पबात २ डॉलर पाईंट नाईट असते त्यात व्हॉलंटीयर्स काय जबरी जिंकले :-)

देवदत्त Wed, 11/28/2007 - 00:00
काय चाललंय काय? कोणी आम्हालाही सांगेल का? आम्हाला काही कळेल असे बोला की ? कोणी काही सरळ सांगतच नाही. की ह्यावरही अविश्वास ठराव मांडायचा?

उगाच प्रतिसाद/लेखांची कापाकापी करत सुटणार्‍या "अति कार्यक्षम"संपादक सदस्यांवर जाहीर अविश्वास ठराव आणण्यासाठी हा प्रस्ताव आहे. 'प्रभारी संपादक' ह्या पदापासून 'संपादक' असे प्रमोशन घेण्यापूर्वी समस्त संपादक मंडळाने ह्या ठरावाला सामोरे जावे. अर्थातच ह्यावर प्रभारी संपादक ह्या नात्याने आमच्यावरही अविश्वास ठराव गुदरल्यास आम्ही आमचे अधिकार मालक श्री. तात्या अभ्यंकर ह्यांच्या स्वाधीन करून एक सामान्य सदस्य म्हणून मिसळपावचा आस्वाद घ्यायला मोकळे होऊ. जय मिसळपाव! -कोलबेर

उर्दू ग़ज़लांचे भावानुवाद

धोंडोपंत ·

विसोबा खेचर Mon, 11/26/2007 - 12:34
धोंड्या झकास लिहिले आहेस... या नवीन, 'उमलत्या' अनुवादकांच्या तडाख्यातून ग़ालिबसारखे शायरही सुटलेले नाहीत. 'उमलते अनुवादक' हा शब्द आवडला! :) मुळात उर्दूमधील एखादी ग़ज़ल मराठीत किंवा अन्य कोणत्याही भाषेत भाषांतरीत होत असतांना तिच्या लहेजा मध्ये आमूलाग्र बदल होत असतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे ती ग़ज़ल तिच्या मूळच्या ताकदीने भाषांतरित होऊ शकत नाही. सहमत आहे... त्यातल्यात्यात उर्दू ही अशी भाषा आहे की, जिची 'नज़ाकत' जगातील कोणत्याही भाषेला नाही. क्या बात है, अगदी खरं! त्यापेक्षा उर्दूचा रसास्वाद त्याच भाषेत घ्यावा. लाख रुपये की बात! 'फ्रुटी' किंवा 'मँगोला' किंवा 'माजा' ला अस्सल देवगडी कलमी आंब्याची सर कधीच यायची नाही! असो.. आपला, (अस्सल तेच मानणारा!) तात्या.

दिगम्भा Mon, 11/26/2007 - 12:56
धोंडोपंत, आपण उर्दू शा'यरीचे शौकीन आहात याचा अंदाज पूर्वीपासूनच आला होता. लेखातील भावनांशी पूर्ण सहमत आहे. सर्व नुक्ते काळजीपूर्वक टंकित केल्याबद्दल धन्यवाद. हल्लीच्या काळात एवढी मेहनत कोण घेतो? एक किरकोळ शंका - "शक़ील बदायुनी , क़तील शिफ़ाई, जिगर मुरादाबादी, फ़ैज़ अहमद फ़ैज़, ज़ोश महिलाबादी, ख़ुमार बाराबन्क्वी यांच्यावर काय" ज़ोश महिलाबादी नसून जोश मलीहाबादी असावे असे वाटते. एकदा तपासून पहावे ही नम्र विनंती. - दिगम्भा

धोंडोपंत Mon, 11/26/2007 - 13:03
धन्यवाद दिगम्भा, टंकलेखनाची चूक दुरूस्त केली आहे. अभिप्रायाबद्दल आभार. आपला, (धांदरट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आजानुकर्ण Mon, 11/26/2007 - 13:18
तुमच्या भावनांशी सहमत असलो तरी अनुवाद केल्यानेच मूळचे इंग्रजी नसलेले अनेक साहित्य इंग्रजीत आले आहे व त्यांचा तथाकथित व्याभिचारी आस्वाद वाचकांनी घेतला आहे. अनुवादाला असे कमी लेखणे योग्य नाही. अनेक गजला खूपच सुंदर असतात हे निर्विवाद. पण बहुतेक गजला या चार मद्यपींनी आपल्या व्यसनामुळे आपल्याला सोडून गेलेल्या प्रेयश्यांबद्दल केलेल्या कोल्हेकुई सारख्या आहेत. हेच जगातील सर्वोत्तम साहित्य आहे असे म्हणणे पटले नाही. (अनुवादप्रेमी) आजानुकर्ण

धोंडोपंत Mon, 11/26/2007 - 13:30
श्री आजानुकर्ण, पण बहुतेक गजला या चार मद्यपींनी आपल्या व्यसनामुळे आपल्याला सोडून गेलेल्या प्रेयश्यांबद्दल केलेल्या कोल्हेकुई सारख्या आहेत. हेच जगातील सर्वोत्तम साहित्य आहे असे म्हणणे पटले नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत असण्याचा अधिकार असतो. तो तुम्हालाही आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. तुमच्या मताचा स्विकार केला नाही तरी तुम्हाला तुमचे मत असण्याच्या अधिकाराचा आदर करतो. आपल्या पहिल्या परिच्छेदातील प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार होतो पण आपल्या अभिप्रायाचा दुसरा परिच्छेद वाचल्यावर आम्ही आमचा विचार बदलला आहे. उर्दू साहित्य आणि त्यातल्यात्यात उर्दू ग़ज़लेचा तुमचा 'व्यासंग' पाहता, तुमच्या अभिप्रायाला उत्तर न देणे हेच इष्ट ठरेल, असे आम्हाला वाटते. जाताजाता... आमचे आदरणीय दादा स्वर्गीय श्री. सुरेश भट यांचे वाक्य लिहावेसे वाटते. दादा म्हणाले होते की, " उर्दू साहित्यात जर ताकद नसती तर जगभरातले हजारो लोक त्या उस्तादांचे 'दीवान' घेऊन रात्रीच्या रात्री जाळत बसले नसते." त्यामुळे कोल्हेकुई वगैरे ठरविण्याआधी त्याचा अभ्यास करा आणि मग त्यावर भाष्य करा ही विनंती. आपला, (मूक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

आजानुकर्ण Mon, 11/26/2007 - 13:45
आमचा गजलांचा अभ्यास "हजारो ख्वाहिशे ऐसी, "आह को चाहिये" वगैरे काही मोजक्या चांगल्या गझला सोडल्या तर "शेखजी थोडीसी पीके आईये" प्रकारचाच आहे हे मान्य. पण अनुवादित साहित्याला असे उणे लेखल्यामुळे तोल जाऊन काही बरळलो गेलो असेल तर क्षमस्व. उर्दू गजलांविषयी तुमचा व्यासंग खूप चांगला दिसतो. तुम्हीच त्याबद्दल थोडी माहिती मराठीतून द्या. (गजलज्ञानोत्सुक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

