✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दुसरे मरण (पान ४, अखेर)

ध
धनंजय यांनी
Sun, 11/25/2007 - 21:56  ·  लेख
लेख

Book traversal links for दुसरे मरण (पान ४, अखेर)

  • ‹ दुसरे मरण (पान ३)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10168 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

द
दिगम्भा Mon, 11/26/2007 - 11:58 नवीन

कथा आवडली (बहुतेक)

ही चमत्कारिक व मजेदार आणि /किंवा अतिगंभीर कथा पहिल्या वाचनात अर्धवट समजूनदेखील आवडली. (धनंजयांना का आवडली असावी याचाही अंदाज करू शकतो असे वाटले.) आता पुन्हा एकदा-दोनदा पारायणे करतो व बदललेला किंवा बदलण्याची शक्यता असलेला अभिप्राय नोंदवीन म्हणतो. सध्या तरी फारसा धोका वाटत नाही या योजनेत, आणि तशीही माझी स्मरणशक्ती जरा अधूच आहे त्यामुळे चिंता नाही :) - (धनंजयांचा फ्यान) दिगम्भा
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 11/26/2007 - 17:54 नवीन

बापरे

हा भाग दोन तीनदा वाचूनही स्पर्शिकास्वरुप डोक्याला घासून गेला. बर्‍याच गोष्टी समजल्या नाहीत. तुमचे विश्लेषण वाचायला आवडेल. >>जे घडले त्याला देवही न-घडवू शकत नाही>> हे वाक्य आपण मुद्दाम असे रचले आहे का? न-घडवू शकणे असा वाक्यप्रयोग वेगळा वाटतो. -(धनंजयांचा अजून एक फ्यान) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 11/26/2007 - 19:24 नवीन

सर्वशक्तिमत्ता आणि भूतकाळ बदलणे

"ऐकल्याचे न ऐकल्यासारखे केले" वगैरे शब्दप्रयोगांच्या धर्तीवर "जे घडले त्याचे न-घडले केले" असा नवीन शब्दप्रयोग केला. यात त्या काळातल्या दोन धार्मिक विचारवंतांच्या मतातील फरक दिसतो. थॉमस आक्विनास (हा अजून प्रसिद्ध आहे) असे म्हणतो की जे एकदा की घडले आहे ते "कधी घडलेच नव्हते" अशी सोय देवही करू शकत नाही. पिएर दामियानी (हा आता तितका प्रसिद्ध नाही) असे म्हणतो की सर्वशक्तिमान देव भूतकाळ बदलू शकतो. पिएर दामियानीच्या म्हणण्यानुसार भूतकाळातली घटनाच जर बदलली, तर गडबड होईल, असा या कथेचा रोख आहे. कारण क्षणाचा भेकडपणा खोडला जाऊन तो मुलगा वीरमरण खरोखर प्राप्त झाला तर त्याच्या पुढील आयुष्यात त्याच्या संपर्कात आलेल्या कित्येक लोकांच्या आयुष्यातील तपशील खोटे होऊ लागेल. म्हणजे गानोनने घेतलेला फोटो "न-घेतलेला" व्हावा लागेल, गानोनचे पत्र लिहिलेले होते, ते "न-लिहिलेले" व्हावे लागेल, इ.इ. (हे कारणा-परिणामांचे अगणित तपशील आहेत.) पिएर दामियानीचे म्हणणे वेगळ्या एका प्रकारे खरे होऊ शकते - भूतकाळाची सर्वांची स्मृती बदलू शकते - म्हणजे तथ्यातल्या पुढील घटना तपशीलवार खोट्या होत नाही. त्या तपशिलांना साक्षी असलेल्या ठोस वस्तू हरवल्या तरी चालतील - तो फोटो, ते पत्र - तितकेही पुरे. ज्यांच्या स्मृती खूप थोड्या आहेत, त्यांच्या तेवढ्या बदलल्या तर पुरे. पण ज्यांच्या स्मृती खूप अधिक आहेत, ते त्या सर्व बदलू शकणार नाहीत. ते मरण पावतील तेव्हाच इतिहास पूर्ण बदलेल. आपली स्मृती स्खलनशील आहे असे ठोस पुराव्यांसकट मान्य केल्यामुळे लेखक बोर्हेस हा मरण पावण्याची गरज नाही. या प्रकारे दामियानी आणि आक्विनास या दोन्ही विचारवंतांचे म्हणणे खरे ठरू शकते. (सकृद्दर्शनी परस्परविरोधी वाटले तरी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Tue, 11/27/2007 - 09:23 नवीन

मस्त

विश्लेषण समजले पण हे वाचूनदेखील कथेचा चौथा भाग समजला असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल. मूळ कथा स्पॅनिश असल्याने तिचा तसा उपयोग आम्हाला नाही. ह्या कथेचा इंग्रजी अनुवादही उपलब्ध आहे का? - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Tue, 11/27/2007 - 09:52 नवीन

न्यू यॉर्कर मध्ये अनुवाद १९६८ मध्ये

याचा इंग्रजी अनुवाद न्यू यॉर्करमध्ये १९६८ मध्ये प्रसिद्ध झाला होता (दुवा). पण मी तो अनुवाद वाचलेला नाही. पूर्ण लेख जाळ्यावर नाही, विकत घ्यावा लागेल :-( {म्हणून विकत घेणार नाही, ते आलेच!} कुठल्या एखाददुसर्‍या वाक्याचा इंग्रजी अनुवाद हवा असेल तर तो मी करून देऊ शकतो. दोन्ही युरोपियन भाषा असल्यामुळे, "शिघ्र-अनुवाद" पुष्कळदा जमतो. पण पूर्ण कथेचा इंग्रजी अनुवाद करायची इच्छा नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
व
विसोबा खेचर Tue, 11/27/2007 - 09:00 नवीन

धनंजया!

हद्द आहे रे बाबा तुझी! खूप कठीण कठीण विषयांवरचं वाचतोस आणि स्वत:ही तेवढंच कठीण लिहितोस... मला तर बुवा फारच जड गेलं हे सगळं वाचायला! आपला, (सामान्य) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 11/28/2007 - 01:29 नवीन

कठिण वाक्यांचा इंग्रजी अनुवाद

In the Summa Theologica, it is denied that God may make it so that the past not have been, but nothing is said of the intricate concatenation of causes and effects, which is so vast and so intimate, that perhaps it would not admit of the annulment of a single fact, no matter how remote it may be, without invalidating the present. To modify, is not just to modify a single fact; it is to annul its consequences, which tend to be infinite. To be said in other words; it is creating two universal histories. In the first (let us say) Pedro Damián died in Entre Ríos in 1946, in the second, in Masoller, in 1904. This is the one that we live today, but the suppression of the previous one was not immediate and produced the incoherences to which I have referred. In Colonel Dionisio Tabares the various stages were achieved: at first he remembered that Damián behaved as a coward; later he forgot him completely; later he remembered his impetuous death. The death of the outpost-chief Abarco is no less corroborative; he died, I understand, because he had too many memories of Pedro Damián. Summa Theologica (११) मध्ये प्रतिपादन केलेले आहे, की जे घडले त्याला देवही न-घडवू शकत नाही. पण त्यात कारणा-परिणामांच्या गुंतागुंतीच्या दुव्यांबाबत काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. हे जाळे इतके अफाट आहे, इतके घट्ट विणलेले आहे, की त्यात भूतकाळातली एकही घटना खोडली - ती किती का क्षुल्लक असेना - तर अवघे वर्तमान मिथ्या होण्यास ते पुरेसे आहे. कारण हा बदल केवळ त्या एका तथ्यातला बदल नव्हे. हे म्हणजे त्या घटनेचे सर्व, म्हणजे जवळजवळ अगणित परिणाम नाहिसे करणे होय. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर त्यायोगे दोन वेगवेगळे वैश्विक इतिहास निर्माण होतात. पैकी एकाला (नावापुरता) पहिला म्हणू, त्या पहिल्यात पेद्रो दामियान १९४६ मध्ये एंत्रेर्रीयोस राज्यात मेले, दुसऱ्यात ते १९०४ मध्ये मासोयेरमध्ये मेले. आपण हा दुसरा इतिहास जगतो आहोत, पण पहिला काही सुखासुखी नाही दडपला गेला. त्यातूनच मी सांगितलेल्या विसंगत घटना घडल्या. कर्नल दियोनीसियो तावारेस त्या आदलाबदलीच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून गेले. सुरुवातीला त्यांना आठवले की पेद्रो दामियान भेकडपणे वागले, मग ते त्यांना पूर्णपणे विसरून गेले, त्यानंतर त्यांना त्यांचे धाडसी मरण आठवू लागले. आबार्को यांची बाबही या अनुमानाला जी पुष्टी देते, ती थोडकी नव्हे. श्री. पेद्रो दामियान यांच्याविषयी खूप स्मृती राखल्यामुळे त्यांचे निधन झाले असे मी समजतो.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/28/2007 - 01:40 नवीन

एक सूचना

मी ही पूर्ण कथा एका दमात वाचून काढली. आवडली. मला कथा वाचताना जाणवले ते असे, गावांची नावे, पात्रांची नावे ही मुळातलीच ठेवल्याने, मूळ कथेवरचे लक्ष उडून ती नावे लक्षात ठेवण्यातच मेंदूला फार कष्ट करावे लागतात. सर्व पात्रांची, गावांची नावे अस्सल मर्‍हाटी असती, तर कथा वाचायला अधिक सोपी गेली असती. पानपताच्या लढाईचा सुंदर उपयोग करता आला असता. - सर्किट
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 11/28/2007 - 02:30 नवीन

हेच म्हणतो मी

"मला कथा वाचताना जाणवले ते असे, गावांची नावे, पात्रांची नावे ही मुळातलीच ठेवल्याने, मूळ कथेवरचे लक्ष उडून ती नावे लक्षात ठेवण्यातच मेंदूला फार कष्ट करावे लागतात." मला वाटले माझेच असे होते का!! :) त्यांच्या आया "अनिल, सुनिल" अशी सोपी नावे का ठेवत नाही? ;)
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 11/28/2007 - 02:32 नवीन

अशीच एक कथा

अशीच एक कथा मराठीत वाचल्याची आठवते - शक्यतांचे जग ह्याविषयी. त्या कथेत पानीपत, पेशवे यांचा उल्लेख असल्याचे आठवते, पण बाकी काहिच संदर्भ आठवत नाही. कोणई वाचली आहे का ती कथा?
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 11/28/2007 - 02:50 नवीन

इतिहासाची स्मृति-सापेक्षता हा आणखी एक विचाराचा मुद्दा

या कथेत एका व्यक्तीचा पूर्वेतिहास बदलला. पण सामाजिक स्मृती भरकटली तर देशाचा ज्ञात इतिहास बदलू शकतो. पूर्वीचे दस्तऐवज हरवलेत म्हणजे पुरे - उदा. गानोनचे पहिले पत्र. नवीन दस्तऐवज निर्माण होतात - उदा. कर्नल तावारेसच्या नव्याने गवसलेल्या आठवणींचे पत्र. या कथेवरून हा विचार सुद्धा करता येतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा