९६कुळी मराठा आडनावांच्या निश्चितीत मदत हवी
*या धागा लेखातील प्रतिसादांना खात्रीशीर माहितीची दुजोर्यांची गरज असते. जस जशी माहिती लागेल तसे प्रतिसादात विनंती/प्रश्न लिहिली असते. धागा लेखाचे पहीले शीर्षक खात्रीशीर माहिती सांगा असे होते. ज्या पद्धतीची माहिती लागेल तसे शीर्षक बदलले जाते. आपण सध्या विनंती केलेल्या प्रतिसादास उत्तर देऊ शकता तसेच मागील विनंत्या अभ्यासून शक्य असल्यास त्याबद्दलही माहिती देऊ शकता. सध्या विचारलेल्या प्रश्नासाठी शेवटच्या प्रतिसादापाशी जावे.
विकिपीडियावर लिहिणारे बहुतांश लोक ऑनलाईन उपलब्ध माहितीवर अवलंबून असतात. बर्याचदा आपण खात्रीशीर समजतो अश्या वृत्त माध्यमात अथवा पुस्तकातही विवीध कारणाने चुका असतात त्या जशाच्या तशा विकिपीडियावरही बर्याचदा संदर्भासहीतही येतात. (याच एक महत्वाच कारण म्हणजे वृत्तमाध्यमाच्या प्रतिनिधींनी आणि संपादकांनी देत असलेल्या सर्व माहितीस दुजोरा घेणे खात्री करणे गरजेचे असते. त्यातील सर्वच तफावत नेहमी लक्षात येतेच असे नाही तरीही काही तफावत असल्याचे विवीध कारणांनी विकिपीडियात चटकन जाणवते. विकिपीडियाच एक वैशीष्ट्य म्हणजे माहितीतील तफावतीकडे सहज लक्ष जाते. दोन वेगवेगळ्या स्रोतात वेगवेगळी माहिती असेल तर ती चटकन लक्षात येण्याचा संभव असतो बर्याचदा वाचकांना त्यांनी पुर्वी वाचलेल्या माहितीशी माहिती सुसंगत नसल्याचे लक्षात येते.
* अशीच एक लक्षात आलेली तफावत म्हणजे "श्रीकांत मोघे यांनी एका मुलाखतीत सुधीर हे त्यांचे मोठे बंधू असे म्हटल्याचे आठवते. पण जन्म तारखांवरून त्याउलट असल्याचे दिसते आहे. दोघांचे थोरलेधाकटेपण तपासून पहावयास हवे " असा संदेश मराठी विकिपीडियाच्या चर्चा पानावर आला आहे. या तथ्याबद्दल खात्रीशीर संदर्भासहीत माहिती आणि दुजोरा हवा आहे.
* कोणती तारीख (काळ) बरोबर ते खात्रीशीर सांगा
असाच प्रकार मोठ्या प्रमाणावर तारखांबद्दल होत असतो. शंका वाटणार्या ओळीत सर्व साधारणतः {{काळ सुसंगतता ?}} हा साचा लावण्याची प्रथा आहे त्याचे वर्गीकरण वर्ग:काळ सुसंगतता साशंकता पानावर पाहण्यास मिळते. आता पर्यंत जवळपास तीस एक तारखांबद्दलतरी साशंकाता व्यक्त केली गेली आहे त्यातील काही लेखांची नावे पुढील प्रमाणे
अ
सुदर्शन अग्रवाल
मार्टी अह्तीसारी
आ
एच.एच. आस्क्विथ
क
हेलन केलर
ग
गोविंद बाबाजी जोशी
च
चार्ल्स पहिला, इंग्लंड
चार्ल्स बॅबेज
पार्क चुंग-ही
ज
सेलिना जेटली
जॉन डीफेनबेकर
जोहान क्लोएट
त
ताओकुआंग
द
दत्तात्रेय जोशी मंगळवेढेकर
दिगंबर बाळकृष्ण मोकाशी
चर्चा:दिगंबर बाळकृष्ण मोकाशी
श्रीनिवास हरि दीक्षित
ब
योहान सेबास्टियन बाख
बाबक खुर्रामुद्दिन
ओटो फॉन बिस्मार्क
म
रिकार्दो मार्तिनेली
राणी मुखर्जी
युक्ता मूखी
र
राबिया बसरी
रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल
ल
लालू प्रसाद यादव
लुडविग फान बीथोव्हेन
व
वासुदेव रामचंद्र भट
श
शंकर दयाळ शर्मा
मोशे शॅरेड
शोले (चित्रपट)
चर्चा:श्रीनिवास हरि दीक्षित
उपरोक्त लेख विषयांबद्दल तुमच्या कडे खात्रीशीर माहिती असल्यास वर्ग:काळ सुसंगतता साशंकता या दुव्यावरून जाऊन शंका व्यक्त केला गेलेला तारखा आणि काळ तपासून देण्यात मराठी विकिपीडियास साहाय्य हवे असते. (चुकीच्या तारखा येथे लिहिल्या जाऊ नयेत म्हणून ती माहिती येथे लिहिली नाही. मराठी विकिपीडियावरील संबंधीत लेखात जाऊनच पाहणे श्रेयस्कर असेल.)
अशा तारखांबद्दल/तथ्यांबद्दल या धाग्यावर चर्चा केल्यास दुजोरा मिळणे सोपे जाईल या आशेने हा धागा काढला आहे. कृपया (शक्य तेवढे) संदर्भासहीत खात्रीकरून माहिती द्यावी. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांचे स्वागत असेल.
*आपले प्रतिसाद मराठी विकिसाठी असल्यामुळे नित्याप्रमाणे प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
* या धाग्याचा उद्देश सामाजिक-राजकीय विवाद्य विषय हाताळण्याचा नसल्या मुळे सामाजिक-राजकीयदृष्ट्या विवाद्य विषयांतरे टाळावीत ही नम्र विनंती आहे.
*आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद
वाचने
20050
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
स्वतः माहितगारच खात्रीशीर
In reply to स्वतः माहितगारच खात्रीशीर by पुण्याचे वटवाघूळ
माहिती मागून माहितगार :)
माहीतगारभौ, एक प्रश्न. वर दि.
In reply to माहीतगारभौ, एक प्रश्न. वर दि. by आदूबाळ
चांगला प्रश्न विचारलात. उत्तर
भाई भगत यांचे पुर्ण नाव हवे
दहाचे ऋण घातांकाच्या किंमती
चिपळूण(दसपटी)
पूर्ण नावे हवी आहेत
In reply to पूर्ण नावे हवी आहेत by माहितगार
विनय कोरे - विनय विलासराव
संत तुकारामांच्या मुलांची आणि
छायाशिलामुद्रण (Photolithography) म्हणजे काय ?
सुमती क्षेत्रमाडे
अजित अनंत देसाई-काले कराड आणि पवार-पाटील घराणे कसबा बावडा
९६कुळी मराठा आडनावांच्या निश्चितीत मदत हवी