मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुरूपालट दिनांक २१ नोव्हेंबर २००७

धोंडोपंत ·

माझी दुनिया Tue, 11/20/2007 - 14:53
कन्या, वृषभ आणि मकर राशीला गुरू अनुक्रमे ४-८-१२ वा येत आहे. त्यांच्यासाठी हे भ्रमण शुभ नाही. म्हणजे नेमके काय होईल ते सांगा हो, पंत

In reply to by माझी दुनिया

धोंडोपंत Tue, 11/20/2007 - 20:45
श्रेया ताई, ४-८-१२ वा गुरू त्या स्थानाने दर्शवलेल्या कारकत्वात न्यूनता आणतो. त्यामुळे तो शुभ नाही. जसा अकरावा गुरू हा प्रचंड लाभ देतो तसा बारावा गुरू प्रमाणाबाहेर अनावश्यक खर्च माथी मारतो. चौथा गुरू घरदार आणि मातेच्या संबंधी अशुभ फले देतो तर आठवा गुरू मृत्यूसम पीडा देतो. याचा अर्थ प्रत्येकाला सारखी फळे मिळतील असा होत नाही. वैयक्तिक कुंडलीत लग्नराशीनुसार त्यात बदल होणारच. पण ढोबळपणे ४-८-१२ व्या गुरूची फळे ही अशुभच मिळतील. आपला, (सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

In reply to by धोंडोपंत

माझी दुनिया Wed, 11/21/2007 - 12:36
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद पंत. काही शंका आहेत त्या विरोपाद्वारे आपल्या व्यक्तिगत पत्त्यावर विचारल्या आहेत. त्यांचे निराकरण झाल्यास आनंद वाटेल. तसेच आपल्या जीमेल आयडीवर मी जीटॉक द्वारे आमंत्रण पाठवले आहे. कृपया त्याचा स्वीकार व्हावा; जेणेकरून समक्ष चर्चा करता येईल.

In reply to by धोंडोपंत

ऋषिकेश गुरुवार, 11/22/2007 - 01:32
>> आठवा गुरू मृत्यूसम पीडा देतो बापरे.. वाचून उगाच भिती वाटाली.. असो बघुया काय होतय ते :)

सागर Tue, 11/20/2007 - 15:43
धोंडोपंत गुरुजी, कुंभ राशीवाल्यांनी काय घोडे मारले आहे हो? जरा आम्हाला पण सांगा की हे गुरुभ्रमण आम्हाला कसे जाणार आहे? एका दिवाळी अंकात वाचले होते की कुंभ राशीला हे भ्रमण शुभ असेन मी पण माझी दुनिया यांच्याशी सहमत आहे. शुभ असो वा अशुभ म्हणजे नेमके काय होणार हे जरा सविस्तर पणे दिले तर लई उपकार होतील त्याचे असे आहे की आपण ह्या ग्रहगोलांच्या हातातले बाहुले... तुमच्यासारख्या दशग्रंथी अधिकारी पुरुषाने भविष्य सांगितले तर आम्हा पामरांना दगडास ठेच लागण्याआधी दगड पाहता येईल आणि लक्ष्मी समोर येत असेल तर तिच्या स्वागताची तयारी करता येईल एवढेच धोंडोपंतराव, म्या तर तुमचा मोठा फॅन आहे. मागे माझ्या एका अडचणीत तुमचा बहुमोल सल्ला बराच कामास आला होता. असो... माझ्या कुंभ राशीसकट सर्वच राशींवर कृपा करावी आणि सर्वांचे सविस्तर भविष्य द्यावे ही नम्र विनंती (गुरुभ्रमणाचा फायदा घेण्यास उत्सुक असलेला) सागर

In reply to by सागर

धोंडोपंत Tue, 11/20/2007 - 20:47
सागरराव, कुंभेला फळे चांगलीच आहेत. पुढील अकरा महीने गुरूबळ चांगले आहे. आपला, (अकरावा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

In reply to by धोंडोपंत

सागर Wed, 11/21/2007 - 14:51
पंत एकदम दिलखुश बातमी दिलीत तुम्ही.... मन एकदम तणावमुक्त झाले.... आता येते ११ महिने गुरुबळामुळे आमचे आयुष्य आनंदाने भरुन जाऊ दे ही ईश्वराकडे प्रार्थना धन्यवाद (गुरुबळामुळे आनंदीत झालेला) सागर

भविष्य बघताना, महादशा - अंतर्दशाचे परीणाम सांगताना, लग्नकुंडली पाहतात. मग ह्या गोचरीच्या ग्रहांचे भ्रमण, जन्मराशीवरुन, आपल्यावर काय परीणाम करेल हे पाहणे योग्य की, लग्नराशीप्रमाणे? आता माझी चंद्ररास मिथुन, लग्नरास व्रुश्चिक. लग्नकुंड्लीप्रमाणे मला गुरु धनुत म्हणजे, २ रा - धनस्थानी येतो आहे. चंद्रराशीप्रमाणे तो ७ वा येतो आहे. परीणाम कशावरुन पहायचा? (मला बर्याच महिन्यांपासून हा प्रश्न सतावत आहे) - यशोदेचा घनश्याम

In reply to by यशोदेचा घनश्याम

धोंडोपंत Tue, 11/20/2007 - 20:51
चांगला प्रश्न आहे. गोचर भ्रमणाचे फलादेश हे मुख्यत्वे ढोबळ स्वरूपाचे असतात. अकरावा गुरू म्हणजे सोन्याची खाण हे एक समीकरण आहे. प्रत्येक माणसाचे लग्न भिन्न असल्याने प्रत्येकाला सोन्याच्या खाणीतून सारखेच सोने मिळेल असे नाही. गोचरभ्रमणाचे राशीवरून फलादेश हे जगातील एक बारांश लोकांसाठी सांगितलेले भविष्य आहे. त्यामुळे लग्नावरून फलादेश पाहणे हे जास्त सूक्ष्म आहे. आपला, (तौलनिक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

In reply to by धोंडोपंत

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपल्या अनुदिनीला (http://dhondopant.blogspot.com) माझी सतत भेट असते, नवीन लेख वाचण्यासाठी. मला माझ्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या कुंड्ल्या जमा करुन त्यांचा अभ्यास करण्याचा छंदच आहे. तुमचे लेख खूप आवडतात. (काही शंका विरोपाने विचारेन म्हणतो ! ) यशोदेचा घनश्याम .

विसोबा खेचर Tue, 11/20/2007 - 15:53
खूप चांगली माहिती दिलीस रे बाबा! असाच अधनंमधनं येत रहा आणि मिसळपाववर लिहीत रहा हीच तुला विनंती.... तुझा या शास्त्राचा अतिशय दांडगा अभ्यास आहे हे निर्विवाद! असो, सध्या आम्हा मिथुनवाल्यांचं बरं चाललं आहे, ते तसंच बरं राहील ना तेवढं जरा बघ म्हणजे झालं! :) गोडाधोडाची तशीच मद्यपान-मांसाहाराची, स्त्रीची आणि धनाची लालसा कमी होण्याचे काही उपाय असले तर सुचव रे बाबा! :)) तुझा, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सागर Tue, 11/20/2007 - 16:54
गोडाधोडाची तशीच मद्यपान-मांसाहाराची, स्त्रीची आणि धनाची लालसा कमी होण्याचे काही उपाय असले तर सुचव रे बाबा! :)) तात्या , यावर आपले धोंडोपंत गुरुजी तरी काय करतील? तुम्ही योग दिक्षा घ्यावी हे बरे... एखादा गुरु शोधा म्हणजे तुमची इच्छा पुरी होईल. पण मला वैयक्तिक विचाराल तर तुम्ही का बरे तुमचे गुण सोडून भलते सलते बोलत आहात? अचानक विरक्ती घेऊ नका तात्या... आणि तुम्ही वर उल्लेख केलेल्या गोष्टींची लालसा असणे हा तर मनुष्यस्वभाव आहे त्यातून ब्रह्मर्षि विश्वामित्रही सुटले नाहीत. तर आपली काय कथा? आम्ही तुमच्या ज्या गुणांवर फिदा आहोत त्यांना सोडू नका हो... तुमच्या चाहत्यांवर दया करा... (तात्याभक्त) सागर

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Tue, 11/20/2007 - 18:13
गोडाधोडाची तशीच मद्यपान-मांसाहाराची, स्त्रीची आणि धनाची लालसा कमी होण्याचे काही उपाय असले तर सुचव रे बाबा! :)) त्यातल्या त्यात गोडधोडाची/अतिखाद्यपानाची लालसा आरोग्याला अधिक अहितकारक. कारण स्वस्ताईमुळे जेवढी हाव तेवढी खादाडी करता येते - तिथे आत्मनियंत्रण जरुरीचे आहे. बाकी लालसा असली म्हणून मिळेलच असे सांगता येत नाही. आत्मनियंत्रणाशिवायही बहुतेक लोकांना अतिरेक करता येत नाही ;-)

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत Tue, 11/20/2007 - 20:56
तात्या, गोडाधोडाची तशीच मद्यपान-मांसाहाराची, स्त्रीची आणि धनाची लालसा कमी होण्याचे काही उपाय असले तर सुचव रे बाबा! :)) तुला हे म्हातारपणाचे डोहाळे का बरें लागले? अरे, आत्ता कुठे मिथुनेची साडेसाती संपली आहे. आत्ता मजा करायचे तुझे दिवस आणि लालसा कमी करायच्या गोष्टी करतोस????? झकासपैकी दोन तीन पेग रिचव आणि एखादा मालकंस हाण पाहू आपला, (नशामग्न) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

धोंडोपंत, आनंद वाटला, गुरूपालटाच्या निमित्ताने आपण येथे लेखन केले.

मीन राशींना हा गुरू अनुक्रमे १-३-६-१० वा येत आहे. त्यांनी जप, दान, पूजा यापैकी एखादी गोष्ट करावी म्हणजे पीडेचा परिहार होईल. पंत, केली ना आमची अडचण. जप, दान,पूजा यापैकी आम्ही कोणते निवडावे यावर आमच्या मनात द्विधा अवस्था आहे.  यातले सोपे पूजा वाटते.  स्नान झाल्यावर गणपतीला मनोभावे फूले वाहिली तर चालतील ना !  का काही श्लोक-अष्टकाचे पठण करावे लागेल, आणि कोणते स्त्रोत्र वाचू .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत Fri, 11/23/2007 - 10:51
प्राध्यापक साहेब, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपला, (स्नेही) धोंडोपंत सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति !! आपल्याला जे दैवत भावेल त्याची मनोभावे आराधना करावी हे सर्वात उत्तम. आपण म्हणता त्याप्रमाणे अवडंबर न माजवता केलेली उपासनाच फलदायी होते. आमचे महाराज सांगतात, " दिवसभर पुजारी म्हणून देवासमोर उभे राहण्यापेक्षा एक क्षण भक्त म्हणून उभे रहा"........ क्या बात कही है !! ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात हेच सांगितले आहे, नाही का? देवाचिये द्वारी | उभा क्षणभरी | तेणे मुक्तिचारी | साधियेल्या || आपला, (संतचरणरज) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Fri, 11/23/2007 - 11:29
देवाचिये द्वारी | उभा क्षणभरी | तेणे मुक्तिचारी | साधियेल्या || अहो पण धोंडोपंत, ज्ञानेश्वरांचाच डंका पिटणारे काही जण देवाच्या ऐवजी भलत्याच्याच दारी (संकेतस्थळी!) पोष्टमन बनून जातात त्याचं काय? :) आपला, (ढोंगी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धोंडोपंत Fri, 11/23/2007 - 12:46
तात्या, हे बाकी खरे हो ! आपला पोष्ट्या कुठे आणि कसा कडमडेल याचा काही भरवसां नाही. आपला, (सहमत) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

In reply to by धोंडोपंत

गारंबीचा बापू Fri, 11/23/2007 - 13:15
अहो पंत, तुम्ही अमेरिकेतल्या पोष्ट्याबद्दल बोलत आहात काय? "डाकिया डाक लाया"..... म्हणणारा? तसे असल्यास त्याला पोष्ट्या गजानन म्हणतात. महा उपद्व्यापी माणूस हा . आमचा अण्णा खोत परवडला पण हा पोष्ट्या गजानन नको. बापू

अहो आम्ही डिजीटल लायब्ररी अँण्ड इन्फोर्मेशन सायन्स तसेच मिडीया लायब्ररी या विषयावर चांगले संगणक विद्या शिकवणारे गुरु शोधत आहोत पण पुण्यात ते भेटतच नाहीत. अनेक क्लास पालथे घातले. सगळे मॉड्युलर विद्या शिकवतात. त्येला बी लई पैशे लागत्यात. ल्वॉक म्हन्त्यात सोताच सोता शिका. पन सोताच सोता शिकण म्हणजे ट्रायल ऍण्ड एरर . इथे पुन्यात म्यानेजमेंट गुरु भेटत्यात पन कुनी खरा खरा ज्ञान देनारा गुरु भेटन का? (लग्नी कुंभेचा गुरु, चतुर्थात वृषभेचा चंद्र अन नवमात तुळेचे शुक्र नेपच्चून युती निरयन कुंडलीत असलेला) आम्हाला http://mr.upakram.org/tracker/582 इथे भेटा प्रकाश घाटपांडे

In reply to by मनिष

म्हजी ई कोर्स वानी का? कि लई भानगड अस्तीया. जरा समजून सांगा. मानवी टच नस्तो पन त्येला. क्लास मदी कंपल्शन र्‍हातय. ई मोड मधे स्वयंशिस्त लागतीया. व्हर्च्युअल क्लासरुम च्या डीव्हीड्या आल्यात म्हने मंबईला? पेबलच्या ट्युटर सीडी हायेत पुन्यात. पन आम्हाला लागनार्‍या ईषय न्हाई ना. http://cec-ugc.org/ हित आम्ही केल्ता ई लायब्ररी वर चा . दर आठवड्यात ३ लेक्चर व्यास चॅनेलवर आन मंगळवारी इंटरॅक्टीव्ह सेशन ईएम आर सी मधे तो व्यास चॅनेल कधी दिसलाच नाही आम्हाला. टाटा स्काय वर बी नाई अन केबलवाल्याकड बी न्हाई. प्रकाश घाटपांडे

मनिष Wed, 11/21/2007 - 20:32
ती मुंबईला असते, म्हणून म्हटले. तुम्ही तिला शंका विचारू शकता मेलनी.

नमस्कार धोंडोपंत, मी मिसळ पाव वर प्रथमच येत आहे. मला तुमचा लेख आवडला. ह्यात तुम्ही गुरुचे भ्रमण सांगितले आहे. तसेच सर्व राशिंवर होणारा परिणामही सांगितला आहे. माझी रास व्रुश्चिक आहे आणि ह्या राशिवर होणार्‍या परिणामाबद्दल काहीही भाष्य नाही. तरी मी विनंतीपुर्वक भाष्य करण्याची विनंती करीत आहे. क्रुपाभिलाषी.....

लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, कार्तिक शुध्द एकादशी रोजी म्हणजेच बुधवार दिनांक २१ नोव्हेंबर २००७ रोजी, उत्तररात्री २९ वाजून ०३ मिनीटांनी म्हणजेच गुरूवारी पहाटे ०५ वाजून ०३ मिनीटांनी गुरू वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करतो आहे. ह्या गुरूभ्रमणाचा पुण्यकाल गुरूवारी पहाटे ०३-१२ पासून ते सकाळी ०६-५४ पर्यंत आहे. ज्या लोकांची धनु रास आहे, त्यांच्या राशीत गुरू येत आहे. म्हणजेच त्यांच्या जन्मस्थ चंद्रावरून गोचर गुरूचे भ्रमण होणार आहे. शुभ आणि बलवान चंद्र असलेल्या धनुराशीच्या लोकांना जीवनात येत्या वर्षभरात अत्यंत शुभ अनुभव येतील. कन्या, वृषभ आणि मकर राशीला गुरू अनुक्रमे ४-८-१२ वा येत आहे.

वेड हे रक्तात माझ्या...

अशोक गोडबोले ·

प्राजु Tue, 11/20/2007 - 09:16
अशोक राव, अप्रतिम गजल... संदीप खरे यांच्या "जपत किनारा शिड सोडणे... नामंजूर" या कव्वालीचे आठवण झाली. नाव गेली दूर आता राहिले मागे क्षितीज रोखलेले शोधडोळे चमकती दीपगृहाचे या ओळी विशेष भावल्या... - प्राजु.