पंत, स्त्रीयांची वर्णने, रुपे, तिचे डोळे, चाल, मयखाने, शराब, साकी, आणि शब्दांची नजाकत म्हणजे उर्दु गझल. अशी आमची त्याकडे पाहण्याची दृष्टी आहे. खरे तर व-हाडी बोली दख्खणी भाषा होती म्हणतात.तिच्यात अरबी, पार्शियन शब्दांनी तिचे रुप बदलत गेले आणि आता जेव्हा तिचा अनुवाद मराठीत होत असेल तेव्हा उर्दु गझलाची मजा नक्कीच नसणार. म्हणूनच शायर जफर, गालिब, मोमिन, यांची आठवण होत असते. बाकी आपण गझलांचे जाणकार आहात, तेव्हा उर्दु गझलांवर जबरा लेख येऊ देत. आपला स्नेही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत Tue, 11/27/2007 - 21:45
प्राध्यापक साहेब, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण आमच्याशी सहमत आहात याचा आनंद आहे. ग़ालिबसारख्या अत्यंत उत्तुंग प्रतिभेच्या शायरांच्या ग़ज़लांचे अनुवाद म्हणजे स्कॉचमध्ये कोकाकोला घालून त्याची चव बिघडवण्यासारखे आहे. किंवा आमच्या "कलकत्ता नवरतन- १२० "मध्ये गुलकंद घालण्यासारखे. असो. ग़ज़ल ही केवळ मद्यालय, तेथील साक़ीबाला, तिचे कटाक्ष यापुरती मर्यादित नसून जीवनाचे तत्वज्ञान भरलेली एक अत्यंत लोभसवाणी चीज आहे. माणसांच्या भावनांचे इतके उत्कट आणि अप्रतिम प्रकटीकरण करण्याचे दुसरे माध्यम अस्तित्वात नसेल. तिची तबियत इश्किया आहे. ती शृंगारिक आहे. पण ती अश्लील नाही. पु.ल.देशपांडे यांनी ग़ज़लेचे वर्णन करतांना असे म्हटले आहे की - "ग़ज़ल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे आणि त्यात सूक्ष्म निवृत्तीही आहे". माणसाच्या दैनंदिन जीवनात त्याला येणार्‍या गोडकटू अनुभवांचे कथन म्हणजे ग़ज़ल. मुळात इश्क़िया असलेली ही ग़ज़ल पुढे पुढे तरक्कीपसंद (सुधारणावादी) होत गेली आणि जीवनातल्या विविध अंगांवर आणि ढंगांवर भाष्य करू लागली. आणि त्यामुळेच इतके विविध प्रवाह साहित्यात येऊनसुध्दा ती टिकून राहिली. काळाच्या ओघात अनेक काव्यप्रकार लोप पावले पण ही ग़ज़लसुंदरी आजही तिच्या असमान्य सौंदर्याने आणि नज़ाकतीने तळपते आहे, तळपत राहील. कारण जो पर्यंत मानवी सृजन अस्तित्वात आहे तोपर्यंत तिला मरण नाही. आपला, (ग़ज़लदिवाणा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

टग्या Tue, 11/27/2007 - 22:15
> स्कॉचमध्ये कोकाकोला घालून त्याची चव बिघडवण्यासारखे नेमकी कशाची चव बिघडणे अभिप्रेत आहे, हे कळले नाही. प्रस्तुत प्रतिसादकाच्या मते स्कॉचची चव तर बिघडत असावीच, पण कोकाकोलाची चवसुद्धा निश्चितच बिघडते. - (कोकभूमिवासी) टग्या. अतिअवांतर: यावरून एक पाचकळ विनोद आठवला. एकदा एक बाई कोकचा कॅन पिण्यासाठी उघडते. आता झालेले काय असते, की आमच्या अटलांटाच्या कोकच्या फ्याक्टरीत जेव्हा कोक भरून हा क्यान शीलबंद होत असतो, नेमक्या त्याच क्षणी एका माशीने क्यानमध्ये शिरून आत अंडे घातलेले असते, आणि नंतर क्यान शीलबंद होण्याच्या निमिषार्धापूर्वी ती माशी क्यानबाहेर सटकून पसार झालेली असते. आमच्या बाईसाहेब कोक पिण्यासाठी कॅन उघडायला आणि ते अंडे फुटून माशीच्या पिल्लाचा जन्म व्हायला एकच गाठ पडते, आणि ही नवजात बाळमाशी बाईसाहेबांच्या भोवती घोंगावत त्यांना 'आई, आई' म्हणून पुकारू लागते. बाईसाहेब तिला 'चल ग! मी काय तुझी आई नाहीये काही!' म्हणून झिडकारतात. बाळमाशी केवळ एखादे लहान मूलच काढू शकेल अशा केविलवाण्या आवाजात त्यांना म्हणते, 'पर माँ, मैं तुम्हारे कोक में से पैदा हुई हूं!'

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Tue, 11/27/2007 - 22:45
स्कॉच मध्ये कोक नाही, ऑरेंज सोडा घालावा. रम मध्ये कोक, आणि जिन मध्ये लिम्का. (बाकी "कोक से पैदा हुई खल्लास" टगेबुवा !!) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/27/2007 - 23:26
स्कॉच मध्ये कोक नाही, ऑरेंज सोडा घालावा. म्हणजे ग्लेन फिडिच मध्ये ऑरेंज सोडा घालता की काय राव?? ऑरेंज ज्यूसच प्यायचा आहे तर ९ डॉलरला २ लिटर मिळणारी पोपॉव्ह कींवा तत्सम नावाची व्होडका काय वाईट??

In reply to by कोलबेर

सर्किट Wed, 11/28/2007 - 00:30
"घालायचाच असेल तर" असे वाक्याच्या सुरुवातीला घाला :-) - सर्किट

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय Tue, 11/27/2007 - 22:31
तुम्ही म्हणता ते सर्व विषय आहेत, पण तसव्वुफ, म्हणजे सूफी विचार हे अभिजात उर्दू गजलमध्ये प्रकर्षाने जाणवतात. आता मिर्जा गालिब यांची आपल्या सर्वांच्या ओळखीची गजल घेऊ :
یہ نہ تھی ہماری قسمت کہ وصالِ یار ہوتا اگر اور جیتے رہتے یہی انتظار ہوتا यह न थी हमारी क़िस्‌मत कि विसाल-ए यार होता अगर और जीते रह्‌ते यिही इन्‌तिज़ार होता
(अर्थ स्पष्ट आहे.) वरवरचा अर्थ शृंगारिक, खोलवरचा अर्थ आध्यात्मिक आहे. कोणी म्हणेल खोलवर तसा अर्थच नाही, तर ते बरोबर नाही. कारण हा शेवटून दुसरा शेर घेतला, तर आध्यात्मिक अर्थ प्रकर्षाने जाणवतो, उलट शृंगारिक अर्थ नीट विचार करून "लावून" घ्यावा लागतो.
اسے کون دیکھ سکتا کہ یگانہ ہے وہ یکتا جو دوئی کی بو بھی ہوتی تو کہیں دو چار ہوت उसे कौन देख सक्‌ता कि यगानह है वह यक्‌ता जो दूई की बू भी होती तो कहीं दो चार होता
यगानह = एकमेव, यकता = एकटा दूई = "दोनपणा" = द्वैत दो-चार होना = भेटणे मग शेवटी आपल्या तसव्वुफची सौम्य टिंगल करतो!
یہ مسائلِ تصوّف یہ ترا بیان غالب تجھے ہم ولی سمجھتے جو نہ بادہ خوار ہوتا यह मसाइल-ए तसव्‌वुफ़ यह तिरा बयान ग़ालिब तुझे हम वली समझ्‌ते जो न बादह-ख़्‌वार होता
मसाइल = मिसाल चे बहुवचन बादह्ख्वार = दारुड्या

In reply to by धनंजय

सर्किट Tue, 11/27/2007 - 22:46
धनंजयराव, काही शब्दांचे अर्थ समजले नाहीत बॉ: विसाल, बू, वली ? - (अडाणी) सर्किट

धनंजय Tue, 11/27/2007 - 22:52
विसाल : मिलन बू : गंध (या ठिकाणी "शक्यता, अगदी थोडेसुद्धा ज्ञान" हा अर्थ - "त्याला या गोष्टीचा गंधदेखील नव्हता" या मराठी प्रयोगाप्रमाणे.) वली : संत चित्रा सिंग यांनी गायलेली ही गजल : http://ww.smashits.com/music/ghazals/songs/2204/mirza-ghalib-jagjit-chitra-singh.html# हबीब वली मुहम्मद यांनी गायलेली हीच गजल : http://www.muziq.net/showpage.php?page=album.php?show=showall&artistid=71&albid=all&limit=24

In reply to by धनंजय

सर्किट Tue, 11/27/2007 - 23:11
उसे कौन देख सक्‌ता कि यगानह है वह यक्‌ता जो दूई की बू भी होती तो कहीं दो चार होता वाह ! फारच सुंदर विचार आहेत ! - सर्किट

मनिष Tue, 11/27/2007 - 23:54
म्हणतो मी. आता "कोल्हेकुई" नाही हे पटेल असे वाटते! :)

In reply to by धनंजय

दिगम्भा गुरुवार, 11/29/2007 - 10:59
बाकी ठीकच आहे, पण "वरवरचा अर्थ शृंगारिक, खोलवरचा अर्थ आध्यात्मिक आहे. कोणी म्हणेल खोलवर तसा अर्थच नाही, तर ते बरोबर नाही. कारण हा शेवटून दुसरा शेर घेतला, तर आध्यात्मिक अर्थ प्रकर्षाने जाणवतो, ........." असे दुसर्‍या शेराचा आधार घेऊन एखाद्या शेराचा अर्थ लावणे सर्रास योग्य वाटत नाही. प्रत्येक शेर म्हणजे स्वतंत्र व पूर्ण कविता या तत्वाला ते धरून होणार नाही. उदा. "हज़ारों ख़्वाहिशें ..." या जीवनानुभवी मतल्याचा व "वो जाता था के हम निकले" या शेराचा (एकाच ग़ज़लेत असले तरी) कितपत संबंध आहे?

In reply to by दिगम्भा

धनंजय गुरुवार, 11/29/2007 - 17:22
हे बरोबर आहे की गजलेतला प्रत्येक शेर स्वतंत्र असला पाहिजे. पण फक्त रदिफ तोच असणे हे एकच सूत्र त्या शेरांना बांधत असावा हे ठीक नाही वाटत. प्रत्येक शेर अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असूनही ते एकत्र वाचल्याने "भागांपेक्षा पूर्ण अधिक" ("the whole is greater than the part") असा काही अर्थ गजलेतून निघावा. त्यामुळे तुमचे हे म्हणणे बरोबर आहे की सहाव्या शेरातल्या नेमक्या शब्दांच्या अर्थातून पहिल्या शेराला अर्थ लावू नये. पण त्या गजलेतली समावेशक भावना काढता यावी. मक्त्यातला "तसव्वुफ"चा संदर्भ स्वतंत्र लावता आला, तरी खुद्द गजलेलाही लावता यावा.

In reply to by धनंजय

दिगम्भा Fri, 12/07/2007 - 13:16
पण फक्त रदिफ तोच असणे हे एकच सूत्र त्या शेरांना बांधत असावा हे ठीक नाही वाटत. प्रत्येक शेर अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असूनही ते एकत्र वाचल्याने "भागांपेक्षा पूर्ण अधिक" ("the whole is greater than the part") असा काही अर्थ गजलेतून निघावा. माझीही अपेक्षा किंवा मत अशी/सेच आहे, पण ... प्रचलित ग़ज़ला पहाता शायरांनाच हे आपले समाईक मत मान्य नसावे, नाहीतर ग़ालिबसारख्याने अशी "वो जाता था के हम निकले" (यावर माझा खास राग आहे) या प्रकारची घुसडंपट्टी केलीच नसती. इतरही उदाहरणे मिळू शकतील. तरीही जर भागांपेक्षा पूर्ण अधिक होत असेल तर माझेसुद्धा गेश्टाल्टिक समाधान अधिक होते/होईल. मात्र असा अपेक्षित रसपरिपोष नज़्ममध्ये नीट होतो. नज़्मवाला साहिर या बाबतीत बरा वाटला. "ग़ज़ल" चित्रपटात त्याच्या "किसे पेश करूं" या रदीफच्या चक्क तीन ग़ज़ला आहेत लताची, रफीची आणि (गद्य) मुशायर्‍यात राजेंद्रनाथची विनोदी (त्यातील एक नमुनेदार शेर - "औरों का हूं मैं डाक्टर लेकिन तुम्हारा हूं मरीज़, नब्ज़ दिखाने को ये हाथ किसे पेश करूं") . - दिगम्भा

मनिष Mon, 11/26/2007 - 17:10
काही प्रतिमा त्या, त्या भाषेतच सुरेख दिसतात. पण म्हणून अनुवादच नको असे नाही. "मूळ ग़ज़ल तिच्या अर्थासोबत प्रकाशित करावी " ह्याच्याशी पुर्णपणे सहमत. अवांतर - माझ्या एका उर्दू जाणकार मित्राच्या मते, काही उर्दू शब्द देवनागिरीत लिहिता येतच नाही. पण म्हणून (जमेल तसे) उर्दू ग़ज़ल देवनागिरीत लिहिलीच नाही तर माझ्यासारखे असंख्य चाहते ती वाचूच शकणार नाही. तसेच अनुवादाकडेही थोडे उदारपणे पाहता येईल. योगेश (कर्णा) - इक्बाल, कैफी आझमी, आणि असंख्य अर्वाचीन उर्दू शायरांनी (साम्यवादीही होते ह्यात) खूप चांगले, विविध विषयांवर लिखाण केले आहे. ती कोल्हेकुई नक्कीच नाही. जमल्यास मी पण ग़ज़ल हया विषयावर लिहिन. - मनिष

