काही सुचत नाही
काही टोचत नाही
रस्त्यावरच्या छोट्या मुलीने विकलेली फुलं बोचायची
मनाला सवय तरी होती दुसर्याचा विचार करायची
पण हल्ली मी असले विचारही वेचत नाही
हल्ली मनाला फार काही टोचतही नाही
जरडच झालोय मी, तुटल्यासारखा,
जख्ख म्हातार्या वाळल्या खोडासारखा
तरी आशा आहेच, कधी तरी खोडाला पान येईल
जरड झालेल्या मला, एक विचार करणारं मन येईल.
मग मलाही कणव येईल त्या रस्त्यावरच्या छोट्या मुलीची
मी ही काही तरी करणे लागतो रे, ही उभारी येईल मनाची.
मला काही टोचत नाही, ही निर्लज्ज भावनाही संपुन जाईल
एक दिवस कुणासाठी काही करण्याचे सुख घेवून येईल
पण तोवर सत्य हेच... मी एक जरड जख्ख...
फन सेशन्स !