✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

श्रद्धा म्हणजे...

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 06/21/2014 - 19:23
श्रद्धा म्हणजे आधी असतो कल्पनांचा भास श्रद्धा म्हणजे नंतर होतो त्यां'चाच पहिला श्वास श्रद्धा म्हणजे आधी असतो जाणिवांचा खेळ श्रद्धा म्हणजे नंतर होतो फुकट जाणारा वेळ श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी दो वक्ताची रोटी श्रद्धा म्हणजे काही तोंडी सहज पडलेली बोटी! श्रद्धा म्हणजे काहिंसाठी pre plan जुगारी अड्डा श्रद्धा म्हणजे कुणासाठी स्वत:च पडायचा खड्डा श्रद्धा म्हणजे कुणी करतात ठरवून मोठ्ठी होळी श्रद्धा म्हणजे कुणी मारतात ठरवून छुपी अरोळी श्रद्धा म्हणजे भोळं भाबडं बिन रंगाचं कापड श्रद्धा म्हणजे उघड्या डोळ्यांना बंन्द करणारी झापड श्रद्धा म्हणजे मी(ही) म्हणतो क्रुतीवरचा विश्वास क्रुतीच करणे हा श्रद्धेचा एकच धर्म..खास! श्रद्धा म्हणजे हेतू तिथला इहलौकिकच हवा नायतर होउन बसते..ती फुग्यातली...नुसतीच हवा! श्रद्धा म्हणजे... हेतू'तं हवे नीतीचे अधिष्ठान नाहितर ते जुनं आहे की... हज्जारो वर्षांचे दुकान! अता प्रश्न इतकाच की.. नवे कसे हे द्यावे? का..जुन्या नावे..नव्याचे हे ही दुकानच काढावे!? अता कळते श्रद्धा म्हणजे स्व...क्रुतीचा खेळ बराच जड जातो की हो.... स्वत:वर येता वेळ! जाउ दे ही कविताच समजा म्हणजे "मी ही" ..सुटेन! आलच परत डोक्यात 'वेड' तर पुन्हा नक्की भेटेन!!! ================

प्रतिक्रिया द्या
13020 वाचन

💬 प्रतिसाद (52)

आवडली.

यशोधरा
Sat, 06/21/2014 - 19:43 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर.

प्रचेतस
Sat, 06/21/2014 - 21:21 नवीन
अतिशय सुंदर.
  • Log in or register to post comments

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 06/21/2014 - 21:28 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

छान!

विकास
Sat, 06/21/2014 - 21:36 नवीन
खूपच छान!
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Sun, 06/22/2014 - 14:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+२

आयुर्हित
Tue, 06/24/2014 - 23:13 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

झक्कास !!!

धन्या
Sat, 06/21/2014 - 22:11 नवीन
झक्कास !!!
  • Log in or register to post comments

अतिउत्तम !

चौकटराजा
Sun, 06/22/2014 - 10:45 नवीन
कविराय ब्वॉ , फारच अर्थवाही कविता ! श्रद्धा म्हणजे पुनःपुनः येणार्‍या अनुभवाचा पारिपाक तिच्या शिवाय जग चालत नाही. व ती दरवेळा उपयोगाला येतेच असेही नाही.
  • Log in or register to post comments

(No subject)

आतिवास
Sun, 06/22/2014 - 10:49 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

(No subject)

जेनी...
Sun, 06/22/2014 - 10:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments

वाह!

एस
Sun, 06/22/2014 - 11:08 नवीन
बुवा, कविता आवडेश. पुढील वेडाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

चांगलीय !!!

खटपट्या
Sun, 06/22/2014 - 12:27 नवीन
चांगलीय !!!
  • Log in or register to post comments

श्रध्दा महणजे

कंजूस
Sun, 06/22/2014 - 12:43 नवीन
श्रध्दा महणजे स्वकृतीचा खेळ बराच जड जातो स्वत:वर येता वेळ . खरोखर कवीबुवा . मंत्र ,जादू ,ज्योतिष ,वैद्यक या विद्यासुध्दा जाणणाऱ्यांना कधी तरी गोत्यात आणतात .
  • Log in or register to post comments

वीररसातली कविता आवडली!

प्यारे१
Sun, 06/22/2014 - 14:35 नवीन
वीररसातली कविता आवडली!
  • Log in or register to post comments

श्रद्धा म्हणजे वीररस ..???

सस्नेह
Sun, 06/22/2014 - 21:20 नवीन
श्रद्धा म्हणजे वीररस ..??? वाट लागली..(बुवांची नव्हे, श्रद्धेची !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

छान जुळलीयेत यमकं

स्पा
Sun, 06/22/2014 - 15:09 नवीन
छान जुळलीयेत यमकं
  • Log in or register to post comments

+१ हो... हे सांगायचं र्

प्यारे१
Sun, 06/22/2014 - 15:23 नवीन
+१ हो... हे सांगायचं र्‍हायलंवतं वर! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@छान जुळलीयेत यमकं>>> अस्सं

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/22/2014 - 23:23 नवीन
@छान जुळलीयेत यमकं>>> अस्सं का!? ;) आपला प्रतिसादही नेहमी सारखाच जळून....आपलं..ते...हे,जुळून आलाय! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

श्रद्धा म्हणजे ती खाल्ल्या

जेनी...
Sun, 06/22/2014 - 23:27 नवीन
श्रद्धा म्हणजे ती खाल्ल्या आळितल्या जोश्याची पूतणी कायरे शिन्च्या...!! *crazy*
  • Log in or register to post comments

बालिके....

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/22/2014 - 23:54 नवीन
बालिके.... *beee* छडी मारिन हं... :-/ नको तिथे कसला चाबरटपणा!*diablo*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

चाबरटपणा काय ़केलाओ गुर्जि

जेनी...
Mon, 06/23/2014 - 00:56 नवीन
:-/ चाबरटपणा काय ़केलाओ गुर्जि :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

श्रद्धा म्हणजे दांभिकांचं

प्रचेतस
Sun, 06/22/2014 - 23:41 नवीन
श्रद्धा म्हणजे दांभिकांचं कुरवाळायचं गाजर भक्तांच्या भावनांना भुलवायचं आगर.
  • Log in or register to post comments

चालायचच,

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/23/2014 - 12:18 नवीन
चालायचच, अश्रध्दांना श्रध्द लाचार, केविलवाणे, बिचारे वाटतात तर श्रध्दांना अश्रध्द उध्दट, हेकेखोर व आत्मकेंद्री वाटतात. कारण कुणाची श्रध्दे वर श्रध्दा असते तर कुणाची अश्रध्देवर श्रध्दा असते. कोणी श्रध्देने श्रध्देवर प्रहार करत असतो, तर कोणी श्रध्देने अश्रध्दाला श्रध्द बनवायचा प्रयत्न करत असतो. अश्रध्द श्रध्देने त्यांच्या अश्रध्देवर ठाम असतात, तर श्रध्द अश्रध्दांच्या श्रध्दे विषयी साशंक असतात. श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

छान विवेचन!

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/23/2014 - 12:59 नवीन
छान विवेचन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

वा पैजार ब्वा ,मस्तच

स्पा
Mon, 06/23/2014 - 13:40 नवीन
वा पैजार ब्वा ,मस्तच बाकी आम्हाला बुवांच्या हा ... स रयाच कविता आवडतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

वॉव !

सस्नेह
Mon, 06/23/2014 - 14:18 नवीन
दोन बुवांची जुगलबंदी...क्या केहेने !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

श्रध्दा अश्रध्देचा हा वाद

प्रचेतस
Mon, 06/23/2014 - 14:24 नवीन
श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे तिसरी बाजु सापडत नाही हाच खरा वांदा आहे.
दुसरी ओळ थोडासा बदल करून लिहितो. श्रध्दा अश्रध्देचा हा वाद आदिम आहे अशी माझी श्रध्दा आहे यामधे दांभिकांचे मात्र फावते हाच खरा वांदा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

हा बदल पण समर्पक वाटतो.

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/23/2014 - 14:34 नवीन
हा बदल पण समर्पक वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@यामधे दांभिकांचे मात्र फावते

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/23/2014 - 15:55 नवीन
@यामधे दांभिकांचे मात्र फावते हाच खरा वांदा आहे.>>> +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

परफेक्ट!

यशोधरा
Mon, 06/23/2014 - 16:11 नवीन
परफेक्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खरं आहे.

यशोधरा
Mon, 06/23/2014 - 16:10 नवीन
खरं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

श्रध्द त्यांच्या श्रध्दे

धन्या
Mon, 06/23/2014 - 19:09 नवीन
श्रध्द त्यांच्या श्रध्दे बद्दल अश्वस्त असतात तर अश्रध्द श्रध्दांच्या श्रध्दे बद्दल चिंताग्रस्त असतात.
अश्रद्धांना श्रद्धांच्या श्रध्देबद्दल चिंता नसती तर काय घडले असते याची एक छोटीशी झलकः १. आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते. २. आजही स्त्रीया पतीच्या मृत्यूनंतर सती गेल्या असत्या. ३. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगणारी स्त्री चूल आणि मुल यांतच अडकून पडली असती. ४. पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीसाठी आजही सर्रास नरबळी जात राहिले असते. ५. आजही भारतीयांनी समुद्र ओलांडून जायचं धाडस केलं नसतं. ६. आजही सर्पदंशाने, विंचूदंशाने मांत्रिकांकडून विष उतरवण्याच्या नादात अनेक माणसे जीवाला मुकत राहीली असती. ७. अनेक साथीचे आजार देवीच्या कोपाने झाले असे मानून बळी जात राहीले असते. असो... यादी न संपणारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

धनाजीपंत तुम्ही आणि वर बरेच

स्पा
Mon, 06/23/2014 - 19:50 नवीन
धनाजीपंत तुम्ही आणि वर बरेच जण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात असे वाटले. बाकी चालु द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नाही.

धन्या
Mon, 06/23/2014 - 20:09 नवीन
सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते. श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. वर मी दिलेली उदाहरणे ही श्रद्धेचीच उदाहरणे आहेत, ज्यात काही तथ्य नव्हते. जेव्हा विवेकवादी चळवळ सुरु झाली तेव्हा सुधारकांना लोकांच्या सार्‍याच श्रद्धांना थेट हात घालायचा नव्हता. म्हणून त्यांनी देव आणि धर्म याच्याशी निगडीत श्रद्धांना नुसतेच "श्रद्धा" म्हणण्यास सुरुवात केली. आणी उरलेल्या बाकी श्रद्धांना त्यांनी "अंधश्रद्धा" असे नांव दिले. सुधारणांचा गाडा पुढे सरकण्यासाठी ती आवश्यक गोष्ट होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ठिके , पण सरसकट सगळ्या

स्पा
Mon, 06/23/2014 - 20:22 नवीन
ठिके , पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात. बरे अश्रद्ध म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ठिके , पण सरसकट सगळ्या

स्पा
Mon, 06/23/2014 - 20:22 नवीन
ठिके , पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात. बरे अश्रद्ध म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पण सरसकट सगळ्या श्रद्धा

धन्या
Mon, 06/23/2014 - 20:30 नवीन
पण सरसकट सगळ्या श्रद्धा तुम्ही एकाच क्याटेगरीत तोलता आहात.
होय.
बरे अश्रद्ध म्हणजे काय?
ज्याची श्रद्धा नाही तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

धन्यवाद

स्पा
Mon, 06/23/2014 - 20:33 नवीन
धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आज ज्या प्रथांना आपण

धन्या
Mon, 06/23/2014 - 20:49 नवीन
आज ज्या प्रथांना आपण "अंधश्रद्धा" समजतो, त्या प्रथा शे-दोनशे वर्षांपूर्वी प्रचलित होत्या तेव्हा त्या धर्मश्रद्धाच होत्या. त्यांना अंधश्रद्धा हे नांव अगदी अलिकडच्या काळात विज्ञानाने त्यांचा फोलपणा सिद्ध केल्यावर चिकटले. न जाणो आज ज्या "श्रद्धा" आहेत त्या येणार्‍या काळात विज्ञानातील प्रगतीमुळे "अंधश्रद्धा" म्हणून मोडीत निघतील. संयमीत प्रतिसादासाठी धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

विज्ञानातील प्रगतीमुळे "श्रद्धा" फलदायी व "अंधश्रद्धा" मोडीत

आयुर्हित
Tue, 06/24/2014 - 23:06 नवीन
विज्ञानातील प्रगतीमुळे "श्रद्धा" फलदायी व "अंधश्रद्धा" मोडीत निघाली. हा पहा बेलर यूनिवर्सिटी चा शोधः पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में शामिल होने से तनाव के स्तर में कमी आती है। बेलर यूनिवर्सिटी के शोधकर्ताओं की मानें तो इसका असर ऑफिस में इनसान के प्रदर्शन पर भी दिखता है। वह न सिर्फ काम में ज्यादा मन लगा पाता है, बल्कि उत्पादन क्षमता बढ़ने से उसके प्रमोशन और वेतन-वृद्धि की संभावनाएं भी बढ़ जाती हैं। शोधकर्ताओं ने एक हजार से कर्मचारियों की कार्य क्षमता पर धर्म और आध्यात्म का असर आंका। उन्होंने पाया कि ईश्वर में यकीन रखने, नियमित रूप से पूजा-पाठ करने और धार्मिक आयोजनों में बढ़-चढ़कर हिस्सा लेने वाले लोग पेशेवर जीवन में ज्यादा सफल होते हैं। वे बॉस की नजरों में अच्छी छवि तो बना ही पाते हैं, साथ ही सहकर्मियों से उनके संबंध भी अच्छे होते हैं। साभारः धर्म-कर्म में यकीन करने वाले ज्यादा सफल Rodney Stark points out that religious individuals are more engaged in secular organizations than secular folks. This moves our conversation into the realm of civic (political) involvement, and again the data show that religiously-active individuals shine in this area as well, and this includes not only evangelical Protestants, but Catholics, Jews, and members of other faith traditions. How Religion Benefits Everyone, Including Atheists
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ज्ञानोबाचे पैजार लय भारी

म्हैस
Mon, 06/23/2014 - 13:17 नवीन
ज्ञानोबाचे पैजार लय भारी
  • Log in or register to post comments

खास श्रद्धा....

प्रभाकर पेठकर
Mon, 06/23/2014 - 20:42 नवीन
श्रद्धा म्हणजे सावंतांची, श्रद्धा म्हणजे देशपांड्यांची श्रद्धा म्हणजे जीवाला त्रास, (बाकी) कुळकर्ण्यांची श्रद्धा म्हणजे सगळ्यांमध्ये खास
  • Log in or register to post comments

ख्रिस गेल!

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/23/2014 - 21:31 नवीन
=)) ख्रिस गेल! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

रावराण्यांची पण !!

सूड
Mon, 06/23/2014 - 21:44 नवीन
रावराण्यांची पण !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अयाया ...

चौकटराजा
Wed, 06/25/2014 - 08:32 नवीन
शाहीद अफ्रीदी , सनत जयसूर्या.....म्याकलम, युवराज, ........ रवी शास्त्री , गॅरी सोबर्स.......सगळ्यावर कडी.....पी हाटेलवाला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ख्रिस गेल!

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/23/2014 - 21:35 नवीन
=)) ख्रिस गेल! =))
  • Log in or register to post comments

आजही लोक पृथ्वी विश्वाच्या

म्हैस
गुरुवार, 06/26/2014 - 13:01 नवीन
आजही लोक पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत राहीले असते.
हे मात्र आपल्याकडे नवतं हं . सुर्य पृथ्वी भोवती फिरतो हे पश्चात्याचं मत होतं . आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे
  • Log in or register to post comments

आपल्याकडे हे सत्य कितीतरी

धन्या
गुरुवार, 06/26/2014 - 19:32 नवीन
आपल्याकडे हे सत्य कितीतरी आधीपासून माहित आहे
तसं असतं तर नवग्रहांमध्ये सूर्याच्या ऐवजी पृथ्वी असती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

आदित्यादी नवग्रहच म्हणतात ना

प्रचेतस
गुरुवार, 06/26/2014 - 19:58 नवीन
आदित्यादी नवग्रहच म्हणतात ना त्याला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

वा! सहीच ओ बुवा.

बॅटमॅन
गुरुवार, 06/26/2014 - 18:56 नवीन
वा! सहीच ओ बुवा. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा