✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपावावर भूत

द
देवदत्त यांनी
Sun, 11/25/2007 - 02:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8082 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

प
प्रियाली Sun, 11/25/2007 - 04:04 नवीन

भूताचे पाय (मिसळीत)

काही विशिष्ट वेळासाठी स्वस्थ(idle) राहिल्यास सदस्याला मृत्यू येतो. त्यानंतर आत्मा जेव्हा मिसळपावाच्या ओढीने परततो तेव्हा 'आपलेच मरण पाहिले म्या आपुल्याच डोळा' अशी अनुभूती येते आणि आपण देहविरहीत अवस्थेत वावरतोय याचा साक्षात्कार होतो. पुनश्च हालचाल केल्यावर आपला पुनर्जन्म होतो हे वेगळे सांगणे न लगे. ;-) ड्रुपलवर आधारित बाकीची संकेतस्थळेही अशीच झपाटलेली आहेत. (मांत्रिक नं.१) प्रियाली.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 11/25/2007 - 08:58 नवीन

मस्त ..

छान शब्दांत माहिती दिलीत. :D फक्त तोच देह पुन्हा मिळतो हे कळल्याने आनंद वाटला. नाही तर त्याला मग, पांडगो ईलो रे.. प्रमाणे कुणी घर देता का घर असे म्हणत, किंवा वपुंच्या कथेतील एकबोटे प्रमाणे परवानगी घ्यावी लागली असती. (अघळपघळ मधील हॅम्लेटच्या बापाचे भूत) देवदत्त (आमचा व्यासंग इतपतच ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ध
धोंडोपंत Fri, 11/30/2007 - 14:14 नवीन

देवदत्तानूं

देवदत्तानूं, पांडगो इलो रे बा इलो........ हा हा हा हा हा...... पन, एक पांडगो इलो हा . मायझवो, खयसून इलो ते ठाव नाय. त्यांका काय होया, ते पन ठाव नाय. आपला, (मांत्रिक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
स
सृष्टीलावण्या Tue, 03/25/2008 - 21:09 नवीन

पांडगो आला असेल का माहित नाही

पण.... मच्छिंद्र कांबळी व इतर स्वर्गस्थ मराठीप्रेमी साहित्यिक मात्र आवर्जून मिपावर येत असतील... > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
व
विसोबा खेचर Sun, 11/25/2007 - 08:19 नवीन

मांत्रिक प्रियालीशी सहमत...

मांत्रिक प्रियालीशी सहमत... आपला, (पिंपळावरचा मुंजा परंतु प्रियालीचा मित्र) तात्यावेताळ.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/27/2007 - 01:23 नवीन

चालायचंच

मिसळपावावर मिसळीची शिते सर्वत्र पडलेली असताना भुते जमली नाहीत, तरंच आश्चर्य ! - (भूतनाथ) सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/25/2008 - 21:24 नवीन

असा स्वकाया परतप्रवेश मी रोजच करीत असतो!

त्यात चिंतित होण्यासारखे काही नाही! चतुरंग
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 03/25/2008 - 21:31 नवीन

भूतच काय! डुप्लिकेट पण

अहो आपण भूत बनून आलात . मी तर पूर्वी एकदा २ देह धारण केले होते मि.पा. वर. आणि २ वेगवेगळे देह नव्हे तर अगदी शेम टू शेम तेच देह. पण २-२. पण सध्या एकाच आत्म्याने २ देह धारण करायची सुविधा मि.पा. ने बंद केली आहे असे वाटते. (ह.घ्या.) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/25/2008 - 21:33 नवीन

अहो मि.पा. कधी कधी आरसा धरते भुतांसमोर त्यामुळे असेल;०

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/26/2008 - 00:21 नवीन

आयला खरच की!

आणि भूतपण आरशासमोर आल्यावर लई घाबरले बघा.... कारण त्यालाही आरशात भूत दिसले. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
द
देवदत्त गुरुवार, 05/01/2008 - 20:48 नवीन

आज पुन्हा

आज पुन्हा भूताटकी झाली. >:) प्राजुंच्या ताटव्यावर प्रतिक्रिया लिहिली. नंतर कुठल्यातरी लेखात बघत होतो. पाहतो तर लिहिले होते, प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा. :? म्हणजे मला बाहेर हाकलले होते, कार्यक्षम असतानाही. [( म्हणून येण्याची नोंद केली तर सदस्य सूचीमध्ये माझे नाव दोन वेळा दिसले. :O (आता मला वाटते, नवज्योत सिद्धू आणि शत्रुघ्न सिन्हा ह्यांना बोलवावे लागेल, भूताला खामोश म्हणण्यासाठी :-C )
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/01/2008 - 23:17 नवीन

अगदी सेम झालं

माझही आत्ताच...भूताला पाहायला आले आणि पाहिलं, 'प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा'. आणि परत लॉग इन केलं तर माझं नाव दोन दोन वेळा....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा