मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संवादिका - ३

प्रास ·

आतिवास Sun, 06/22/2014 - 10:43
होतं खरं असं! लोकांचं - सहप्रवाशांच्या खासगी जीवनाचे धागेदोरे नकळत आपल्याला कळत जातात - नको असले तरीही!

nasatiuthathev Sun, 06/22/2014 - 12:22
रेल्वेच्या प्रवासात, पूर्वी, शेजारी बसलेल्याच्या वृत्तपत्रात फार नजर जायची. त्यातल्या बातम्या आपण कधी वाचायला लागलो हे देखिल लक्षात यायचं नाही. सध्या वृत्तपत्रांची जागा 'स्मार्टफोन्स'नी घेतलीय, इतकंच.... लोकांचं - सहप्रवाशांच्या खासगी जीवनाचे धागेदोरे नकळत आपल्याला कळत जातात - नको असले तरीही! खूप साऱ्या प्रवासात ( बस ट्रेन ) खूप लोकांचे खाजगी धागेदोरे आहेत मनाच्या कुपीत .... पण कधी कधी त्रास होतो खूप ....

सूड Mon, 06/23/2014 - 22:17
मागच्या आठवड्यात बँकेत गेलो होतो एका फॉर्मवर स्टँप घ्यायला. शेजारच्या काऊंटरवर एक जोडपं कर्मचार्‍याशी बोलत होतं. मला ज्याच्याकडून स्टँप घ्यायचा होता तो काहीश्या कारणाने प्रिंटरपाशी गेला आणि तो येईपर्यंत शेजारचं जोडपं निघून गेलं. मी जिथे होतो तिथला कर्मचारी परत येताच ते जोडपं जिथे बसलेलं होतं तिथल्याने त्याला विचारलं, "ये कौन थे पता है क्या".. "मेरे को हजबंड-वाईफ लगे, क्यों ऐसा नही था क्या?".. "सून..ये जो बंदा बैठा था उसकी ये गर्लफ्रेंड थी..ये बंदा ऑलरेडी शादीशुदा है".. "और गर्लफ्रेंड?" "डिव्हॉर्सी...एक बच्चा है तीन साल का!!" माझ्या फॉर्मवर स्टँप घेतला आणि निघालो, निघता निघता मेघना पेठेंचं नातिचरामि आठवल्याशिवाय राहीलं नाही.

मस्त कलंदर Tue, 06/24/2014 - 21:18
रीटा वेलणकर्/वेलीणकर वाचताना-पाहाताना अशा मुलींची तगमग खूप खोलवर जाणवायची. मी कॉलेजमध्ये असताना कधी वसतिगृहात राहिले नाही परंतु नोकरी लागल्यानंतर वर्किंग वुमन्स होस्टेलवरती काही वर्षे गेली. तिथल्या काही मुलींकडे पाहाताना खरंच वाईट वाटे. लग्न झालेल्या माणसाशी प्रेमसंबंध ठेवणारी म्हणजे काही चांगले नाहीच. अशा वेळेस कर्तीसवरती, नोकरी करत असलेली अथवा वय वाढून मॅच्युरिटीपर्यंत पोचलेली मुलगी असं करतेय म्हणजे काही पौगंडावस्थेतलं प्रेम नव्हे. तरीही सगळं समजून उमजून चाललेलं असतं. एक दोघींनी मन मोकळं केलं तेव्हा प्रथमतः त्यांना पुढे जाऊन इतकं त्रांगडं होईल असं वाटलंच नव्हतं. एकतर १४ फेब, नाताळ किंवा ३१ डिसेंबर हे त्या हॉस्टेलवरचे सगळ्यात डिप्रेसिंग दिवस असायचे. बॉयफ्रेंडस असलेल्या मुली नटून थटून भुर्र निघून जात. त्यादिवशी हॉस्टेलवर असलेल्या मुली म्हणजे सिंगल हे न बोलता कळायचं. इतरांचे बॉयफ्रेंड्स पाहून थोडा कॉम्प्लेक्स आलेल्या, कुणी छान बोललं की थोड्या विरघळलेल्या, मग हळूहळू फ्लर्टिंग, भेटीगाठी इत्यादीमधून आधी अपेक्षा नसायच्या. आणि नंतर मग प्रेमात पडल्यावर हक्काचं माणूस हवं असे. त्या माणसाचं घरी अगदीच वाईट चाललेलं असे असं नाही. निदान मी ऐकलेल्या उदाहरणात तर नाहीच. दोघांच्याही बायका दिसायला बर्‍यापैकी, चांगल्या उच्चपदस्थ, करिअरमध्ये उत्तम अशा होत्या. अशा वेळेस यांना या तरूण मैत्रिणी -ज्या त्यांच्यासोबत भंकस करायला मोकळ्या होत्या आणि बायकोला करिअर-जब्बदार्‍या यातून तिला असल्या छचोरपणासाठी वेळ नव्हता. घरचं कार्य, परदेश वार्‍या किंवा इतर सोशल इव्हेंटसना बायको आणि फक्त लाँग ड्राईव्हला जायला की जिथे यांना दुसरं कुणी पाहणार नाही तिथे या मुली. भेटणं तर दूर, पण एकदा घरी पोचल्यावर फोनवर सुद्धा बोलायची मारामार. रात्री कॉरीडॉरमधून फिरताना खिडक्यांशी मुली फोनवर बोलताना दिसायच्या. एक अगदी आत्महत्येपर्यंत पोचली होती. तिच्या बाबतीत तर ती एकटीच मजेत होती. ही अशी खेळकर सुंदर मुलगी पाहून हा माणूस तिच्या मागे जवळजवळ वर्षभर होता. तेही इरिटेटिंग फ्लर्टिंग नाही तर छान मौजमजेचं. तिने त्याला सर्वतोपरी हे चांगलं नाही, मी इंटरेस्टेड नाही असं सांगत राहिली. फॅमिली फ्रेंड होता म्हणे. नंतर कधीतरी अपसेट असताना त्याने खांदा दिला आणि पुढचं रामायण घडलं. नंतर बरीच भांडणानंतर नात्यात कडवटपणा आला. घरच्यांनी तिचं जुळलेलं लग्न या माणसाने मोडलं तेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं. पुढे काय झालं माहित नाही. यात पूर्ण चूक अशा एकट्या मुलींची नसली तरी ऐकलेल्या गोष्टींमधून अशा नात्यांत अडकलेले पुरूष अधिक निर्ढावलेले वाटले. अपवाद असू शकतील. अवांतरः प्रतिसाद विस्कळित झालाय. अधिक तपशील न देता आणि चांगल्या ओळखीतल्या मुली या प्रसंगातून गेल्या असल्याने प्रतिसाद एकांगी होईल का, असे वाटून हात आखडता घेतलाय.

In reply to by मस्त कलंदर

सूड Tue, 06/24/2014 - 21:41
>>अशा नात्यांत अडकलेले पुरूष अधिक निर्ढावलेले वाटले. बर्‍याच अंशी खरं आहे!! जवळच्या नात्यात असं घडलं तर आपलं नाणं खोटं आहे म्हणून सोडून देण्याशिवाय पर्याय नसतो. कधीतरी या सगळ्यावर लिहायचा विचार आहे. बघू कसा आणि कधी वेळ मिळतो.

पैसा Fri, 06/27/2014 - 17:43
सगळे प्रकार याच आकाशाखाली! यातला पुरुष नेहमीच सेफ असतो. बायकोला कळलंच तर सॉरी, तीच गळ्यात पडली म्हणून वेळ मारून नेतो. बायकोही बिचारी मुलांकडे बघून आणि समाजाच्या भीतीने गप्प बसते. दुसरी असते तिचे हाल तर विचारू नयेत. आपण दोघींवर अन्याय करतो आहोत, दोघींच्या आयुष्यांशी खेळतो आहोत असं एकदाही या लोकांच्या मनात येत नसेल का?

"आहेस का रे?" "आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे." "तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?" "व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?" "माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला." "असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D" "नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..." "असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनीच पडेंगी ना...?" "तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?" "काय झालं? अपसेट वाटतेयस. माझ्या छकुलीला कुणी 'वा' केलं का?" "चेष्टा नकोय रे!

शोधयात्रा (भावानुवाद)

मूकवाचक ·

एस Sun, 06/22/2014 - 11:14
छान प्रयत्न. भावानुवाद तितका तरल झाला नाही. शब्दानुवाद जास्त वाटला. अजून भावपूर्ण करता आले असते का, प्रयत्न करून पहा. अजून थोडे स्वैर व्हा. फलश्रुती नक्की होईल.

कवितानागेश Sun, 06/22/2014 - 23:58
नाही थांबवू शकत आपण शोध घेत रहाणं, कधी चालणं, कधी बुडणं, अन पुन्हा मागे फिरणं, मला माहितीये, आपल्या या अथक शोधयात्रेचं फलित तिथेच प्रकटेल, जिथून आपण वाहात आलोय दूरवर, मग नव्यानीच जाणून घेउ ती गंगोत्री, अन नव्यानीच ओळखू, तुलाही, मलाही... - (द्वैतात रमणारी) माउ

सुधीर Tue, 06/24/2014 - 08:50
T.S. Eliot यांचे हे वाक्य स्टिव्हन कव्हींच्या सेव्हन हॅबिट्स मध्ये वाचले होते. त्या पुस्तकाचा शेवट या वाक्याने आहे. लिमाउंची रचनाही आवडली.

लेखनविषय:
काव्यरस
आम्ही ही अनोखी शोधयात्रा अधुरी कदापी सोडणार नाही मात्र जिथून श्रीगणेशा केला त्या आरंभस्थानी डेरेदाखल होणे अन त्या गंगोत्रीची पहिल्याप्रथम खरी ओळख करून घेणे हीच आमच्या सार्‍या वाटचालीची अंतिम फलश्रुती असेल मूळ काव्यः We shall not cease from exploration And the end of all our exploring Will be to arrive where we started And know the place for the first time. -T.S. Eliot

९६कुळी मराठा आडनावांच्या निश्चितीत मदत हवी

माहितगार ·

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

माहितगार Mon, 06/23/2014 - 09:20
:) 'ज्याला स्वतःला काय माहित नसतं, ते माहित असतं, अन ते माहित करून घेण्याची आणि देण्याची इच्छा असते ', ही माहितगार असण्याची पहिली अट ;) एका विकिपीडिया बन्धू प्रकल्पातील आमची सही He who knows ,wants to know and and loves to keep others informed अशी आहे. धन्यवाद.

आदूबाळ Mon, 06/23/2014 - 03:12
माहीतगारभौ, एक प्रश्न. वर दि. बा. मोकाशींचा उल्लेख आहे. त्यांचंच उदाहरण घेऊन विचारतो. मोकाशींची कन्या माझ्या परिचयाची आहे. तिला विचारून समजा मी "दि. बा. मोकाशी डावखुरे होते आणि त्यांना आमलेटला श्रीखंड लावून खायला आवडे**" अशी विकीलेखात भर घातली, तर - ही माहिती जवळच्या नात्यातल्या व्यक्तीने दिली असल्याने चुकीची असण्याची शक्यता कमी आहे - पण मौखिक माहिती हा विकीसाठी योग्य संदर्भ असू शकत नाही (असू नये) सबब ही माहिती विकीत घालता येणार नाही. तर संदर्भ कसे असावेत या बंदिस्त चौकटीमुळे महत्त्वाच्या माहितीला विकीपीडिया मुकला, असा त्याचा अर्थ होतो का? ______________________________ **असं काही नसावं पण उदाहरणादाखल

In reply to by आदूबाळ

माहितगार Mon, 06/23/2014 - 11:20
चांगला प्रश्न विचारलात. उत्तर जरा लांबतय (संक्षीप्त वाचना साठी काही वाक्ये ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे) पण मला विकिपीडियावरील साहाय्यपानांमध्ये आंतर्भूत करता येत म्हणून सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न असतो.
ही माहिती जवळच्या नात्यातल्या व्यक्तीने दिली असल्याने चुकीची असण्याची शक्यता कमी आहे - पण मौखिक माहिती हा विकीसाठी योग्य संदर्भ असू शकत नाही (असू नये).....
जवळच्याच व्यक्तीने नव्हे तर त्याच व्यक्तीने दिलेली माहितीही चुकीची असू शकते, तीही पडताळली (क्रॉसचेक केली) जावयास हवीच. याचा अनुभव (धडा) पत्रकारांना देण्यासाठी अमोल पालेकरांनी एक किस्सा घडवला (मि.पा. दुवा). निवडणूका अ‍ॅफिडेव्हीट्स मध्ये शैक्षणिक पात्रते विषयी दिलेल्या माहितीतील केंद्रीय मंत्री महोदयांनी केलेल्या त्रुटी, हे तर सगळ्यात अलिकडचे उदाहरण. कोणत्याही व्यक्तीस एकाच व्ह्यूमध्ये प्रीझमच्या सर्व बाजू दिसणे अवघड असते. व्यक्ती आणि प्रसंग यांच आकलन प्रत्येक व्यक्ती आपापल्या कुवतीने/मर्यादेत करत असू शकते, बॅटमनच्या बॅटवर येणारा बॉल शेवटी बॅटमनला कसा दिसला/अनुभवला हे त्या बॅटमनच्या अँगल मधूनच दिसत असते, इतर सर्वांचे केवळ तर्क असतात इतर सर्वांच्या व्ह्यू(अँगल) मध्ये त्रुटी राहतेच. ड्राव्हींगसीट वर बसलेल्याच दृश्य शेजारच्या व्यक्तीलाही जसंच्या तस दिसत नाही. वर म्हटल्या प्रमाणे व्यक्ती स्वतःही वस्तुस्थितीचा विपर्यास करत असू शकतेच. घरी दर दोन मिनीटांनी चहा घेणारी व्यक्ती, मी चहा घेतच नाही किंवा मी हल्ली चहा सोडलाय, आज उपवास आहे अशी लोणकढी मारत असू शकते किंवा बाहेर दारू घेऊन घरी मात्र मी दारू कधी घेतच नाही म्हणू शकते. अपघात झाल्यानंतर अपघातास कारणीभूत सर्वच व्यक्ती सहसा दोष नाकारतात पण अपघात तर झालेला असतो. त्यामुळे अपघात झाला हे तथ्य नोंदवण सोप असत अपघात का झाला याच अंतीम सत्य कदाचीत कुणालाच कधीच माहिती होणार नाही. अपघात घडताना उपस्थित व्यक्ती तिसर्‍याच दिशेने पाहत असलीतरी अपघातस्थळावर अनुपस्थित व्यक्तीपेक्षा अपघातस्थळावर उपस्थित व्यक्तीवर अधिक विश्वास ठेवतो एवढेच. हि सत्याची नव्हे सत्याची माहिती होण्यातली मर्यादा स्विकारूनच कोणत्याही संदर्भ असलेल्या अथवा संदर्भ नसलेल्या माहिती कडे पाहिलेले चांगले. अपघाताची माहिती घेणारा पत्रकार मौखीक माहितीवरच अवलंबून असतो. फक्त एकाच व्यक्तीकडून घेतलेल्या माहितीवर अवलंबून न राहता अधिक व्यक्तींकडून माहिती घेऊन वृत्तांकन करणे अभिप्रेत असते. एकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतर वृत्तांकनात त्रुटी असतील तर काही वाचक निदर्शनास आणून देतील, इतर वृत्तसंस्था च्या वार्तापत्रात कदाचीत वेगळी तथ्य पुढे येतील. कोर्टात साक्षीदारांची शहानिशा वकील मंडळी त्यांच्या पद्धतीने करू शकतात (आणि तिथेही साक्षीदार उलटू शकतात). ज्ञानकोशात लेखन करताना वृत्तपत्रातील वार्तांकने ते न्यायालयाचा निर्णय असे जेवढे स्रोत उपलब्ध होतील तेवढ्यांचे संदर्भ देऊन समतोल लेखन करण्याचा प्रयत्न असतो. वेगवेगळ्या स्रोतांनी दिलेल्या माहितीत तफावत येत असेल तर तफावत शोधण्याचा आपल्या मर्यादीत साधनातून प्रयत्न करणे आणि तफावत स्पष्ट न झाल्यास माहितीतील तफावत जशीच्या तशी नोंदवणे ज्ञानकोशीय लेखकाने करावयास हवे. मौखीक माहितीवर अवलंबून ज्ञानकोशीय लेखन केले जाऊ नये हे खरेच पण मौखीक माहितीमुळे उपलब्ध स्रोतातील संदर्भातील माहितीत कमतरता तर नाहीना हे शोधण्याची प्रेरणा मिळू शकते. मौखीक माहिती प्रथम माबो अथवा मिपा सारख्या संस्थळावर आली (वृत्तपत्रे प्रकाशित पुस्तके इत्यादी माध्यमातून) अनेक वाचकांच्या नजरे खालून गेली त्या माहितीच्या अचूकते बद्दल उहापोह झाला की ज्ञानकोशासाठी या माहितीचे संदर्भमुल्य वाढू लागते. संदर्भमुल्य जेवढे चांगले तेवढी माहितीची विश्वासार्हता वाढते हे जेवढे महत्वाचे तेवढेच, केवळ संदर्भमुल्याने कोणतीही माहिती अंतीम सत्य म्हणून धरून न चालण्याचे भानही महत्वाचे असते हे या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते.
तर संदर्भ कसे असावेत या बंदिस्त चौकटीमुळे महत्त्वाच्या माहितीला विकीपीडिया मुकला, असा त्याचा अर्थ होतो का?
संदर्भ कसे असावेत या चौकटीमुळे ज्ञानकोश माहितीपासून मुकला असे होऊ शकतेच. ज्ञानकोश माहितीस विश्वासार्हता प्राप्त होण्याच्या माहितीचक्रातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो पण ज्ञानकोशकारांना आणि ज्ञानकोश वाचकांना आपण अंतीम सत्य मांडत अथवा वाचत नाही आहोत हे भान असले म्हणजे, ज्ञानकोशांची जी मर्यादा आहे ती मोकळ्या मनाने स्विकारणे सोपे जाते. वस्तुनिष्ठ नोंदी ठेवण्याच्या संस्कृतीत आपण भारतीय लोक पाश्चात्यांच्या तुलनेत बर्‍यापैकी मागे पडतो ग्रामीण विभाग तर अजून मागे पडतात, मौखीक गोष्टींवर अधीक अवलंबून राहतो; त्यात अनेक माननीयांच्या प्रसिद्धी पराङमुखतेची भर पडते. मग माहितीचे पुरेसे स्रोतच मिळत माहीत माहिती पडताळणे अवघड जाते. त्यामुळे इंग्रजी विकिपीडिया संदर्भ संकेतांची अंमलबजावणी अधीक कठोर असूनही, इंग्रजी विकिपीडियातही कुणी चॅलेंज केल तर संदर्भ देण आवश्यक होत, पण कमी प्रमाणात का होईना मौखीक माहिती तेथेही अंशतः स्विकारली जातेच. बहुतेक भारतीय भाषी विकिपीडिया कमी अधिक प्रमाणात इंग्रजी विकिपीडियाची नक्कल करतात नाही असे नाही. मराठी विकिपीडियात सामाजिक-राजकीय हेतुपुरस्सरता नसेल या अटीवर ग्रामीण क्षेत्रातून येणार्‍या माहिती साठी आणि प्रसिद्धी पराङमुख संगित क्षेत्रातील मान्यवरांसाठी संदर्भांच्या बाबतीत अधिक लवचिकता दाखवावी असा माझा स्वतःचा आग्रह असतो. आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

माहितगार Wed, 08/27/2014 - 09:14
दशमान पद्धतीत दहाचे धन घातांकाच्या किंमती सहस्र, लक्ष, अब्ज वगैरे वापरतात तशा दहाचे ऋण घातांकाच्या किंमतींना कोणते शब्द वापरतात? मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मागितली गेलेली माहिती

माहितगार Wed, 08/27/2014 - 09:16
कान्होजी आंग्रे यांनी चिपळूण(दसपटी)येते कधी लढाईस गेले होते का? दसपटी चिपळूण तालुक्यातील कळकवणे गावाच्या माथ्यावर (बारवाई) बारराव कोल्हे यांचा नायनाट कोणत्या सरदारने केला * मराठी विकिपीडियाच्या मदतकेंद्रावर मागितली गेलेली माहिती

In reply to by माहितगार

गुंड्या Wed, 02/10/2016 - 18:01
विनय कोरे - विनय विलासराव कोरे तात्यासाहेब कोरे - विश्वनाथ आण्णा कोरे जाता जाता - तात्यासाहेब कोरे राजकारणाच्या फंदात फारसे पडले नाहीत.कदाचित म्हणूनच वारणा समूहाची निर्मिती करु शकले!

माहितगार गुरुवार, 04/30/2015 - 18:55
Photolithography बद्दल इंग्रजी विकिपीडियावर लेखही आहे पण क्लिष्ट तांत्रिक भाषेमुळे काही समजला नाही. छायाशिलामुद्रण (Photolithography) म्हणजे काय ? ह्या बद्दल सर्वसामान्य मराठी वाचकास सहज समजेल अशी थोडक्यात ओळख करून हवी आहे. धन्यवाद

माहितगार Sun, 01/24/2016 - 21:43
सुमती क्षेत्रमाडे (जन्म : इ.स. १९१५) या मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका . मराठी आणि इंग्रजी विकिपीडियात माहिती 'वर्तमान काळ' लिहून दिली आहे. मराठी विकिपीडियावर मृत्यूवर्ष नाही इंग्रजी विकिपीडियावर 7 March 1913 – 1997 अशी तारीख दिसते. याचा अर्थ मराठी आणि इंग्रजी विकिपीडियातील जन्म -मृत्यू ? विषयक नोंदी जुळत नाहीत. खात्रीशीर माहिती हवी आहे.

माहितगार Wed, 02/10/2016 - 16:26
मराठी विकिपीडियावर एका नवागत सदस्याने अलिकडे खालील काही माहिती टाकली आहे. प्रथमदर्शनी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता सांशकीत वाटते -सद्यस्थितीत तरी खालील लेख वगळले जाण्याची शक्यता असू शकते- तरीही कुणास काही अधिक माहिती अथवा दुजोरा देणे शक्य असल्यास स्वागत असेल. १) "[[Kale taluka Karad|अजित अनंत देसाई]]- जन्म २३/६/१९६३ - यांनी बि.ए.एम्.एस्.पर्यंतचे शिक्षण घेतले असून ते शेतीचे गाढे अभ्यासक आहेत प्रगत तंत्रद्न्यानाचा वापर करून अधुनिक शेती करणारे प्रयोगशिल शेतकरी असा त्यांचा नावलौकीक आहे सांस्कृतीक वारसा जपताना सर्वसमावेषक विकास साधने ही त्यांच्या पुर्वजांपासून चालत अलेली परंपरा त्यांनी अखंडीत सुरू ठेवलेली आहे असे व्यक्तीमत्व [[Kale taluka Karad|काले व पंचक्रोशीतील]] सर्वमान्य नेतृत्व आहे." २) पवार-पाटील घराणे कसबा बावडा मराठी विकिपीडियावर आडनाव विषयक लेख असतात पण विशीष्ट घराण्याबद्दल लेख लिहिताना ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून अधिक माहितीचे स्वागत असेल.

माहितगार Tue, 02/23/2016 - 15:23
मराठी विकिपीडियावर शहाण्णव कुळी मराठा नावाचा सहा वर्षांपेक्षा जुना लेख आहे. खरेतर मराठी विकिपीडिया लेखात (शक्यतो ससंदर्भ अथवा दुजोरा असलेली माहितीवर आधारीत) परिच्छेद लेखन करणे अभिप्रेत असते. तसे त्याही लेखात कुणी केले तर हवेच आहे. या लेख पानावर सध्या परिच्छेद माहिती मजकुर काहीच नाही, केवळ कुळांची/ आडनावांची यादी आहे. कदाचित कुळांच्या संख्ये पेक्षा आडनावांची संख्या अधिक असेल, किंवा इतर काही कारणे असतील पण यादीतील कुळनावे/आडनावे आता पावेतो ५० च्यावर वेळा मागच्या पाचसात वर्षात बदलली गेली असतील म्हणजे ती यादी अजूनतरी स्थिर होत नाही आहे. मराठा (जात) या लेखातून बहुधा हि यादी स्थानांतरीत केली तेव्हा यादीतील नाव यादी अशी होती (त्याआधी) सुद्धा आणि त्यानंतर या यादत सातत्याने बदल होत राहीले आहेत. यादीतील प्रत्येक केलेला फरक तपासून कोणकोणत्या आडनावांचे/कुळनावांचे क्लेम आहेत ते तपासून शक्य असल्यास यादीचे प्रमाणिकरण अथवा निश्चितीकरण कि ज्यात निश्चितपणाने असलेली नावे आणि आणि तेवढे निश्चितपणे सांगता येत नाही पण क्लेम आहे आणि दुजोरा आहे अशा पद्धतीने अद्ययावत कुणास करता आल्यास मराठी विकिपीडियावर शहाण्णव कुळी मराठा या लेख पानास लेखन साहाय्याची गरज आहे. या उठाठेवीचा उद्देश केवळ ज्ञानकोशीय आहे.

*या धागा लेखातील प्रतिसादांना खात्रीशीर माहितीची दुजोर्‍यांची गरज असते. जस जशी माहिती लागेल तसे प्रतिसादात विनंती/प्रश्न लिहिली असते. धागा लेखाचे पहीले शीर्षक खात्रीशीर माहिती सांगा असे होते. ज्या पद्धतीची माहिती लागेल तसे शीर्षक बदलले जाते. आपण सध्या विनंती केलेल्या प्रतिसादास उत्तर देऊ शकता तसेच मागील विनंत्या अभ्यासून शक्य असल्यास त्याबद्दलही माहिती देऊ शकता. सध्या विचारलेल्या प्रश्नासाठी शेवटच्या प्रतिसादापाशी जावे. विकिपीडियावर लिहिणारे बहुतांश लोक ऑनलाईन उपलब्ध माहितीवर अवलंबून असतात.

श्रद्धा म्हणजे...

अत्रुप्त आत्मा ·

चौकटराजा Sun, 06/22/2014 - 10:45
कविराय ब्वॉ , फारच अर्थवाही कविता ! श्रद्धा म्हणजे पुनःपुनः येणार्‍या अनुभवाचा पारिपाक तिच्या शिवाय जग चालत नाही. व ती दरवेळा उपयोगाला येतेच असेही नाही.

एस Sun, 06/22/2014 - 11:08
बुवा, कविता आवडेश. पुढील वेडाच्या प्रतीक्षेत.

कंजूस Sun, 06/22/2014 - 12:43
श्रध्दा महणजे स्वकृतीचा खेळ बराच जड जातो स्वत:वर येता वेळ . खरोखर कवीबुवा . मंत्र ,जादू ,ज्योतिष ,वैद्यक या विद्यासुध्दा जाणणाऱ्यांना कधी तरी गोत्यात आणतात .

चालायचच, अश्रध्दांना श्रध्द लाचार, केविलवाणे, बिचारे वाटतात तर श्रध्दांना अश्रध्द उध्दट, हेकेखोर व आत्मकेंद्री वाटतात. कारण कुणाची श्रध्दे वर श्रध्दा असते तर कुणाची अश्रध्देवर श्रध्दा असते. कोणी श्रध्देने श्रध्देवर प्रहार करत असतो, तर कोणी श्रध्देने अश्रध्दाला श्रध्द बनवायचा प्रयत्न करत असतो. अश्रध्द श्रध्देने त्यांच्या अश्रध्देवर ठाम असतात, तर श्रध्द अश्रध्दांच्या श्रध्दे विषयी साशंक असतात. श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रचेतस Mon, 06/23/2014 - 14:24
श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे.
दुसरी ओळ थोडासा बदल करून लिहितो. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे दांभिकांचे मात्र फावते हाच खरा वांदा आहे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्या Mon, 06/23/2014 - 19:09
श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात.
अश्रद्धांना श्रद्धांच्या श्रध्देबद्दल चिंता नसती तर काय घडले असते याची एक छोटीशी झलकः १. आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते. २. आजही स्त्रीया पतीच्या मृत्यूनंतर सती गेल्या असत्या. ३. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगणारी स्त्री चूल आणि मुल यांतच अडकून पडली असती. ४. पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीसाठी आजही सर्रास नरबळी जात राहिले असते. ५. आजही भारतीयांनी समुद्र ओलांडून जायचं धाडस केलं नसतं. ६. आजही सर्पदंशाने, विंचूदंशाने मांत्रिकांकडून विष उतरवण्याच्या नादात अनेक माणसे जीवाला मुकत राहीली असती. ७. अनेक साथीचे आजार देवीच्या कोपाने झाले असे मानून बळी जात राहीले असते. असो... यादी न संपणारी आहे.

In reply to by धन्या

स्पा Mon, 06/23/2014 - 19:50
धनाजीपंत तुम्ही आणि वर बरेच जण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात असे वाटले. बाकी चालु द्या

In reply to by स्पा

धन्या Mon, 06/23/2014 - 20:09
सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते. श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. वर मी दिलेली उदाहरणे ही श्रद्धेचीच उदाहरणे आहेत, ज्यात काही तथ्य नव्हते. जेव्हा विवेकवादी चळवळ सुरु झाली तेव्हा सुधारकांना लोकांच्या सार्‍याच श्रद्धांना थेट हात घालायचा नव्हता. म्हणून त्यांनी देव आणि धर्म याच्याशी निगडीत श्रद्धांना नुसतेच "श्रद्धा" म्हणण्यास सुरुवात केली. आणी उरलेल्या बाकी श्रद्धांना त्यांनी "अंधश्रद्धा" असे नांव दिले. सुधारणांचा गाडा पुढे सरकण्यासाठी ती आवश्यक गोष्ट होती.

In reply to by स्पा

धन्या Mon, 06/23/2014 - 20:30
पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात.
होय.
बरे अश्रद्ध म्हणजे काय?
ज्याची श्रद्धा नाही तो.

In reply to by स्पा

धन्या Mon, 06/23/2014 - 20:49
आज ज्या प्रथांना आपण "अंधश्रद्धा" समजतो, त्या प्रथा शे-दोनशे वर्षांपूर्वी प्रचलित होत्या तेव्हा त्या धर्मश्रद्धाच होत्या. त्यांना अंधश्रद्धा हे नांव अगदी अलिकडच्या काळात विज्ञानाने त्यांचा फोलपणा सिद्ध केल्यावर चिकटले. न जाणो आज ज्या "श्रद्धा" आहेत त्या येणार्‍या काळात विज्ञानातील प्रगतीमुळे "अंधश्रद्धा" म्हणून मोडीत निघतील. संयमीत प्रतिसादासाठी धन्यवाद. :)

In reply to by धन्या

आयुर्हित Tue, 06/24/2014 - 23:06
विज्ञानातील प्रगतीमुळे "श्रद्धा" फलदायी व "अंधश्रद्धा" मोडीत निघाली. हा पहा बेलर यूनिवर्सिटी चा शोधः पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में शामिल होने से तनाव के स्तर में कमी आती है। बेलर यूनिवर्सिटी के शोधकर्ताओं की मानें तो इसका असर ऑफिस में इनसान के प्रदर्शन पर भी दिखता है। वह न सिर्फ काम में ज्यादा मन लगा पाता है, बल्कि उत्पादन क्षमता बढ़ने से उसके प्रमोशन और वेतन-वृद्धि की संभावनाएं भी बढ़ जाती हैं। शोधकर्ताओं ने एक हजार से कर्मचारियों की कार्य क्षमता पर धर्म और आध्यात्म का असर आंका। उन्होंने पाया कि ईश्वर में यकीन रखने, नियमित रूप से पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में बढ़-चढ़कर हिस्सा लेने वाले लोग पेशेवर जीवन में ज्यादा सफल होते हैं। वे बॉस की नजरों में अच्छी छवि तो बना ही पाते हैं, साथ ही सहकर्मियों से उनके संबंध भी अच्छे होते हैं। साभारः धर्म-कर्म में यकीन करने वाले ज्यादा सफल Rodney Stark points out that religious individuals are more engaged in secular organizations than secular folks. This moves our conversation into the realm of civic (political) involvement, and again the data show that religiously-active individuals shine in this area as well, and this includes not only evangelical Protestants, but Catholics, Jews, and members of other faith traditions. How Religion Benefits Everyone, Including Atheists

प्रभाकर पेठकर Mon, 06/23/2014 - 20:42
श्रद्धा म्हणजे सावंतांची, श्रद्धा म्हणजे देशपांड्यांची श्रद्धा म्हणजे जीवाला त्रास, (बाकी) कुळकर्ण्यांची श्रद्धा म्हणजे सगळ्यांमध्ये खास

In reply to by प्रभाकर पेठकर

चौकटराजा Wed, 06/25/2014 - 08:32
शाहीद अफ्रीदी , सनत जयसूर्या.....म्याकलम, युवराज, ........ रवी शास्त्री , गॅरी सोबर्स.......सगळ्यावर कडी.....पी हाटेलवाला !

म्हैस गुरुवार, 06/26/2014 - 13:01
आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते.
हे मात्र आपल्याकडे नवतं हं . सुर्य पृथ्वी भोवती फिरतो हे पश्चात्याचं मत होतं . आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे

In reply to by म्हैस

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 19:32
आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती. :)

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 23:07
पण बुवा रागवू नका. खरं सांगते. यावेळी कविता उत्स्फूर्त वाटली नाही. यमके जुळवून केल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे 'कोलोनियल कझिन्स'च्या काही पुरातन रचना उगाच आठवल्या. तुम्ही तुमच्या प्रतिभेला यमकांचे कुंपण घालू नका. तिला मुक्तछंदात उधळू द्या!

म्हैस Fri, 06/27/2014 - 14:47
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती.
महाराज, सूर्याला नव्ग्रहन्मधे गणल जातं का ? अरे हो ,तुम्ही ञानेश्वरी वाचली नाहीये नाही का . ४ था अध्याय वाचलात तर कळेल.

श्रद्धा म्हणजे आधी असतो कल्पनांचा भास श्रद्धा म्हणजे नंतर होतो त्यां'चाच पहिला श्वास श्रद्धा म्हणजे आधी असतो जाणिवांचा खेळ श्रद्धा म्हणजे नंतर होतो फुकट जाणारा वेळ श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी दो वक्ताची रोटी श्रद्धा म्हणजे काही तोंडी सहज पडलेली बोटी! श्रद्धा म्हणजे काहिंसाठी pre plan जुगारी अड्डा श्रद्धा म्हणजे कुणासाठी स्वत:च पडायचा खड्डा श्रद्धा म्हणजे कुणी करतात ठरवून मोठ्ठी होळी श्रद्धा म्हणजे कुणी मारतात ठरवून छुपी अरोळी श्रद्धा म्हणजे भोळं भाबडं बिन रंगाचं कापड श्रद्धा म्हणजे उघड्या डोळ्यांना बंन्द करणारी झापड श्रद्धा म्हणजे मी(ही) म्हणतो क्रुतीवरचा विश्वास क्रुतीच करणे हा श्रद्धेच

पानिपत..... जाहल्या काही चूका

आशु जोग ·

मराठी कथालेखक Sat, 06/21/2014 - 18:02
पानिपत दोन तुल्यबळांतील लढाई होती. यावेळी काँग्रेस फार कोलमडलेली होती. मोदींचा चेहरा नसता तरी यावेळी काँग्रेसचे काही खरे नव्हते. म्हणून दुर्बल काँग्रेसचे पानिपत झाले याशी असहमत.

चौकटराजा Sun, 06/22/2014 - 08:56
काँग्रेस पक्ष ही एक गोची आहे म्हणून तिचा अंत हा अपरिहार्य आहे.लीडर व्हावे म्हणून एखाद्याला साकडे घालायला लागणे. या सारखे दुरवस्था कोणत्याही पक्षाची नसेल.त्य पक्षात आत पुढारीच शिल्लक नाहीत. सोनियांची कृपा म्ह्ण्णून सुशीलकुमार , विलासराव, पृथ्वीराज बाबा ई ई मुख्यमंत्री झाले. यशवंत राव चव्हाण व काही प्रमाणात वसंतराव नाईक व काही प्रमाणात शरदराव पवार या खेरीज महाराष्ट्रात एकही स्वयम्भू मुख्यमंत्री झाला नाही. अतः महाराष्ट्र कंग्रेसचा दिलीवरचा दबावच संपला. बाकी आपण लक्षांत घेतलेले मुद्दे महत्वाचे आहेतच पण सर्वाना घेउन जाणारा म्हणजे हा पक्ष नक्की कुणाचा ? कामगारांचा तो तर नाहीच. शेतकर्‍याना त्यानी वाटलेले पैसे मधेच गडप होतात अशी वार्ता आहे. त्यामुळे ते शेतकर्यांचे ही नाहीत. ते भटांचे व शेटजींचे तर नाहीतच नाहीत. त्यांच्यातून फुटून ममता, शरद पवार ई ई बाहेर पडलेले आहेतच. देशात कटू निर्णय चालतील पण ते श्रीमताना, आमदाराना, पंतप्रधानाना, राज्यपालाना, नगरसेवकाना, बेकयदेशीर बांधकामाना, अतिक्रमणाना, करबुड्व्याना वगळून होणार असतील तर या देशाचा भयानक भविष्यकाळ असणार आहेच.

In reply to by चौकटराजा

मुक्त विहारि Sun, 06/22/2014 - 09:49
.....ते श्रीमताना, आमदाराना, पंतप्रधानाना, राज्यपालाना, नगरसेवकाना, बेकयदेशीर बांधकामाना, अतिक्रमणाना, करबुड्व्याना वगळून होणार असतील तर या देशाचा भयानक भविष्यकाळ असणार आहेच.....

छान आढावा घेतला आहेस आशू.पूर्वी[१९७८ च्या सुमारास] १ रुपयाच्या नोटेवर मनमोहन सिंह-सेक्रेटरी-मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असे लिहिलेले असायचे. असे हे व्यक्तिमत्व पंप्तप्रधान होईल असे वाटले नव्हते.राजकारणात फक्त होयबा असून चालत नाही.जनतेच्या विरोधात राजकारण करणार्‍यांना,तुंबड्या भरणार्‍यांना जरब बसवण्यात ममो कमी पडले.

लेखनप्रकार
यंदाच्या २०१४च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचं पानिपत झालं याचं कारण त्यांच्याकडून काही चूका झाल्या. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पण ते करतील का ? वास्तविक आत्मचिंतन सगळ्यांनीच करायला हवं. जिंकणार्‍यांनी आणि हरणार्‍या दोघांनीही. असो सध्या काँग्रेसबाबत... .. २००४ साली UPA 1 आलं. मनमोहन त्याचे प्रमुख बनले. लोकांना फार आशा होत्या. बर्‍यापैकी शैक्षणिक करीयर आणि भूषवलेलं मोठं पद ही जमेची बाजू होती. पण शासनावर त्यांची किती पकड होती हा प्रश्नच होता.

फेसबुकवरील जुन्याचर्चा कशा शोधाव्यात ?

माहितगार ·

अक्शु Sun, 06/22/2014 - 16:21
मला मिपाच्या संदर्भात हेच विचारायचं. मिसळपाव वर देखील जुने लेख कसे शोधावेत हा प्रश्नच आहे.उदाहरणार्थ मी मिपा सुरुवातीला वाचायचो पण सदस्य नव्हतो. तेंव्हा एक धमाल लेख वाचला होता ज्यात टिपिकल बोलीवूड प्रेमकथांचा विनोदी अंगाने समाचार घेण्यात आला होता आणि मिपावरील सर्व धमाल धाग्यांप्रमाणेच मूळ लेखापेक्षा प्रतिक्रिया फारच भारी होत्या. पण लेखाचे किंवा लेखकाचे नावच आठवत नसल्याने धागा शोधणे शक्य झाले नाही.

फेसबुक मध्ये ग्रूप्स, पेजेस आणि टाईमलाईन अशा तीन ठिकाणी चर्चा करता येते. पण या चर्चा तशा वाढत जातात. माझ्या सारखी व्यक्ती क्वचीतच फेसबुकवर जाते. आपण आपापसात केलेली जुनी चर्चा कशी शोधावी. ? विशीष्ट ग्रूप्स, पेजेस, टाईम लाईन आणि ज्या दोन सदस्यांमध्ये चर्चा झाली त्यांची नावे देऊन जुनी चर्चा शोधता येते काय याची माहिती हवी आहे.

अ‍ॅकलेशिया कार्डिया-३ - सुटका

तिमा ·

कवितानागेश Sat, 06/21/2014 - 13:26
तिमाकाका, आत्ता तुम्हाला ऑनलाईन पाहिल्यावर हेच विचारणार होते, की आता बरे झालात का? :) आता अकलेच्याकांद्याचा काही प्रॉब्लेम नाही हे बघून बरं वाटलं.

आयुर्हित Sat, 06/21/2014 - 13:50
या सर्व त्रासातुन मुक्तता झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपल्याला यापूढेही चांगले आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हि परमेश्वराला प्रार्थना.

चौकटराजा Sat, 06/21/2014 - 17:10
तिमाजी साहेब आपण हे सहन केलेतच पण ते मोकळेपणाने व आपली विनोदी वृत्ती न गमावता कथन केलेत हे विशेष . याचबरोबर या वेगळ्याच आजारास अधुनिक शस्त्र चिकित्सा कशी सामोरी जाते याची ही जाता जाता माहिती मिळाली. अलीकडे रीडर्स डायजेस्ट वाचनात नाही. पण आपल्या निवेदनाने त्याचे एक पान वाचल्याचे समाधान मिळाले. व आपण बरे झालात हे दुसरे समाधान ! आपण हा किल्ला लढवलात खरोखरच " तिमाजीअप्पा" असेच म्हणावयास हवे.

In reply to by चौकटराजा

असंका Sun, 06/22/2014 - 14:09
+1 अगदी खरं आहे. एवढा त्रास होत असतानाही सगळ्यांना ही महत्वपूर्ण माहिती दिलीत! आपल्या उत्साहाला सलाम!

सस्नेह Sat, 06/21/2014 - 20:20
कसलं काय काय सहन केलंत ओ तिमाभाऊ ! आता मात्र भरपूर खादाडी सुरु करा पाहू. खाण्यासाठी भरपूर आरोग्यमय आयुष्य लाभो !

तिमा Sun, 06/29/2014 - 19:24
सर्व प्रतिसादकर्त्यांना आणि वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद!

http://www.misalpav.com/node/27881 http://www.misalpav.com/node/27905 लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे. रात्रीच्या वेळी तर, दर दोन तासांनी जाग येऊन उठून बसावे लागे आणि दोन घोट पाणी प्यायल्यावर ढेकरा कमी झाल्यावर परत झोपता येत असे.

ना केले

वैभवकुमारन ·

आयुर्हित Sat, 06/21/2014 - 14:04
जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले आपली चुक मान्य केल्यामूळे आनंद झाला. परमेश्वर आपल्याला नक्किच सन्मार्ग दाखविल.

In reply to by आयुर्हित

परमेश्वर आपल्याला नक्किच सन्मार्ग दाखविल.
कुठे असतो हा परमेश्वर? आणि नेहमी पब्लिकची वाट चुकायची वाट का पाहतो?

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित Sat, 06/21/2014 - 14:53
आपले कोणतेही धर्मग्रंथ वाचलेत तर आपल्याला नक्किच कळेल की कुठे असतो हा परमेश्वर. फक्त त्यावर विचारमंथन करुन आपल्या दुसर्‍या प्रश्नाचेही उत्तर मिळेल.

In reply to by आयुर्हित

म्हणजे काय? अहो, इथे मी एकटाच तो प्रश्न विचारतो. धर्मग्रंथात तुम्हाला सापडला की कळवा पत्ता, जाऊ भेटायला.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित Sat, 06/21/2014 - 21:31
ईश्वर (देव) म्हणजे काय? ईश्वर कसा पाहावा? ईश्वराचे पूजन कसे करावे? याबाबत सामान्यजनांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे संत तुकोबांनी आपल्या अभंगातून अत्यंत सुंदरपणे दिलेली आहेत... जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ।।१।। तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।२।। मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ।।३।। ज्यासि अपंगिता नाही । त्यासी धरी जो -हदयी ।।४।। दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।।५।। तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ।।६।। जे जीव दु:खाने रंजले-गांजले आहेत, त्यासी जो आपले म्हणतो, त्यांना आपल्या जवळ घेतो तोच साधू आहे असे समजावे आणि त्याच ठिकाणी देव आहे असे मानावे. ज्याप्रमाणे लोणी आंतरबाह्य मृदु असते, त्याप्रमाणे सज्जनाचे चित्त असते. ज्याला कोणाचा आश्रय नाही, ज्याला कोणी जवळ करीत नाही, त्यांना तो आपल्या हृदयात धरतो, जवळ करतो. ज्याप्रमाणे तो आपल्या पुत्रावर प्रेम करतो तसेच प्रेम तो दास आणि दासीवरही करतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याविषयी किती म्हणून सांगू, ते साक्षात भगवंताची मूर्ती आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित Mon, 06/23/2014 - 01:46
धुंधला जायें जो मंझिले इक पल को तु नज़र झुका झुक जाये सर जहां वही मिलता है रब का रास्ता तेरी किस्मत तु बदल दे रख हिम्मत बस चल दे तेरे साथी मेरे कदमोंके है निशान तू ना जाने आसपास है खुदा साभार : तू ना जाने आसपास है खुदा Lyrics of Aas Pass Khuda Song

म्हैस Mon, 06/23/2014 - 16:21
जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले भावलं. चुक मान्य केल्यामूळे आनंद झाला.

ह्या प्रश्नाचं उत्तर मी पा वरच हजारदा देवून झालाय . पण आपली चूक असताना ती मान्य न करता उठसुठ परमेश्वराच्या नावाने कोकाल्नार्यांना काही लोकांच्या टाळक्यात ते शिरलं नाही किवा मग येडगाव घेवून पेडगाव ला जायची भारी हौस दिसतीये

कीती पाप केले, कीती पुण्य केले कोणा हास्य दिले , कुणा शून्य केले जरी जींकता मी हा डाव रडीचा कधी हारण्याचे मी प्रयत्न ना केले असा पोरका मी , जरी पोरका मी मी तेव्हां त्या मातेला धन्य ना केले जेव्हां सोडला तीक्ष्ण शब्दांचा मारा तेव्हां भावनांचे मी काव्य ना केले जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले दिल्या देवाने सुख सुमनांच्या माळा तरी मुखी नाम मी 'राम' ना केले

उत्तर सापडेना आज?

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
काव्यरस
(अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची निर्घुण हत्या होते. अश्या घटना देशात घटत आहेत. मग दिल्ली असो किंवा बदायूँ. प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. कुठे चूक झाली आमच्या पिढीच्या हातून कि आजची तरुण पिढी वासनेच्या आहारी जात आहे) कुणी पायदळी तुटवली एक नाजूक कळी आज? मध्यान्हन उन्हाळी पसरली का स्मशान शांतता आज? ममतेचा कोखात निपजली का रक्त पिशाचे आज? माय बहिण भार्या नाती का निरर्थक झाली आज? वासनेच्या डोहात तरंगती का नव तरुणाई आज? काय जाहली चूक आमची उत्तर सापडेना आज?

मनमोहक बाली : ०३ : 'पुरा बेसाकी', अगुंग पर्वतावर वसलेली बालीतील मंदिरांची माता

डॉ सुहास म्हात्रे ·

रेवती Sat, 06/21/2014 - 00:38
अप्रतीम लेखन व छायाचित्रे! पहिल्या फोटूतील आकाशाचा रंग पाहूनच मन मोहून गेले पण पुढील प्रत्येक फोटू खिळवून ठेवणारा आहे. दुसरा फोटो कोकणात असल्यासारखा आहे. कोरी अगुंग केवळ सुंदर. पुरा बेसाकीच्या आतील चित्रेही सुंदर आलीयेत. इतकी प्रशस्त देवळे आहेत म्हटल्यावर येथील लग्नकार्ये देवळांमध्येच होत असावीत का? असा प्रश्न पडला. साहेब, आता तुम्ही एक पुस्तक छापायचे मनावर घ्याच! आम्ही ते नक्की विकत घेऊ.

In reply to by रेवती

मला बालीतले लग्न बघण्याची संधी मिळाली नाही, पण तो विधी मोठा रंगीबेरंगी आणि चित्ताकर्षक असतो असे वाचून-ऐकून आहे. त्यामुळे सद्या बालीनीज लग्नसमारंभाची काही चित्रे पाहूनच समाधान करून घेणे भाग आहे :( (सर्व चित्रे जालावरून साभार) मुख्य समारंभ...  .  रुखवत...  ... करवल्या...  वरात...  . पाश्चिमात्यही बालीत हा विधी करवून घ्यायला येतात...  . बाली लग्न करण्यासाठीचे आणि दुसर्‍यांदा लग्नाच्या आणाभाका पुन्हा घेण्यासाठीचे (रिन्युअल ऑफ वाव्ज) एक जानेमाने आंररराष्ट्रिय ठिकाण बनले आहे. हे समारंभ देऊळ, बौद्धमंदिर, रिसॉर्ट, खास व्हिला, चर्च, इ हवे तिथे करता येतात. हे काम करणार्‍या बर्‍याच कंत्राटी कंपन्या तेथे आहेत. देवळात कोणताही विधी करायला हिंदू असणे जरूरीचे असते. पुरा बेसाखी अथवा इतर मोठी मंदिरे बडेजावासह केलेल्या समारंभाना वापरता येत नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती Sat, 06/21/2014 - 21:21
धन्यवाद. लग्नकार्ये रंगीबेरंगी असल्याने बरे वाटले. वरात जरा विनोदी आहे तरी बाकी सगळे लग्न छान आहे. डोलारे, फुलोरे यांची रेलचेल. रुखवत भारी आहे.

In reply to by रेवती

अहो, त्या "बालीच्या समुद्रकाठची वरात" या खास आयटेमाला ईंटरनॅशनल क्लायंटांचा लै डिमांड असतो असं ऐकून आहे ! :)

यशोधरा Sat, 06/21/2014 - 08:00
हजारेक वर्षांपूर्वी भारतातून येथे स्थलांतरीत होणार्‍या आणि या भूमीत मुळे रोवून प्रतिकूल परिस्थितीत अजूनही आपला धर्म आणि संस्कृती केवळ जतन करणार्‍याच नाही तर दर दिवशी अभिमानाने साजरा करणार्‍या बालीच्या जनतेबद्दल मनात काय भावना येतात हे सांगणे कठीण आहे !
सहमत! फार सुरेख धागा. फोटो पाहताना कोकण प्रांताची आठवण झाली.

प्रचेतस Sat, 06/21/2014 - 09:01
जबरदस्त. काय प्रचंड मंदिर संकुले आहेत ही. लेखनही अगदी माहितीपूर्ण आणि तपशीलवार.

धन्या Sat, 06/21/2014 - 09:08
काका तुम्ही भाग्यवान आहात. दुचाकीस्वाराबरोबर मागे बसलेल्या व्यक्तींनीही शिरस्त्राण घातलेले पाहून भरुन आले.

In reply to by धन्या

एस Sun, 06/22/2014 - 11:17
दुचाकीस्वाराबरोबर मागे बसलेल्या व्यक्तींनीही शिरस्त्राण घातलेले पाहून भरुन आले.
हेच म्हणणार होतो. एक पुणेकर म्हणून तर खूपच हो. (हेल्मेट वापरणारा पुणेकर)

In reply to by एस

हेल्मेट वापरणे ही बालीत सहजपणे होणारी क्रिया आहे. पोलीस कोणाला हेल्मेटकरता थांबवून चौकशी करत आहे असे एकदाही दिसले नाही. याबाबतीतही (आणि एकंदरीत शिस्तीच्या बाबतीत) बालीकर पुणेकरांपेक्षा (आणि एकंदरीत भारतीयांपेक्षा) फार पुढे आहेत असे दु:खाने नमूद करावयाला लागते आहे :(

चौकटराजा Sat, 06/21/2014 - 12:27
मी भारतात पाहिलेल्या मंदिरांच्या समूहापेक्षा अगदी वेगळ्या शैलीची मंदिरे आहेत ही. त्यातील 'कोरी अगुंग' चे प्रवेशद्वार तर नजरेला गुंगून स्तब्ध करणारे आहे. ते बाली चे टिपिकल प्रवेशद्बार ही एका चित्रात दिसतेय. काही प्रमाणात नेपाळी, जपानी शैलीचा छाप दिसतो काय..... ? बाकी अंतर्भागांचे दर्शन ही सुखद आहे. धन्यवाद शेअर केल्याबद्द्ल.

In reply to by चौकटराजा

दुभंगलेल्या व्दाराची कल्पना बालीची खासियत आहे. सर्वात बाहेरच्या कूसाला तसे व्दार ठेवण्याची पद्धत असल्याने बालीच्या सफरीत ते सतत समोर येते.

इशा१२३ Sat, 06/21/2014 - 14:54
हिरवागार परिसर,सुंदर रेखीव मंदिरे आणि 'कोरी अगुंग'...सगळेच फोटो सुंदर!

माधुरी विनायक Sat, 06/21/2014 - 15:08
कित्ती सुरेख आणि देखणी मंदिरं आहेत. प्रत्येक छायाचित्रात जाणवणारी अकृत्रिम स्वच्छताही वाखाणण्याजोगी. तुम्ही दिलेली माहितीही अभ्यासपूर्ण आहे. धन्यवाद.

पैसा Sat, 06/21/2014 - 16:59
सुंदर आणि केवळ सुंदर! इथल्या बहुरेक नावांचा कोणत्यातरी संस्कृत शब्दांशी संबंध जोडता येतो आहे. हजार वर्षांपूर्वी समुद्र पार करून तिकडे गेलेल्या लोकांनी संस्कृती जिवंत ठेवण्याचा आटापिटा करावा हे विशेषच! पायर्‍या पायर्‍यांची भातशेती पाहून कोकणातल्या डोंगरांवरच्या लहान लहान दळ्यांची आठवण झाली.

यशोधरा, खटपट्या, वल्ली, धन्या, मुकत विहारि, मृत्युन्जय, चौकटराजा, इशा१२३, माधुरी विनायक, अत्रुप्त आत्मा आणि पैसा : सर्वांचे उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद !

दिपक.कुवेत Sat, 06/21/2014 - 19:05
एक प्रश्न आहे....कुठल्याहि ठिकाणाची ईतकि तपशीलवार माहिती तुम्हि कशी जाणुन घेता? आय मीन आयटनरी मधे जी ठिकाणं पहायची आहेत त्याची आधी माहिती घेउन ती टुर गाईड बरोबर पडताळता का त्या त्या ठिकाणाचा टुर गाईड तुम्हाला हि माहिती देतो? केवळ उत्सुकता म्हणुन विचारतोय हो. राग नसावा. कारण तुमची चिकाटि, जिद्द, मेहनत त्यात दिसुन येते. फार कमी लोक ईतकि माहितिपुर्ण सहल करतात. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत.

In reply to by दिपक.कुवेत

मुक्त विहारि Sat, 06/21/2014 - 19:48
+ १ (आम्ही पण त्यातच मोडतो... लेणी बघायला म्हणून जातो, अन बियर आणि भूर्जी-पाव खावून परत येतो.)

In reply to by दिपक.कुवेत

भाते Sat, 06/21/2014 - 20:27
कुठेही सफर करायची असेल तर विकी, गुगल आधी मिपावर एक्का काकांचे धागे बघायचे. बाकी कुठेही मिळणार नाही इतकी सुरेख माहिती एक्का काकांच्या धाग्यांवर मिळते.

In reply to by दिपक.कुवेत

या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या सहलींमागे मला असलेले नवीन जागेचे कुतुहल. मग बाकीचे आपोआप होते. वेळ आणि पैसा खर्च करून सहलीला जायचे तर ती जा खरंच तितकी आकर्षक आहे की नाही आणि असली तर कोणत्या गोष्टी बघणे आवश्यक आहे हे जाण्याअगोदर माहिती करून घेणे आपोआपच होते. कारण परतल्यावर असे हे राहीले, ते राहीले हे मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते ! परदेशातल्या (आणि अर्थातच अनोळखी) जागेवर योग्य माहिती देणारा मार्गदर्शक ही मी फार आवश्यक गोष्ट मानतो. कारण योग्य मार्गदर्शकावर होणार्‍या खर्चाच्या तुलनेत कमी / अथवा चुकीच्या पद्धतीने बधितलेल्या अकर्षणांमुळे आपण जास्त तोट्यात जातो असे मला वाटते. मार्गदर्शकांना आपण जर (अगोदर थोडीफार माहिती असल्याने) योग्य प्रश्न विचारले तर त्यांनाही हुरुप येउन त्यांचा "पाटी टाकणे" मोड बंद होऊन "आत्मियता" मोड सुरू होतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला खरेच जागेत रस आहे हे कळल्याने बरीच अधिक रोचक आणि अंतर्गत महिती कळते असा माझा अनुभव आहे. अर्थात मार्गदर्शक हवा की नको ते सहलीच्या जागेवर अवलंबून असते. पाश्चिमात्य देशांत उत्तम माहितीपत्रके मिळतात आणि स्वत:च्या जबाबदारीवर उत्तम प्रकारे सहल करता येते. भाषेचीही समस्या नसते. शिवाय तेथे खाजगी मार्गदर्शकाची फी भयानक महाग असते. त्यामुळे तेथे पुर्वाभ्यास (आंतरजालाचा विजय असो !) आणि जागेवरची माहितीपत्रके पुरेशी असतात. मात्र चीन, दक्षिणपूर्व आशियातील देशांमधे (सिंगापूरसारखे काही मोजके सन्माननिय अपवाद वगळता) बरोबर याविरूद्ध परिस्थिती आहे. अर्थातच एकच किंवा एका बाजूचाच उपाय सगळ्या सहलींना लागू नसतो... मग हायब्रिड उपाय बनवायचा, हाकानाका. असा प्रत्येक वेळी परिस्थितीप्रमाणे वेगवेगळा निर्णय होतो. प्रवासवर्णन लिहीताना माहिती विश्वासू असणे जरूर आहे. त्यामूळे ती परत पडताळून बधितली जातेच. तेव्हा त्यांत सनावळी इ ची अजून थोडी भर पडते (त्यांचे कोण लेकाचा पाठांतर करतो काय? ते तर मी शाळेतही करत नव्हतो ;) ). पण या सर्वात माझी जिज्ञासा अधिकच पुरी झाल्याने माझा सहलीचा आनंद व्दिगुणीत होतो !

भाते Sat, 06/21/2014 - 20:24
काका, पहिल्या प्रतिसादात रेवाक्का यांच्या म्हणण्यानुसार खरंच तुमच्या या लेखांचे पुस्तक (खंड१, २, …) काढा. पुरा बेसाकी… सुरेख, फोटो आणि माहितीसुध्दा.

एस Sun, 06/22/2014 - 11:25
वरच्या प्रत्येक प्रतिसादाला सलाम. तुमचे लेख मला एक छायाचित्रकार म्हणून किती जळवतात हे सांगू शकत नाही. मी तुम्हांला ISO4000 + f/0.95 + BULB + EC+5.0 देऊन ब्लोआउट करून टाकणार आहे. :-) बाकी हाही लेख आपल्या लौकिकास साजेसा आहे. (वाक्प्रचार वाङ्मय चौर्य श्रेय - चौरा)

In reply to by एस

तुमच्यासारख्या फोटोग्राफीतल्या जाणकाराकडून असा सुंदर प्रतिसाद म्हणजे काय म्हणावे ! असाच लोभ असु द्या. खरं तर मला फोटोग्राफितले फार काही कळत नाही. डोळ्याला काही भावले की त्याला शक्य तितके कॅमेर्‍याच्या फ्रेममध्ये पकडून ठेवणे यापलिकडे माझे तांत्रिक ज्ञान जात नाही. माझ्या मनाला भावलेले प्रेक्षक-वाचकांपर्यंत बर्‍यापैकी पोहोचले की माझा आनंद व्दिगुणीत होते, इतकेच. त्यात कॅमेर्‍याच्या तांत्रिक ताकदीचा माझ्या कलाकारीपेक्षा जास्त मोठा वाटा आहे हे नक्की.

In reply to by माझीही शॅम्पेन

बालीत सर्वच पुतळ्यांना आणि देवांच्या सिंहासनांना, इतकेच काय तर मोठ्या पवित्र समजल्या जाणार्‍या वृक्षांनाही लुंगीसारखे सरोंग हे वस्त्र नेसवतात... सणासुदीला तर नक्कीच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 12:04
ती तमिळ पद्धत असावी. तमिळनाडूतही कैक ठिकाणी देवळांत मूर्त्यांना कपडे नेसवले जातात-मुख्य देव नव्हे तर अन्य संरक्षक किंवा उपदेवांना म्हणतोय.

मधुरा देशपांडे, आतिवास आणि माझीही शॅम्पेन : अनेक धन्यवाद ! तुमच्या सहलितील सहभागाने पुढेचे वर्णन लिहीण्यास उत्साह मिळत आहे.

विवेकपटाईत Sun, 06/22/2014 - 18:47
लेख आणि माहिती आवडली. खर म्हणावे तर बाली म्हणजे स्वर्ग. निसर्गरम्य, स्वच्छ नितळ वातावरण. भरपूर फुले झाडे, जुने मंदिर आणि माकडे ही. भारतातच आल्या सारख वाटते. मला ही बालीच्या समुद्र किनार्यावर एक अनुभव आला होता बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी/ एक अनुभव

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 12:07
निव्वळ अप्रतिम. बघूनच डोळ्यांचे पारणे फिटले _/\_ एक बाऽरीक करेक्शन: जावा बेटात हिंदू लोकांचे प्रथम आगमन इ.स. १२८४ च्या बर्‍याच अगोदर झालेले होते. जावानीज रामायणाची तारीख ८७० इ.स. आहे. http://en.wikipedia.org/wiki/Kakawin_Ramayana अवांतरः हे रामायण म्ह. भट्टिकाव्याचे भाषांतर आहे असे म्हटल्या जाते. भट्टिकाव्य म्ह. नावापुरते रामायण, पण त्यातील प्रत्येक श्लोकाद्वारे पाणिनीच्या व्याकरणाचा एकेक नियम सोदाहरण स्पष्ट केलेला आहे.

In reply to by बॅटमॅन

पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदूंच्या पहिल्या आगमनाबरोबर सुरू झाली असेही मानले जाते. हे वाक्य जावा बेटातील हिंदू धर्माच्या आगमनाबद्दल नसून बाली बेटावरील बेसाकी मंदिरामध्ये हिंदू उपासना सुरु होण्याबद्दल आहे. अर्थात त्यातही जरासा गोंधळ आहे. तिकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद ! ते वाक्य खालील प्रमाणे दुरुस्त केले आहे... "पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदू साम्राज्याच्या बालीवरील यशस्वी आक्रमणांच्या सुरुवातीने सुरू झाली असेही मानले जाते." अजून थोडेसे... तेराव्या शतकापूर्वीची जावानीज साम्राज्ये मुख्यत: सुमात्रा आणि जावा बेटावरच मर्यादित होती. आधुनिक इंडोनेशियाच्या बहुतेक सर्व बेटांवर सत्ता गाजविणारे महापहित (१२९३ -१५२०) हे पहिले साम्राज्य होते. त्याने सर्व बाली बेटाला १३४३ मध्ये आपल्या अधिपत्याखाली आणले. तरीही बालीत हिंदू धर्म जोमाने वाढीस लावण्याचे आणि कायम ठेवण्याचे बरेचसे श्रेय महापहित साम्राज्याच्या र्‍हासानंतर जावातून बालीत स्थलांतरीत (आणि एकवटीत) झालेल्या राजेसरदारांना, धर्मपंडीतांना आणि कलाकारांना दिले जाते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 15:54
अंमळ घोळच झाला खरा. माहितीकरिता धन्यवाद! बाकी मध्ये कधीतरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जावाहून बालीला एकजण कुणी गेला तो परत येईल अशी काहीशी दंतकथा आहे त्याची या निमित्ताने आठवण झाली.

म्हैस Mon, 06/23/2014 - 15:42
१ प्रश्न तुम्ही एकूण किती लोक गेला होतात ? तोतल खर्च किती आलाय ? तुमचं तुम्ही सगळं arrange केलंत कि travel कंपनी च्या मदतीने ? आणि guide कसा मिळवायचा ?

=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...