Skip to main content

(सई)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 12/05/2015 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
जशी मिकाची सई मिकाची लाडकी आहे तशी आमची सई सुध्दा आम्हाला बेहद्द आवडते. मिकाची कविता वाचल्यावर आम्हाला आमच्या सईची आठवण आली अणि मग तिच्या बद्दल चार ओळी खरडल्याशिवाय रहावले नाही. माझी सई तशी बोल्ड आहे सीन आणि सिनेमाची गरज पाहून काय आणि कसं करायचे ते निट ठरवता येतं तिला --- माझी सई तशी शहाणी हातात काही काम नसेल तर रीअ‍ॅलीटी शोची अँकर बनणेही जमतं तिला --- माझी सई तशी डँबिस दिग्दर्शक रोल देत नसेल तर त्याची सासू होणंही जमतं तिला --- माझी सई तशी लब्बाड किती अन् कोणाला लोणी लावल तर किती अन् काय मिळेल हे पक्क ठावूक तिला --- माझी सई तशी बदमाष झी मधला आपला शेअर संपला की दुसर्‍या वाहिनी कडे जायचे हे व्यवस्थित माहीतीये तिला --- माझी सई जरी निरागस नोएन्ट्री... मधल्या सारखा लालचुटुक चेरी च्या रंगाचा ड्रेस कसा मिरवायचा हे चांगलच कळतं तिला --- माझी सई तशी हुशार शिरीन घाटगे आणि शशी देवधर, दोघींची बेअरींग कशी सांभाळायची समजतं तिला --- माझी सई चिरतरुण आहे..... फॅनाळलेला सईप्रेमी

वाचने 6393
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

सई रे सई कवीता.. पैजारबुवा शीघ्रविड्म्बन मस्त. खुशाल वाचक नाखु

आरारारा... सईला "हंटरवाली" कसं बनाव ते सुद्धा चांगलच ठावुक आहे बाँ... ;)

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.

बाकी बालकविता वगैरे ठीके. पण माझी सई? पैजारवहिनी मिपावर येण्याची शक्यता किती आहे?

In reply to by पैसा

तिच्या परवानगी शिवाय मी कोणतीच गोष्ट करत नाही. (आज्ञाधारक) पैजारबुवा,

एखाद्या "सई" नेच लीलाधराची वहिनी व्हावे. म्हणजे आणखी "साय" युक्त कविता वाचायला मिळतील.