धनंजय Mon, 11/26/2007 - 18:16
प्रत्येक भाषेत ठेवणीचे शब्द आणि असतात, जे दुसर्‍या भाषेत सांगायला कठिण जातात. गद्य साहित्याचे भाषांतर करताना या ठेवणीतल्या शब्दांचे बेमालूम स्पष्टीकरण देत अनुवाद करणे शक्य असते, ते काव्याचा अनुवाद करताना कठिण जाते. उर्दूसारखीच अशा प्रकारची उदाहरणे तमिळ, तेलुगु, बंगाली भाषांबद्दल दिली जाऊ शकतील. या सर्व भाषांमध्ये समृद्ध काव्य आहे, जे की मूळ भाषेत वाचल्याशिवाय पूर्णपणे कळणार नाही. पण आमच्या शाळेत तीन-चार भाषा शिकायचीच फक्त सोय होती. शिवाय प्रौढ वयात रोजगाराच्या निमित्त दिवस खर्च झाल्यावर या सर्व भाषा शिकायला वेळ मिळत नाही. (परदेशात राहिल्यामुळे, येथे सहज शिकता येतील अशा बिगरभारतीय भाषा शिकणे जे थोडे जमते तितकेच. - हा वैयक्तिक अनुभव) त्यामुळे बहुतेक मराठी रसिक साहित्यिक उर्दू शिकू शकतील असे वाटत नाही. ताक हे दुधाऐवजी पीत असल्याची कल्पना असल्यास, ते आवडणार नाही, चवीला हिणकस वाटेल. पण ते ताक म्हणून प्याल्यास, ताकसुद्धा बर्‍यापैकी चविष्ट असते असे लक्षात येऊ लागते. ता.क. नुक्त्याबाबत : अरबी/फारसीमधून आलेल्या लिपीत अनेक प्रकारचे ज़ आणि स़ आहेत. प्रत्यक्ष उच्चारात एकाच प्रकारे अभिजात उर्दूत त्यांचा उच्चार केला जातो. 'अइन या (अ़) वर्णाचा कंठ्य-स्पर्श व्यंजन असा अभिजात उर्दूत होत नाही. त्यामुळे अगदीच लिपीला लिपी नीट लिहायची असेल तर शम्अ़ असे म् पाय मोडून लिहावे लागेल, कारण म्+अ़ हे दोन व्यंजनांचे जोडाक्षर आहे. अभिजात उर्दूतही उच्चार "शमा" असाच असल्यामुळे मराठीत तसे उच्चारसदृश लिहिता यावे. पण "शमअ़" हे ना धड इथे झाले, ना तिथे (बाद [= नंतर] च्या ठिकाणी "बअ़द" किंवा "ब्अ़द" असे लिहावे लागेल! हा विषयी अतिरेकी आग्रह न केला तर बरा असे वाटते.) दुसर्‍या एका ठिकाणी याविषयी (उर्दूतील अरबी वर्णांच्या उच्चारांविषयी) चित्तरंजन यांनी उर्दूपंडितांचे संदर्भ देऊन माहिती दिली होती. त्यांनी ती येथे दिली तर चांगले होईल.

सर्किट Tue, 11/27/2007 - 00:12
सदर चर्चाप्रस्तावाविषयी आमची द्विधा मनस्थिती आहे. आम्हाला उर्दू येत नाही, भावानुवादांतून मूळ अर्थाला काही प्रमाणात न्याय मिळत नाही, हेही पटते. परंतु त्यामुळे उर्दू भाषेतील उत्तमोत्तम साहित्याला आम्ही वंचित राहू ही कल्पनाही पटत नाही. त्यामुळे भावानुवादासोबत मूळ गझल देऊन त्यातील कठीण जागांवर विवेचन करावे, हा मधला मार्ग आवडेल. - सर्किट

लोकहो, सध्या मराठी संकेतस्थळांवर सुप्रसिध्द उर्दू शायरांच्या उत्तमोत्तम ग़ज़लांचे "भावानुवाद" करण्याचे पेव फुटले आहे. या नवीन, 'उमलत्या' अनुवादकांच्या तडाख्यातून ग़ालिबसारखे शायरही सुटलेले नाहीत.

दुसरे मरण (पान ४, अखेर)

धनंजय ·

दिगम्भा Mon, 11/26/2007 - 11:58
ही चमत्कारिक व मजेदार आणि /किंवा अतिगंभीर कथा पहिल्या वाचनात अर्धवट समजूनदेखील आवडली. (धनंजयांना का आवडली असावी याचाही अंदाज करू शकतो असे वाटले.) आता पुन्हा एकदा-दोनदा पारायणे करतो व बदललेला किंवा बदलण्याची शक्यता असलेला अभिप्राय नोंदवीन म्हणतो. सध्या तरी फारसा धोका वाटत नाही या योजनेत, आणि तशीही माझी स्मरणशक्ती जरा अधूच आहे त्यामुळे चिंता नाही :) - (धनंजयांचा फ्यान) दिगम्भा

आजानुकर्ण Mon, 11/26/2007 - 17:54
हा भाग दोन तीनदा वाचूनही स्पर्शिकास्वरुप डोक्याला घासून गेला. बर्‍याच गोष्टी समजल्या नाहीत. तुमचे विश्लेषण वाचायला आवडेल. >>जे घडले त्याला देवही न-घडवू शकत नाही>> हे वाक्य आपण मुद्दाम असे रचले आहे का? न-घडवू शकणे असा वाक्यप्रयोग वेगळा वाटतो. -(धनंजयांचा अजून एक फ्यान) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

धनंजय Mon, 11/26/2007 - 19:24
"ऐकल्याचे न ऐकल्यासारखे केले" वगैरे शब्दप्रयोगांच्या धर्तीवर "जे घडले त्याचे न-घडले केले" असा नवीन शब्दप्रयोग केला. यात त्या काळातल्या दोन धार्मिक विचारवंतांच्या मतातील फरक दिसतो. थॉमस आक्विनास (हा अजून प्रसिद्ध आहे) असे म्हणतो की जे एकदा की घडले आहे ते "कधी घडलेच नव्हते" अशी सोय देवही करू शकत नाही. पिएर दामियानी (हा आता तितका प्रसिद्ध नाही) असे म्हणतो की सर्वशक्तिमान देव भूतकाळ बदलू शकतो. पिएर दामियानीच्या म्हणण्यानुसार भूतकाळातली घटनाच जर बदलली, तर गडबड होईल, असा या कथेचा रोख आहे. कारण क्षणाचा भेकडपणा खोडला जाऊन तो मुलगा वीरमरण खरोखर प्राप्त झाला तर त्याच्या पुढील आयुष्यात त्याच्या संपर्कात आलेल्या कित्येक लोकांच्या आयुष्यातील तपशील खोटे होऊ लागेल. म्हणजे गानोनने घेतलेला फोटो "न-घेतलेला" व्हावा लागेल, गानोनचे पत्र लिहिलेले होते, ते "न-लिहिलेले" व्हावे लागेल, इ.इ. (हे कारणा-परिणामांचे अगणित तपशील आहेत.) पिएर दामियानीचे म्हणणे वेगळ्या एका प्रकारे खरे होऊ शकते - भूतकाळाची सर्वांची स्मृती बदलू शकते - म्हणजे तथ्यातल्या पुढील घटना तपशीलवार खोट्या होत नाही. त्या तपशिलांना साक्षी असलेल्या ठोस वस्तू हरवल्या तरी चालतील - तो फोटो, ते पत्र - तितकेही पुरे. ज्यांच्या स्मृती खूप थोड्या आहेत, त्यांच्या तेवढ्या बदलल्या तर पुरे. पण ज्यांच्या स्मृती खूप अधिक आहेत, ते त्या सर्व बदलू शकणार नाहीत. ते मरण पावतील तेव्हाच इतिहास पूर्ण बदलेल. आपली स्मृती स्खलनशील आहे असे ठोस पुराव्यांसकट मान्य केल्यामुळे लेखक बोर्हेस हा मरण पावण्याची गरज नाही. या प्रकारे दामियानी आणि आक्विनास या दोन्ही विचारवंतांचे म्हणणे खरे ठरू शकते. (सकृद्दर्शनी परस्परविरोधी वाटले तरी.)

In reply to by धनंजय

आजानुकर्ण Tue, 11/27/2007 - 09:23
विश्लेषण समजले पण हे वाचूनदेखील कथेचा चौथा भाग समजला असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल. मूळ कथा स्पॅनिश असल्याने तिचा तसा उपयोग आम्हाला नाही. ह्या कथेचा इंग्रजी अनुवादही उपलब्ध आहे का? - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

धनंजय Tue, 11/27/2007 - 09:52
याचा इंग्रजी अनुवाद न्यू यॉर्करमध्ये १९६८ मध्ये प्रसिद्ध झाला होता (दुवा). पण मी तो अनुवाद वाचलेला नाही. पूर्ण लेख जाळ्यावर नाही, विकत घ्यावा लागेल :-( {म्हणून विकत घेणार नाही, ते आलेच!} कुठल्या एखाददुसर्‍या वाक्याचा इंग्रजी अनुवाद हवा असेल तर तो मी करून देऊ शकतो. दोन्ही युरोपियन भाषा असल्यामुळे, "शिघ्र-अनुवाद" पुष्कळदा जमतो. पण पूर्ण कथेचा इंग्रजी अनुवाद करायची इच्छा नाही...

विसोबा खेचर Tue, 11/27/2007 - 09:00
हद्द आहे रे बाबा तुझी! खूप कठीण कठीण विषयांवरचं वाचतोस आणि स्वत:ही तेवढंच कठीण लिहितोस... मला तर बुवा फारच जड गेलं हे सगळं वाचायला! आपला, (सामान्य) तात्या.

धनंजय Wed, 11/28/2007 - 01:29
In the Summa Theologica, it is denied that God may make it so that the past not have been, but nothing is said of the intricate concatenation of causes and effects, which is so vast and so intimate, that perhaps it would not admit of the annulment of a single fact, no matter how remote it may be, without invalidating the present. To modify, is not just to modify a single fact; it is to annul its consequences, which tend to be infinite. To be said in other words; it is creating two universal histories. In the first (let us say) Pedro Damián died in Entre Ríos in 1946, in the second, in Masoller, in 1904. This is the one that we live today, but the suppression of the previous one was not immediate and produced the incoherences to which I have referred. In Colonel Dionisio Tabares the various stages were achieved: at first he remembered that Damián behaved as a coward; later he forgot him completely; later he remembered his impetuous death. The death of the outpost-chief Abarco is no less corroborative; he died, I understand, because he had too many memories of Pedro Damián. Summa Theologica (११) मध्ये प्रतिपादन केलेले आहे, की जे घडले त्याला देवही न-घडवू शकत नाही. पण त्यात कारणा-परिणामांच्या गुंतागुंतीच्या दुव्यांबाबत काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. हे जाळे इतके अफाट आहे, इतके घट्ट विणलेले आहे, की त्यात भूतकाळातली एकही घटना खोडली - ती किती का क्षुल्लक असेना - तर अवघे वर्तमान मिथ्या होण्यास ते पुरेसे आहे. कारण हा बदल केवळ त्या एका तथ्यातला बदल नव्हे. हे म्हणजे त्या घटनेचे सर्व, म्हणजे जवळजवळ अगणित परिणाम नाहिसे करणे होय. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर त्यायोगे दोन वेगवेगळे वैश्विक इतिहास निर्माण होतात. पैकी एकाला (नावापुरता) पहिला म्हणू, त्या पहिल्यात पेद्रो दामियान १९४६ मध्ये एंत्रेर्रीयोस राज्यात मेले, दुसऱ्यात ते १९०४ मध्ये मासोयेरमध्ये मेले. आपण हा दुसरा इतिहास जगतो आहोत, पण पहिला काही सुखासुखी नाही दडपला गेला. त्यातूनच मी सांगितलेल्या विसंगत घटना घडल्या. कर्नल दियोनीसियो तावारेस त्या आदलाबदलीच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून गेले. सुरुवातीला त्यांना आठवले की पेद्रो दामियान भेकडपणे वागले, मग ते त्यांना पूर्णपणे विसरून गेले, त्यानंतर त्यांना त्यांचे धाडसी मरण आठवू लागले. आबार्को यांची बाबही या अनुमानाला जी पुष्टी देते, ती थोडकी नव्हे. श्री. पेद्रो दामियान यांच्याविषयी खूप स्मृती राखल्यामुळे त्यांचे निधन झाले असे मी समजतो.

सर्किट Wed, 11/28/2007 - 01:40
मी ही पूर्ण कथा एका दमात वाचून काढली. आवडली. मला कथा वाचताना जाणवले ते असे, गावांची नावे, पात्रांची नावे ही मुळातलीच ठेवल्याने, मूळ कथेवरचे लक्ष उडून ती नावे लक्षात ठेवण्यातच मेंदूला फार कष्ट करावे लागतात. सर्व पात्रांची, गावांची नावे अस्सल मर्‍हाटी असती, तर कथा वाचायला अधिक सोपी गेली असती. पानपताच्या लढाईचा सुंदर उपयोग करता आला असता. - सर्किट

मनिष Wed, 11/28/2007 - 02:30
"मला कथा वाचताना जाणवले ते असे, गावांची नावे, पात्रांची नावे ही मुळातलीच ठेवल्याने, मूळ कथेवरचे लक्ष उडून ती नावे लक्षात ठेवण्यातच मेंदूला फार कष्ट करावे लागतात." मला वाटले माझेच असे होते का!! :) त्यांच्या आया "अनिल, सुनिल" अशी सोपी नावे का ठेवत नाही? ;)

मनिष Wed, 11/28/2007 - 02:32
अशीच एक कथा मराठीत वाचल्याची आठवते - शक्यतांचे जग ह्याविषयी. त्या कथेत पानीपत, पेशवे यांचा उल्लेख असल्याचे आठवते, पण बाकी काहिच संदर्भ आठवत नाही. कोणई वाचली आहे का ती कथा?

