नुकतीच "तुझे आहे तुजपाशी" या सदाहरीत नाटकाची जाहीरात वाचली. श्यामच्या भूमिकेत एव्हरग्रीन अविनाश खर्शीकर, डॉ. सतीशच्या भूमिकेत ग्रेसफूल डॉ. गिरीश ओक, काकाजींच्या अजरामर भूमिकेत रवि पटवर्धन, आचार्यांच्या भूमिकेत जयंत सावरकर इ. नामावळी होती.
मी हे नाटक १२ वर्षांपूर्वी पाहिले होते. त्यावेळी डॉ. सतीशची भूमिका कोणतरी दुसराच अभिनेता करीत होता. बाकी सर्व अभिनेते तेच होते (अभिनेत्र्या वेगळ्या होत्या. गीताचे काम साधना राजपाठक यांनी केले होते व उषाच्या भूमिकेत किशोरी अंबिये होती). आज १२ वर्षानंतर तेच अभिनेते त्याच भूमिका करत आहेत.
.