Taxonomy upgrade extras
वेड हे रक्तात माझ्या वादळाशी झुंजण्याचे जे किनार्‍याचेच प्रेमी वेगळे सगळेच त्यांचे पेटले वणवे विखारी ज्यात मी झोकून देई वाचवाया कातडी ना, कौल मिळती काळजाचे होऊ दे उध्वस्त आयू, होऊ दे जखमी जटायू घ्येयपथि हे घातलेले गालिचे ही कंटकांचे जो लढे लोकार्थ त्याला भुलविती ना शब्दलेणी दार मौनाचे खुणावी आतले हृदयांतरीचे नाव गेली दूर आता राहिले मागे क्षितीज रोखलेले शोधडोळे चमकती दीपगृहाचे --अशोक गोडबोले, पनवेल.

दुसरे मरण (पान १)

धनंजय ·

विसोबा खेचर Tue, 11/20/2007 - 12:13
सुरवात तरी अंमळ भारीच वाटते आहे बुवा! पुढचे भाग येऊ द्या... मी व्यक्तिश:, अनुवादीत साहित्याचं मिसळपाववर स्वागत करतो... तात्या.

विसोबा खेचर Tue, 11/20/2007 - 12:13
सुरवात तरी अंमळ भारीच वाटते आहे बुवा! पुढचे भाग येऊ द्या... मी व्यक्तिश:, अनुवादीत साहित्याचं मिसळपाववर स्वागत करतो... तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

तिचा रुमाल

मनिष ·

सर्किट Tue, 11/20/2007 - 00:58
मनिष, कविता छान आहे. (आरवार म्हणजे काय ?) त्यानिमित्ताने आपल्या अनुदिनीवर फेरफटका झाला. "ए देश से आनेवाले" खूपच आवडली. त्याचे मराठीकरण शक्य असल्यास येथे टाकायला जमेल का ? शुभेच्छा. - सर्किट

मनिष Tue, 11/20/2007 - 12:25
नक्की सांगता येइल का महित नाही पण "आरवार" म्हणजे sensitive & vulnerable असे म्हणता येइल. "ए देश से आनेवाले" चे मराठीकरण करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. मिलिंद ईमेल पाठवल्यास ते गाणे पाठवतो.

जो दरवळायचा कधी तिच्या गंधानी तो भिजत राहतो आता माझ्या आसवांनी तिचा तो धुंद, मंद गंधही नाही तिचा तो हळुवार स्पर्शही नाही तिचा तो मधात भिजवलेला आवाजही नाही हुरहुर लावणारी, काळीज चिरणारी तिची ती नजरही नाही फक्त तिच्या आठवणींचे धागे जपत, माझ्यासारखा आरवार होतो, माझ्या आसवांत भिजत राहतो; तिचा रुमाल……. ती तोडून जाईल सगळे धागे तिचा गंधही उरणार नाही मागे तिला कळणार नाही माझी वेदना ती ऎकणार ही नाही माझे रडणे ती विसरुन जाईल शपथा वचने विसरुन माझ्या स्पर्शाची थरथर ती होईल त्याच्या स्पर्शासाठी आतुर माझ्यासारखा आरवार होईल, माझ्या आसवांत भिजत राहिल; तिचा रुमाल……. - मनिष
ही कविता आधी

लोकशाही : एक व्याख्या

हरिप्रसाद ·

विसोबा खेचर Tue, 11/20/2007 - 12:16
बंड्या म्हणाला " कळलं बाबा, जेव्हा भांडवलदार कामगारांचे शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ झोपलेले असते . देशाची भावी पिढी मुलभूत प्रश्नांसाठी रडत असते आणि या सर्व गोष्टींचा त्रास सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो. कथेचे तात्पर्य आवडले! :) आपला, (बाहेरख्याली) तात्या.

आलेल्या मेल मधुन साभार .......... थोडी अश्लिलता आहे असे वाटल्यास पटकथेची गरज म्हणुन चु. भु. द्या. घ्या. दररोज शिस्तीचा भाग म्हणुन पेपर वाचणार्‍या बंड्याने त्याच्या बाबांना विचारले " बाबा, शासन व्यवस्था म्हणजे काय हो ? " " त्याचे असं आहे - " बाबा विचार करत म्हणाले, " हे बघ , मी घरात पैसे कमवुन आणतो , म्हणजे मी भांडवलदार ; तुझी आई हा पैसा कसा आणि कुठे खर्च करयचा ते ठरवते म्हणजे ती सरकार ; आपल्या घरात मोलकरीण काम करते ती झाली कामगार ; तु सामान्य नागरिक व तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पिढी. समजलं " बंड्या विचार करत झोपी गेला. रात्री लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला जाग आली.

आढावा...

विसोबा खेचर ·

विसोबा खेचर Mon, 11/19/2007 - 13:01
डेक्कन सिमेंट आणि कॅनफिनहोम ने बाकी मजा आणली बॉस! :) ABC Bearings ही चांगला आहे, पण अभि तलक कुछ बढाही नही, उलटा घटा! :)) म्हणूनच नेहमी 'never put ur all eggs in a single basket' या नियमानुसार काम करावे! कोई बात नही, माल लेके बैठ जाओ! :) तात्या.

माझी दुनिया Mon, 11/19/2007 - 15:58
.तात्या, मला वाटतं तुम्ही जीएमार पण १४७ सुचवला होतात,मी १७५ ला घेतला होता, पण तुम्ही टार्गेट न दिल्याने २५ - ३०% कमावून विकला. अजून काही टिप्स असतील तर अवश्य द्या

जुना अभिजित Mon, 11/19/2007 - 16:42
Deepak Nitrate ( 100 - 105) आजचा भाव ११८, १८% वाढ तात्या दिपक गेल्या ३-४ दिवसात वाढला आहे. गेले सहा-सात महिने यात पुरेसे व्यवहारसुद्धा होत नव्हते. पण एक वर्षापूर्वी हा १६० वगैरे होता. आता तुमचं काय मत आहे? ही वाढ परत दिपक ला जुन्या उच्चांकाकडे घेऊन जाईल काय? अभिजित

In reply to by जुना अभिजित

विसोबा खेचर Tue, 11/20/2007 - 12:20
आता तुमचं काय मत आहे? ही वाढ परत दिपक ला जुन्या उच्चांकाकडे घेऊन जाईल काय? शक्यता नाकारता येत नाही. जाईल असे वाटते! तात्या.

वाटाड्या... Mon, 11/19/2007 - 22:20
SRF 133 ला घेतलेला..१४५ ला विकला...५ दिवसात ९% परतावा...काहि वाइट नाहि..काय म्हणता..??

झकास Tue, 11/20/2007 - 21:52
माझ्याकडे टाटा स्टील आहेत आधीचेच, त्यावर आता rights (५:१) आणि compulsarily convertible pref shar५:१ (९:१०) ची ऑफर आली आहे. त्यात दिलेल्या ह्या ऑफर पेक्षा जास्त शेअर्स साठी सुद्धा अर्ज करता येतोय. त्यात किती टाकले तर थोडे तरी शेअर्स मिळण्याची शक्यता आहे?

गारंबीचा बापू Fri, 11/23/2007 - 13:06
तात्या, हे हिरवे आणि लाल रंग बदलून कसं काय लिहीता येतं? मला तर एकही बटण सापडलं नाही. (अडाणी) बापू

झकासराव Fri, 11/23/2007 - 18:09
इकडे झकास पण आहे काय???????? झकासराव वेगळा आणि झकास वेगळा बर मंडळी.

राम राम मंडळी, साधारण महिन्याभरापूर्वी आम्ही खालील समभाग सुचवले होते - 1) ABC Bearings (89 - 92) - ९० ला मिळत होता. 2) Canfin Home ( 55-58) - ५५ ला मिळत होता. 3) Omax Auto ( 58 -63 ) - ५९ ला मिळत होता. 4) City Union Bank ( 208 - 211) - २०९ ला मिळत होता. 5) First Leasing ( 45 - 47) - ४५ ला मिळत होता. 6) Deccan Cement ( 225 - 228) - २१८ ला मिळत होता. 7) Deepak Nitrate ( 100 - 105) १०० ला मिळत होता. 8) Savita Chemicals ( 260 - 266) २६३ ला मिळत होता. 9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!!

बाजाराचा समतोल

देवदत्त ·

हंस Mon, 12/06/2010 - 15:03
मध्यंतरी मंदीच्या काळात जेव्हा लोकांच्या नोकर्या गेल्या होत्या त्यामुळे मालाला बाजारात उठाव नव्हता कारण लोकांनी अनावश्यक खरेदी बंद केली होती आणि त्यामुळे बाजारात खेळता पैसा कमी झाला होता. तेव्हा बाजारात पैसा वाढवण्यासाठी म्हणजेच लोकांना खरेदीला उद्युक्त करण्यासाठी तैवान सरकारने दोन वष्रांपूर्वी प्रत्येक नागरिकाला चीनी नववर्षानिमित्त ३००० $(तैवान डोलर) भेट दिले होते.

योगी९०० Mon, 12/06/2010 - 16:18
माझ्या आठवणीनुसार त्या गोष्टीचे नाव "man who saved pumpelsdrop" असे होते. गूगल सर्च ने कदाचित चित्रपटाचे नाव पण मिळेल. आत्ता जरा ऑफिसमध्ये असल्याने गुगलून पाहिले नाही. नंतर पहातो.

In reply to by योगी९००

नितिन थत्ते Mon, 12/06/2010 - 16:26
मला पम्पसेलडॉर्फ आठवत आहे पण गूगलवर मिळत नाही. आणि मला ती इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील एक धडा म्हणून आठवत आहे.

देवदत्त Wed, 12/08/2010 - 19:06
३ वर्षांनी खोदकाम? धन्यवाद :) कथेच्या नावाबद्दलही धन्यवाद. त्या कथेवर चित्रपट होताच का असेही वाटायला लागलेय आता. बहुधा मीच ती कथा चित्रपटाची म्हणून ऐकली असेल ;) असो. निदान गुगलवर ते कथापुस्तक तरी मिळाले ह्या निमित्ताने. ह्यातील पहिलीच कथा आहे ती.

काही वर्षांपुर्वी माझ्या बहिणीने मला एका इंग्रजी चित्रपटाची कथा सांगितली होती. एका शहरात मंदीचे वातावरण असते. लोक जास्त काही खरेदी करीत नसतात. काय चाललंय कोणाला काही कळत नसते. एक दिवस एक माणुस कार विक्रेत्याकडे जातो आणि म्हणतो की मला ती महागडी कार खरेदी करायची आहे. मी ख्रिसमसच्या दिवशी घेऊन जाईन. हा विक्रेता विचार करतो की कित्येक दिवस आपण घरात काही चांगल्या,वेगळ्या वस्तू विकत घेतल्या नाहीत. आता जर ही कार विकली गेली तर आपल्याला भरपूर पैसे (रुपांतर :) )मिळतील. मग का नको आपण ही थोडा खर्च करूया. म्हणुन तो घराचे सामान विकणाऱ्याच्या दुकानात जातो आणि स्वत:च्या घराकरीता चांगले सामान घेतो.

मी!

अशोक गोडबोले ·

प्रमोद देव Sat, 11/17/2007 - 11:10
खूपच सुंदर रचना! आयाळ पिंजणारा झोंबे पिसाट वारा दुर्दम्य निश्चयाचे मी शीड रोवणारा ह्या ओळी विशेष आवडल्या.

विसोबा खेचर Tue, 11/20/2007 - 12:18
चुंबावया नभाला झेपावतात लाटा उद्दाम कालियाचे शिर मीच ठेचणारा दर्या अथांग माझी टाकी गिळून नाव तेजाळ रत्नगुंफा तिमिरात शोधणारा तशी संपूर्ण कविताच लय भारी आहे परंतु वरील दोन कडवी विशेष आवडली! तात्या.

ना शोधितो किनारा ना धुंडितो निवारा मी धुंद वादळाशी अविराम झुंजणारा चुंबावया नभाला झेपावतात लाटा उद्दाम कालियाचे शिर मीच ठेचणारा दर्या अथांग माझी टाकी गिळून नाव तेजाळ रत्नगुंफा तिमिरात शोधणारा आयाळ पिंजणारा झोंबे पिसाट वारा दुर्दम्य निश्चयाचे मी शीड रोवणारा धावून ये घनांची रणधुंद मत्त सेना मी नेत्र शंकराचा अंगार ओकणारा आभाळ फाडुनी ये बिजली कडाडणारी नी निग्रही ध्रुवाशी रणनाळ जोडणारा --अशोक गोडबोले, पनवेल.

उद्या सकाळी

धनंजय ·

विसोबा खेचर Sat, 11/17/2007 - 08:01
बापरे! अहो जिथे मराठीतलीच कविता समजायला अतिशय कठीण आहे, तिथे आम्हाला विंग्रजीतली कुठून समजणार? अहो धन्याशेठ, जरा आमच्याकरताही समजायला सहज सोप्या कविता लिहा की! मी तुलना करत नाहीये, परंतु आता उदाहरणार्थ ह्या ओळी पाहा, शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा किती सहज, सोप्या अन सुरेख ओळी आहेत! च्यामारी तुम्ही मंडळी असं साधंसुधं का लिहीत नाही हो? :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Sat, 11/17/2007 - 10:36
आधी येथे अष्टाक्षरी, पानगळीचे वर्णन वगैरे मी लिहिलेच आहे. सुनीताची अन्य कवींची शैली बघितली तर वरील कविता विशेष कठिण वाटू नये. उदाहरणादाखल बालकवींचे एक सुनीत देत आहे (त्याच्या तुलनेने सोपे/कठिण पारखावे.) --- मेघाचें करिं भूर्जपत्र धरुनी अस्ताचलीं प्रत्यहीं स्वर्गींचे नव लेख कुंकुमरसें ती सांध्यदेवी लिही; रात्रीं शांत गभीर अंबुनिधिच्या आनील पृष्ठावरी लज्जालेख लिही विकंपित करें ती तारकासुंदरी; श्यामा निर्झरिणी पुनःपुनरपी सारीत नीलांचलां मुग्धालेख सुरम्य सैकतिं लिही मंदोर्मिमालाकुला; वेलींचे स्वकरें कराग्र धरुनी त्या मंदमंदानिलें क्रीडालेख वनस्थलीहि लिहिती कांहींतरी आपुले. हे सारे मधुलेख घेउनि जगीं नाचोत वेडे कवी, गावों गीतशतें तयांस, मजही त्यांची कळे थोरवी. लज्जामुग्ध परी शिरःकमल तें ठेवून माझ्या उरीं श्वासांच्या कवनीं लिही प्रियतमा ही प्रेमलेखावली. सारे ते मग लेख तुच्छ गमती चित्ताचिया लोचनीं, तीचा अक्षय लेख एकच, उभा मी मग्न पारायणीं! --- बालकवींनी सुद्धा विषयास योग्य असल्यास "हिरवे हिरवे गार गालिचे" लिहिले, आणि विषयास योग्य होती म्हणून ही वरील गुंतागुंतीची शैली निवडली. जर विषय गुंतागुंतीचा असेल तर सोपेच शब्द, सोपेच वृत्त वापरण्याचा अट्टाहास ठीक आहे काय? मराठी भाषा समर्थ आहे, मराठी वाचक-लेखक कमकुवत पडू नये. कारण वाचकाने क्लिष्ट म्हणून वाचायची थांबवली, लेखकाने गुंतागुंतीचे जे ते लिहायचे थांबवले तर जो उरेल तो भाषाप्रयोग एकांगी होईल, आणि इतक्या लांब इतिहासाची ही समृद्ध भाषा गहन अर्थ वाहाण्याच्या दृष्टीने अपंग होईल. (इथे माझी भाषा उच्च कोटीची आहे असे म्हणणे मुळीच नाही, पण विषयानुसारच सोपे-सुटे लिहितो, असे स्पष्टीकरण द्यायचे होते.) धनंजय

In reply to by धनंजय

समजायला जरा अवघड कविता आहे. अष्टाक्षरी रचना आहे, त्याच बरोबर कवितेचा रचना बंधही वयक्तिक आम्हाला मान्य आहे. पण कवितेतून आनंद घेता येत नाही असे वाटते !!! सोपे वृत्त आणि सोपे शब्द कविता वाचनातला आनंद वाढवतात. मात्र शब्दबंधन, क्लिष्ट शब्दरचना वाचकांनी वाचायला हवी असे म्हणत असाल तर ते सुद्धा मान्यच आहे . मग पुन्हा प्रश्न पडतोच वाचकांची अभिरुचीचे काय ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sat, 11/17/2007 - 11:02
पण कवितेतून आनंद घेता येत नाही असे वाटते !!! सोपे वृत्त आणि सोपे शब्द कविता वाचनातला आनंद वाढवतात. हेच म्हणतो! धनंजयरावांच्या विद्वत्तेबद्दल वादच नाही. प्रश्न आहे तो आमच्यासारख्या सामान्य वकुबाच्या मंडळींना काव्य समजण्याचा, त्यातून आनंद घेण्याचा! तो मात्र मुळीच मिळाला नाही. उलट ते कठीण काव्य वाचतांना त्रास मात्र झाला! :) असो, हे आमचं प्रामाणिक मत. चूक धनंजयरावांची नाही, तर आमच्या सामान्य अभिरुचीची आणि आकलनशक्तिची आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Sat, 11/17/2007 - 11:24
अनोळखी व्यक्तीशी लगट, लग्नपूर्व सेक्सवर आजकाल बंधने राहिली नाहीत. (डिस्को, रेव्ह पार्ट्यांमुळे मोठ्या शहरांत तरी. आणि लहान गावांतही व्यभिचारास पूर्वीच्या काळापासून संधी आहे. वेश्याबाजारात व्यापाराची तत्त्वे आहेत - तो प्रकार वेगळा...) शरीर उद्दीपित होणे तर नैसर्गिक आहे. मग आपल्या शरीरसुलभ प्रवृत्तीला आळा का घालावा, का घालू नये, हे डोक्याला त्रास देणारे विचार आहेत. या कवितेतून काही प्रकारच्या वखवखलेल्या संभोगाबाबत विराग निर्माण व्हावा, पण प्रेमाबाबत, कमीतकमी वखवख नसलेल्या संभोगसुखाबाबत, मात्र आशेचा किरण दडपू नये. या कवितेने थोडेसे अस्वस्थ करावे, विचारमग्न करावे - "प्रेमकवितेसारखा" आनंद मात्र मिळणार नाही.

In reply to by धनंजय

प्रेम कवितेतला आनंद इथे नाही हे खालील ओळीतून आम्हाला समजलेच आहे !!! जाता रात्र ती क्रम-क्रमे आस्तेच तूझ्या सवे हाता हात मी शिवुनि ओठा ओठ ही लावले - तो स्फुल्लिंग ठिणकता अंगांग रोमांचले! वाटे जो रुबाब मजला, आता न काही हवे... आता या अनुभवावर आम्ही लिहावे, बोलावे का ? ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Sat, 11/17/2007 - 12:11
या कवितेने थोडेसे अस्वस्थ करावे, विचारमग्न करावे - "प्रेमकवितेसारखा" आनंद मात्र मिळणार नाही. हम्म्म! खरं आहे बाबा तुझं...:) आपला, (स्खलनशील प्राणिमात्र!) तात्या.

सहज Sat, 11/17/2007 - 10:22
नाही आवडले, म्हणजे तुम्ही बहुतेक आवडी-निवडी साठी नसेलच इथे उतरवलेत, काय ते "परायत्त भावानुवाद " उदाहरण म्हणून असेल. :-) आम्हा सामान्यांना हीट किंवा फ्लॉप किंवा ठीक इतकेच कळते :-) सगळेच भांषातर तसेच्या तसे उतरते ह्यावर माझा विश्वास नाही. काव्यातल्या मानवी भावना तर कवी ने ज्या भाषेत केल्या त्यातच चांगल्या शोभतात. अगदी तुम्ही म्हणता तश्या प्रकारची कित्येक गाणी M-TV रोज येत जात असतात. तरी ठेका धरायला लावणारे जेनिफरबाईंचे (जे-लो) हे गाणे बरे आहे की. कदाचित काहींना जास्त आवडेल , कारण एक जबरी शिवी पण आहे शेवटी त्या गाण्यात. ;-)

प्रमोद देव Sat, 11/17/2007 - 11:06
भाषांतर म्हणूनच नव्हे तर एक स्वतंत्र काव्य म्हणूनही हा प्रकार आवडला. बाकी त्यातले व्याकरण वगैरे मी केव्हाच विसरलोय. त्यामुळे त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यास पात्र नाही.जियो धनंजय! अवांतरः धनंजय हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे ह्याची साक्ष त्यांच्या विविध विषयांवरील भाष्याने नेहमी येतच असते. अष्टपैलू असूनही त्यांना त्या त्या विषयात खूपच चांगली गती आहे हेही लक्षात येते. त्यासाठी लागणारा व्यासंगही त्यांचा दांडगा( हा नेहमी दांडगाच का ?इति पुलं.) दिसतोय.

In reply to by प्रमोद देव

धनंजय हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे या बद्दल कोणाचे दुमत नाही. कवीमहोदय, आमची सामान्य माणसाची आवड सांभाळीत नसले म्हणून काय झाले. आपल्यासारख्या अनुभवी आस्वादकांना कविता आवडतात हेही नसे थोडके. खरे तर त्यांची कविता आणि लेखन कवी ग्रेस प्रमाणे वाटते. अहो, त्यांनी लिहिलेला प्रतिसाद दोन-दोनदा वाचावा लागतो तेव्हा थोडेफार समजते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा Sat, 11/17/2007 - 19:14
मराठीपेक्षा मला तुमची इंग्रजी कविता आधी केल्यासारखी वाटली. मराठी हा अनुवाद वाटला, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे नेमके उलटे आहे. आणि का कोण जाणे पण मराठी कवितेचा अर्थ नीट लागला नाही. इंग्रजी कळल्याप्रमाणे वाटली. आणि मराठीचा आणि इंग्रजीचा अर्थ शेवटच्या ६ ओळींत काहीसा वेगळा वाटला. इंग्रजी कविता जास्त सहज वाटली (कदाचित नृत्यांगणाचा संदर्भ असल्याने असेल). मला तुमच्या प्रतिभेचे कौतुक वाटते, पण कविता वाचणे हा एक जास्त करून बुद्धीचा अनुभव ठरतो.

सुवर्णमयी Mon, 11/19/2007 - 19:48
दोन्ही कविता आवडल्या. इंग्रजी कविता जास्त सहज वाटते आहे. त्याच भावनांकरता मराठीची शैली जरा क्लिष्ट वाटली. अशाप्रकारचा विषय हाताळणार्‍या मराठी कविता अनेक असाव्यात. पण मुद्दाम अशी शैली निवडण्यामागे सुनीत हे कारण असावे. तुमचे सुनीत चांगलेच झाले आहे . भावानुवादात शेवटच्या दोन ओळी नेमक्या आल्या असे वाटले नाही, त्याकरता इंग्रजी कविता अधिक प्रभावी वाटली.. एकंदरीत सुनीत हा काव्यप्रकार हाताळायला अवघड आहे असे मला वाटले आणि शैली कृत्रिम होण्याची शक्यता माझी समज आणि बोलीभाषेपासून वा आजच्या मराठी कवितांपासून ते दूर असल्याने असावे. मनोगतावर काही सहजरित्या हाताळलेली सुनीताची उदाहरणे आहेत. त्याचे वृत्त आणि मांडणी वेगळी आहे. -शार्दुलविक्रिडीत ,कलाटणी शेवटी दोन ओळी (माझी मात्र या काव्यप्रकाराने पूर्ण विकेट घेतली आहे.)

In reply to by सुवर्णमयी

सर्किट Tue, 11/20/2007 - 01:02
ाझी मात्र या काव्यप्रकाराने पूर्ण विकेट घेतली आहे. अशा विकेट घेणार्‍या रचानांना पद्य म्हणावे, काव्य म्हणू नये, असे मला फार पुरातनकाळापासून वाटत आले आहे. - (काव्यरसिक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुवर्णमयी Tue, 11/20/2007 - 01:39
अशा विकेट घेणार्‍या रचानांना पद्य म्हणावे, काव्य म्हणू नये, असे मला फार पुरातनकाळापासून वाटत आले आहे. अधेमधे सहित्यिकांच्या मुलाखती , तीन चार आढावे आणि काही समीक्षणे वाचल्याचा हा परिणाम असावा. कोठला साहित्य प्रकारे असे काही म्हणण्याची सवय झाली:० ) त्यामुळे काव्यप्रकार हा शब्द डोक्यात शिरला. तुमचे ऑबजेक्शन बरोबर आहे. सगळे काव्य करायला लागले तर फार पंचाईत होईल.:०) तसे आजकाल चार ओळीचे विडंबन खरडून स्वतःला कवी म्हणवून घ्यायची फार वाईट सवय लागली आहे त्यातून काहीबाही घडत असावे.

प्राजु Tue, 11/20/2007 - 09:59
अवघड असली तरी खूप वेगळी आहे कविता. मराठीपेक्षा इंग्रजी सोपी वाटते. सुनित वगैरे मला नाही समजत. पण अतिशय विचार करून लिहीलेली आहे तुम्ही कविता. तुमच्या अफाट प्रतिभेला प्रणाम...! - प्राजु.

तात्या विंचू Tue, 11/20/2007 - 10:49
अरे बापरे...धनन्जयराव तुमचि कविता वाचुन मला शाळेतल्या ८-९-१० विच्या मराठि विषयाची आठवण झाली. ५-६-७ वी पर्यन्त मराठी ठीक होता..पण नन्तर मला मराठीविषयाची भिती वाटु लागली होती...कवितान्चा अर्थच समजत नसे... मराठीच्या पेपरच्या आदल्या दिवशी जाम टेन्शन......मग काय गाइड मधुन घोकम्पट्टी...... :(

माझ्या या मराठी सुनीताच्यापुढे त्याचा इंग्रजी अनुवाद दिला आहे. तिथे उपक्रमावर अनुवादाविषयी चर्चा चालू आहे, त्याचे उदाहरण माना पाहिजे असल्यास. हा परायत्त भावानुवाद आहे.

बोधकथा लाकूडतोड्याची

विकास ·

In reply to by विसुनाना

विकास Fri, 11/16/2007 - 17:45
अहो ही फक्त मी येथे थोडासा फेरफार करून आठवणीतून उतरवली आहे. तुम्ही पहीले वाक्य पाहीले नाहीत... >>>मिसळपावावर येत असलेल्या सूक्ष्म/दिर्घ वगैरे कथा, पीजे वाचून एक जुनी ऐकलेली गोष्ट आठवली, जरा चढवून लिहीत आहे...

मिसळपावावर येत असलेल्या सूक्ष्म/दिर्घ वगैरे कथा, पीजे वाचून एक जुनी ऐकलेली गोष्ट आठवली, जरा चढवून लिहीत आहे... विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. त्याने झाडाजवळ जाऊन वेताळास खांद्यावर घेतले आणि परत मौनव्रतात पादक्रमण करू लागला. वेताळ विक्रमादित्यास परत पाठीवर उताणा पडलेल्या अवस्थेत राहून गोष्ट सांगू लागला... देव प्रसन्न झाल्यामुळे सुखाने राहात असलेल्या लाकूडतोड्याच्या बायकोने आपल्या नवर्‍यास (म्हणजे त्याच लाकूडतोड्यास) कुर्‍हाड पडलेली आणि देव प्रसन्न झालेली विहीर दाखवण्याचा हट्ट केला. लाकूडतोड्या पण मोठ्या गर्वाने तिला घेऊन गेला.