धनंजय Wed, 11/28/2007 - 02:50
या कथेत एका व्यक्तीचा पूर्वेतिहास बदलला. पण सामाजिक स्मृती भरकटली तर देशाचा ज्ञात इतिहास बदलू शकतो. पूर्वीचे दस्तऐवज हरवलेत म्हणजे पुरे - उदा. गानोनचे पहिले पत्र. नवीन दस्तऐवज निर्माण होतात - उदा. कर्नल तावारेसच्या नव्याने गवसलेल्या आठवणींचे पत्र. या कथेवरून हा विचार सुद्धा करता येतो.

लेखनविषय:
लेखनप्रकार
3

दुसरे मरण (पान ३)

धनंजय ·

आजानुकर्ण Mon, 11/26/2007 - 17:43
अतिशय सुंदर ओळी... देव घडलेला भूतकाळ बदलू शकत नाही, पण भूतकाळाच्या प्रतिमा जरूर बदलू शकतो. त्याने मृत्यूच्या जागी अवसान गळाल्याची प्रतिमा ठेवली, आणि मेलेल्या माणसाचा आत्मा एंत्रेर्रीयोसला परतला. तो परतला खरा, पण त्याचे छायेसारखे स्वरूप आपल्या लक्षात आल्यावाचून राहात नाही. बायको नाही, मित्र नाही, असा तो एकटा राहिला. त्याला सगळे भोग हवे होते. म्हटले तर ते सगळे त्याचे होते, म्हटले तर त्याचे काहीच नव्हते. सगळे काही जणू काचेच्या तावदानापलीकडे असावे. तो "मेला" म्हणजे काय, तर ते अस्पष्ट शरीर पाण्यासारखे पाण्यात विरून गेले. -- आजानुकर्ण

पांढरपेशी कविता

ॐकार ·

विसोबा खेचर Sun, 11/25/2007 - 17:31
बा नीलहंसा, फारच जळजळीत लिहिलं आहेस रे बाबा! लय भारी.... जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! या ओळी खास! आता दरवाज्याच्या फटीत मेलेल्या पाली आम्हाला छळतील आणि पुढील किमान महिनाभर तरी अन्य एखादी 'पांढरपेशी कविता' आमच्याचाने वाचली जाणार नाही! :) तात्या.

In reply to by देवदत्त

ॐकार Sun, 11/25/2007 - 18:32
काय बरे? तुम्हाला यातलं काहीच दिसत नाही? मला वाटलंच होतं हे सगळं फक्त मलाच दिसत असावं! आता खातरजमा होईल अशी भीती वाटतेयं.. :|

In reply to by ॐकार

देवदत्त Sun, 11/25/2007 - 19:04
अच्छा त्यातील काहीतरी का? मला वाटले सर्व एकत्रच दिसले. ;) तसे म्हणायला गेले तर थोडे फार दिसले आहेच. एकंदरीत छान प्रकटन :) (कविता आमच्या मनात शिरायला थोडा वेळ लागतो राव :( )

सर्किट Mon, 11/26/2007 - 08:32
मर्ढेकरांची शैली तंतोतंत (आणि काही वरचढही) ! कविता खूप आवडली, ओंकार !!! - सर्किट

पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

पत्ता शोधणे - एक कला

देवदत्त ·

सहज Mon, 11/26/2007 - 06:08
इतका वेळ झाला तरी प्रतीसादाचा पत्ताच नव्हता. म्हणुन म्हणलं आपणच सांगावा. ;-) स्ट्रीट डायरेक्टरी असता जवळ पत्ता शोधण्यास मिळे बळ :-)

विसोबा खेचर Mon, 11/26/2007 - 07:59
चांगला लेख. माझा अनुभव - पत्ता शोधून काढणे पुष्कळदा सोपं जातं परंतु काही वेळेला मात्र ते अत्यंय जिकिरीचं काम होऊन बसतं! पुण्यातली मंडळी पुष्कळदा अगदी बिनदिक्कत चुकीचा पत्ता सांगतात असाही अनुभव आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/26/2007 - 08:10
पुण्यात एकदा एका स्कुटरवाल्याला वाल्याला पत्ता विचारला असता, 'आता तू असं कर,पुढच्या चौकात डावीकडं वळंच!' असं मार्गदर्शन करुन तो माझ्या दुचाकीचा पाठलाग करत मी पुढच्या चौकात खरंच डावीकडं वळतोय ना ते पहायला आला होता.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Mon, 11/26/2007 - 23:24
त्यातही कुणी हिंदी भाषिकाने पाता विचारल्यासः समोरके गल्लीसे डावीको वळो, लेकीन जरा हलू, उधर बालू पसरा हुवा है !! - सर्किट

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Mon, 11/26/2007 - 08:28
पुण्यातली मंडळी पुष्कळदा अगदी बिनदिक्कत चुकीचा पत्ता सांगतात असाही अनुभव आहे! :) म्हणूनच ठाण्यातली मंडळी पुण्यात आल्यावर अमेरिकेतून पुण्यात आलेल्या मंडळींना मार्गदर्शनासाठी बोलावून घेतात की काय ? आणि मार्गदर्शन कुणाच्या घराचे ? तर ज्यांचे मन क्षुल्लक गोष्टींनी मिसळपावावरून उडते, त्यांच्या ? तात्या, अमेरिकेत येशील तेव्हा तुला नॉर्थ क्यारोलिनाचे दिशादर्शन करेन ;-) - (सारथी) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Mon, 11/26/2007 - 08:39
म्हणूनच ठाण्यातली मंडळी पुण्यात आल्यावर अमेरिकेतून पुण्यात आलेल्या मंडळींना मार्गदर्शनासाठी बोलावून घेतात की काय ? :)) आणि मार्गदर्शन कुणाच्या घराचे ? तर ज्यांचे मन क्षुल्लक गोष्टींनी मिसळपावावरून उडते, त्यांच्या ? अरे जाऊ दे रे! जे आपले होते/आहेत, ज्यांना मिसळपावबद्दल आपुलकी वाटेल तेच इथे राहतील. बाकीचे मन उडून निघून जातील! चालायचंच.... तात्या, अमेरिकेत येशील तेव्हा तुला नॉर्थ क्यारोलिनाचे दिशादर्शन करेन ;-) हो, नक्की कर. पोष्ट्या गजाननाच्या घरी एखादी चक्कर टाकीन म्हणतो! नाहीतरी एकदा मला सिंडीला भेटायला अमेरिकेत यायचंच आहे! बाकी देवदत्तरावांनी आय पी पत्ते शोधण्याबद्दल विशेष काही लिहिलेले नाही. तो लेख तू लिहावास असं वाटतं! :) आपला, (सिंडीचा दिवाना!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आय पी पत्ते शोधण्याबद्दल विशेष काही लिहिलेले नाही. तो लेख तू लिहावास असं वाटतं! :) सहमत !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त Mon, 11/26/2007 - 21:30
आय पी पत्ते शोधण्याबद्दल विशेष काही लिहिलेले नाही. तो लेख तू लिहावास असं वाटतं! सहमत. अहो, मला त्यातील खरे तर जास्त काही माहीत नाही. आणि असल्यास पुन्हा चुकू नये. ;) त्यापेक्षा माहितगारांनीच लिहावे :)

जुना अभिजित Mon, 11/26/2007 - 11:15
विकिपेडीआचे संदर्भ देणे जरा हास्यास्पद वाटले तरी विकीमॅपिआ पत्ता शोधण्यासाठी वापरणे नक्कीच उपयुक्त आहे. पत्त्यावरून एक आठवलं. ऑफिस ऑफिस मालिकेत मुसद्दीलाल म्हणतो, "हमारे घर के सामने कचरे का ढेर इतने दिनोंसे है की हम ऍड्रेसमे कूडेके ढेर के पीछे ऐसे लिखते थे" छान लेख. पत्ता शोधण्याच्या निमित्ताने आम्हीही नव्या वाटा चोखाळल्या आहेत. अभिजित

देवदत्त Mon, 11/26/2007 - 21:52
अहो, एक लिहायचे राहिलेच.... माझ्या माहितीत असलेल्याच्या कंपनीच्या बसचा चालक नेहमी बदलतो. दर संध्याकाळी पहिला प्रश्न... "रस्ता कुणाला माहित आहे? कोण सांगेल? " आता काय म्हणावे? मनात एक प्रश्न हा ही येतो.. शेवटच्या माणसाला सोडल्यावर तो परत कसा जाईल? ;)

अजय भागवत Mon, 03/30/2009 - 21:30
पुण्यात पाट्या असतात ना? सहज म्हणुन आंतर्जालावर गुगल केल्यावर ही वेब्साईट मिळाली पुणेरी पाट्यांना वाहिलेली- http://www.busybeescorp.com/puneripatya/thumbnails.asp

६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का? का? सांगतो. सिनेमा चालबाज: शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और एक बार बाये मुडना. तुम यहॉं आओगे. तुम मुझे मिलोगे. मैं फिर तुम्हे लूट लुंगा." हा झाला सिनेमातला गंमतीचा भाग.

मिसळपावावर भूत

देवदत्त ·

प्रियाली Sun, 11/25/2007 - 04:04
काही विशिष्ट वेळासाठी स्वस्थ(idle) राहिल्यास सदस्याला मृत्यू येतो. त्यानंतर आत्मा जेव्हा मिसळपावाच्या ओढीने परततो तेव्हा 'आपलेच मरण पाहिले म्या आपुल्याच डोळा' अशी अनुभूती येते आणि आपण देहविरहीत अवस्थेत वावरतोय याचा साक्षात्कार होतो. पुनश्च हालचाल केल्यावर आपला पुनर्जन्म होतो हे वेगळे सांगणे न लगे. ;-) ड्रुपलवर आधारित बाकीची संकेतस्थळेही अशीच झपाटलेली आहेत. (मांत्रिक नं.१) प्रियाली.

In reply to by प्रियाली

देवदत्त Sun, 11/25/2007 - 08:58
छान शब्दांत माहिती दिलीत. :D फक्त तोच देह पुन्हा मिळतो हे कळल्याने आनंद वाटला. नाही तर त्याला मग, पांडगो ईलो रे.. प्रमाणे कुणी घर देता का घर असे म्हणत, किंवा वपुंच्या कथेतील एकबोटे प्रमाणे परवानगी घ्यावी लागली असती. (अघळपघळ मधील हॅम्लेटच्या बापाचे भूत) देवदत्त (आमचा व्यासंग इतपतच ;) )

In reply to by देवदत्त

धोंडोपंत Fri, 11/30/2007 - 14:14
देवदत्तानूं, पांडगो इलो रे बा इलो........ हा हा हा हा हा...... पन, एक पांडगो इलो हा . मायझवो, खयसून इलो ते ठाव नाय. त्यांका काय होया, ते पन ठाव नाय. आपला, (मांत्रिक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सृष्टीलावण्या Tue, 03/25/2008 - 21:09
पण.... मच्छिंद्र कांबळी व इतर स्वर्गस्थ मराठीप्रेमी साहित्यिक मात्र आवर्जून मिपावर येत असतील... > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सर्किट Tue, 11/27/2007 - 01:23
मिसळपावावर मिसळीची शिते सर्वत्र पडलेली असताना भुते जमली नाहीत, तरंच आश्चर्य ! - (भूतनाथ) सर्किट

अहो आपण भूत बनून आलात . मी तर पूर्वी एकदा २ देह धारण केले होते मि.पा. वर. आणि २ वेगवेगळे देह नव्हे तर अगदी शेम टू शेम तेच देह. पण २-२. पण सध्या एकाच आत्म्याने २ देह धारण करायची सुविधा मि.पा. ने बंद केली आहे असे वाटते. (ह.घ्या.) पुण्याचे पेशवे

In reply to by चतुरंग

आणि भूतपण आरशासमोर आल्यावर लई घाबरले बघा.... कारण त्यालाही आरशात भूत दिसले. पुण्याचे पेशवे

देवदत्त गुरुवार, 05/01/2008 - 20:48
आज पुन्हा भूताटकी झाली. >:) प्राजुंच्या ताटव्यावर प्रतिक्रिया लिहिली. नंतर कुठल्यातरी लेखात बघत होतो. पाहतो तर लिहिले होते, प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा. :? म्हणजे मला बाहेर हाकलले होते, कार्यक्षम असतानाही. [( म्हणून येण्याची नोंद केली तर सदस्य सूचीमध्ये माझे नाव दोन वेळा दिसले. :O (आता मला वाटते, नवज्योत सिद्धू आणि शत्रुघ्न सिन्हा ह्यांना बोलवावे लागेल, भूताला खामोश म्हणण्यासाठी :-C )

वरदा गुरुवार, 05/01/2008 - 23:17
माझही आत्ताच...भूताला पाहायला आले आणि पाहिलं, 'प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा'. आणि परत लॉग इन केलं तर माझं नाव दोन दोन वेळा....

मिसळपावावर मी भूत बनून वावरत होतो त्याचा हा पुरावा. मी येऊन गेलो तरी मिसळ पाव ला त्याची खबर लागली नाही. सदस्य म्हणून ही आणि पाहुणा म्हणून ही. विचार केला बघुया भूत बनून लेख लिहिता येतो का? ;) मिसळपाव पंचायत समिती आणि संहिता संचालकहो, मी काही चुका काढण्याकरीता किंवा मिसळपावच्या तांत्रिक गोष्टींमध्ये काही त्रूटी दाखविण्यासाठी हे लिहित नाही आहे. फक्त माझा एक मजेशीर अनुभव लिहिला.

त्या फुलांच्या..

प्राजु ·

विसोबा खेचर Sun, 11/25/2007 - 00:30
माझं हे अतिशय आवडतं गाणं आहे. प्राजू, तुझा प्रयत्न निश्चितच चांगला आहे, पण गाताना काही ठिकाणी शब्द चालीत नीट बसत नाहीत. धन्याशेठशी सहमत... मात्र, माथ्याला त्या डोंगराच्या, भेटणारा मेघ का? या एका ओळीला माझे लाख सलाम...! फारच सुरेख, चित्रदर्शी ओळ आहे आणि चालीतही छान बसते आहे! आपला, (मेघवेडा) तात्या. -- वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत! (-विंदा)

सर्किट Mon, 11/26/2007 - 08:22
उद्या मी पण प्रयत्न करून पाहतो. माझ हे आवडतं गाणं आहे. माझ्या ओबडधोबड आवाजात म्हणण्याचा मी प्रयत्नही करतो कधी कधी. पण म्हणूनच ह्या गाण्याला हात लावण्याचा आजवर प्रयत्न केलेला नाही. आता, करून बघावा, म्हणतो. - सर्किट

पुष्कर Mon, 11/26/2007 - 09:25
अत्यंत आवडतं गाणं आहे हे. हृदयनाथांचं संगीत तर अप्रतीम आहे. विशेष करून प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या दोन ओळींची चाल ही 'यासम हीच' अश्या प्रकारची आहे. त्या काव्याचा केलेला विस्तार स्तुत्य आहे. काही कल्पना चांगल्या वाटल्या, पण त्या वृत्तात बसत नसल्यामुळे चालीवर म्हणता येत नाहीत. - (गानवेडा) पुष्कराक्ष

In reply to by पुष्कर

सर्किट Mon, 11/26/2007 - 23:16
हे गाणे हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेले असले, तरी संगीत त्यांचे नाही, असे वाटते. (वसंत प्रभू ?) चुभूद्याघ्या. - सर्किट

ध्रुव Mon, 11/26/2007 - 11:19
माथ्याला त्या डोंगराच्या, भेटणारा मेघ का? मेघालाही खेचणारा, वायूचा तू वेग का? हे फारच आवडले. बाकी छान. -- ध्रुव

कोलबेर Tue, 11/27/2007 - 11:50
मी चूकून शिर्षक 'त्या फुल्यांच्या' असे वाचले.. म्हंटले अजुन एक अविश्वास समर्थक आहे वाटतं!! असो .. चालू द्या!!

In reply to by कोलबेर

टग्या Tue, 11/27/2007 - 22:58
किंबहुना, आजकालचे या स्थळावरचे सरासरी प्रतिसाद बघता, 'त्या फुलांच्या'नंतर टिंबटिंब पाहून पुढील काही शब्द लिहायचे राहून गेलेत किंवा मुद्दाम लिहिलेले नाहीत असे वाटले. *** एका सुंदर कवितेचा रसभंग करून पचका करणार्‍या प्रतिसादाबद्दल आगाऊ क्षमायाचना! प्रतिसादाचा रोख कवितेकडे नाही, तर या संकेतस्थळावर रुजू पाहणार्‍या एका अनिष्ट प्रथेकडे आहे. ***

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Wed, 11/28/2007 - 01:27
मी चूकून शिर्षक 'त्या फुल्यांच्या' असे वाचले.. हा हा हा! त्या फुलांच्या ऐवजी त्या 'फुल्यांच्या' हे बाकी सहीच आहे! त्या 'फुल्याफुल्यांच्या'ही चाललं असतं! :) आपला, तात्या फुले.

Taxonomy upgrade extras
मनोगतावर हेमंत पाटील यांनी हे गाणं दिलं आणि या सारखी आणखी कडवी रचता येतील का अशी विचारणा केली.. त्यावर मी खालील कडवी रचली.

गंमतीशीर चित्रे! :)

विसोबा खेचर ·

देवदत्त Sat, 11/24/2007 - 12:52
कबुतराचे चित्र सर्वात जास्त आवडले. :) बाकी सर्वात काही अंशी बदला घेणे सुरू आहे किंवा असे घडू शकते असा प्रकार वाटतो. कबुतराचे खरोखरच आताही घडते असे वाटते ;)

कोलबेर Sat, 11/24/2007 - 13:31
तात्या, नुकताच अमेरिकेत थँक्स गिव्हींग नावाचा सण पार पाडला. ह्या सणाला इकडे घरोघरी 'टर्की' नावाच्या पक्ष्याचे मांस खाण्याची प्रथा आहे. तुमची चित्रे पाहून यंदाच्या थँक्स गिव्हींग मध्ये पाहाण्यात आलेले हे चित्र आठवले.

प्राजु Mon, 01/19/2009 - 21:56
तात्या आणि कोलबेर पंत.. मलाही हे फॉर्वडेड मध्ये आलं होतं.. मस्त आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मीनल Mon, 01/19/2009 - 23:52
मी पण पाहिली होती ही चित्र मज्जेशीर आहेत. मीनल.

शशिधर केळकर Tue, 01/20/2009 - 00:47
मस्तच चित्रे आहेत! आताच कबुतराचे शिट डोक्यावर पडल्याप्रमाणे ओले वाटले! टर्कीचे ही छानच.

Tue, 01/20/2009 - 13:53
एका इंग्रजी पुस्तकात वाचलेला हा किस्सा. नक्की आठवत नाही पण बहुधा डिक फ्रॅन्सिसच्या एका कादंबरीत होता. अनेक वर्षे उन्हपावसात काढल्यानंतर एक स्त्री आणि एक पुरुषाच्या पुतळ्याला परमेश्वर प्रसन्न होऊन अर्ध्या तासासाठी जिवंत होण्याचे वरदान देतो. दोन्ही पुतळे जिवंत झाल्यावर लगेच झाडाझुडुपांमागे पळत जातात. पंधरा मिनिटांनी घामेघूम होऊन बाहेर येतात. पुरूष पुतळा म्हणतो " अरेच्च्या! अजुन पंधरा मिनिटे आहेत की आपल्याकडे. काय विचार आहे तुझा?" स्त्री पुतळा उद्गारतो "काही हरकत नाही. पण यावेळेला तू कबुतरांना पकडून ठेव आणि मी शिटते त्यांच्यावर.

तात्या विंचू Tue, 01/20/2009 - 19:02
चला...आता खुद्द मालकांनीच ढकलपत्रातला मजकुर / चित्रे टाकली आहेत... आता बाकीच्यांना पण ढकलपत्रे ढकलायला संमती असेल अशी आशा धरायला हरकत नाही...

राम राम मंडळी, एका पुढे ढकललेल्या ई-पत्रातील ही चित्रे आहेत. शब्दांकन तात्या अभ्यंकरांचे आहे..:) १) "पक्षांकरता सुलभ शौचालयं कुठे बांधावीत बरं? चर्चगेट स्टेशनवर सकाळच्या वेळात माणसांची खूप गर्दी असते, तिथे घिरट्या घालायला हरकत नाही!" :) २) झेब्र्यांच्या राज्यातले 'मानव क्रॉसिंग'!