ते दिवस खूप म्हणजे खूपच छान होते, गांवकुसाकडे एवढी प्रगती झाली नव्हती, आमची दगडी शाळा नांनदुरकीच्या झाडा-जवळ भरायची, एकच मोठा वर्ग, त्यात पहिली ते तिसरीचे वर्ग भरायचे, बाकडी वगैरे कांही नव्हती, एकाखालीएकशा चौरस पट्टे पंधरा- सोळाफूट लांबीचे मुरुमाच्या मातीचे ताशीवदगडी ची-याचे बांध माती ओघळू नये म्हणूनचे, एकच खुर्ची-टेबल, बसायला तरटाची बसकणं, भरपूर धूळ,
बंडोपंत परांजपे मास्तर, एकहाती कळकीचा फोक, एकहाती खडू, डोक्यावर तिरकस स्वभावाप्रमाणे तिरकस टोपी, हात-धुलाईचा झब्बा, कंचं बांधलेलं भोंगळ धोतर, उभंगंध, आणि अनुनासिक बोलणं, दोनचार खास शिव्या तोंडी लावायला, भारी मा- रकुटा मास्तर, एकदा वर्गात
अंनुंस्वांरं बांकीं संढंळं
शेंवटच्या प्यारातला "शीदोरी"