फ़ासले आणि अंतरे
या पोस्ट चा ब्लॉग दुवा हा
ग म्हटलं की गाणं, ग म्हटलं की ग़ज़ल आणि ग म्हटलं की ग़ुलाम अली ही साधी समीकरणं आहेत. माझी ग़ज़ल या संगीतप्रकाराशी, काव्यप्रकाराशी ओळख झाली ती ग़ुलाम अलींच्या चुपके चुपके आणि मेहदी हसन च्या रंजिश ही सही पासून. ग़ुलाम अलींचा सूर अन सूर, शब्द अन शब्द अगदी जवळचा वाटला. मेहदी हसनही नेहमीच आवडत राहिले पण एका अंतरावरूनच.
अंतर; फ़ासला. हे म्हटलं की तत्क्षणी आठवते ती ही ग़ज़ल,
फ़ासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था
सामने बैठा था मेरे, और वो मेरा न था
ग़ुलाम अलींच्या आवडणा-या अनेक ग़ज़लांपैकी ही एक.
काव्यरस
एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू
एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू
वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू
वाटही पाहून झाली काळ तो सरला किती
ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू
झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी
का कधी शंका न आली मारली मज थाप तू
प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही
जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू
जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे
मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू ..
.
काव्यरस
मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो
डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो
वेळ संध्याकाळची मी पाळतो
मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो
फारसे चखणे नसावे वाटीतही
मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो
ही मळलेली वाट आहे पण इथे
परताना मी किती ठेचकाळतो
कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर
रंग शर्टाचा कसा डागाळतो
केवढे जडशीळ झाले हे नयन
देव जाणे कसा तोल सांभाळतो
चालला असता अजुनही एक स्मॉल
मी कुठे मोजून मापून ढोसतो
पैजारबुवा,
मी सुखाची भेट घेणे टाळतो ..
वेळ दु:खाला दिलेली पाळतो
मी सुखाची भेट घेणे टाळतो
फारसे घडले नसावे कालही
मी उगाचच रात सारी चाळतो
ही फुलांची वाट आहे पण इथे
ऱोज एखादातरी ठेचाळतो
कोणते असते हवेमध्ये जहर
रंग प्रेमाचा कसा डागाळतो
केवढी जडशीळ दुनिया वाटते
देव जाणे कोण ही सांभाळतो
चालला असता तुझा साधेपणा
मी कुठे रंगारुपावर भाळतो
डॉ. सुनील अहिरराव
कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते ..
चार दिवस पुरणारे अत्तर असते
प्रेम तसे मग बाकी खडतर असते
सुटकेचा आयास निरर्थक असतो
कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते
आपण अपुली सांभाळावी दुनिया
सूख जरासे दु:ख निरंतर असते
आकाशाला हातच पोचत नाही
नी स्वप्नांचे व्यस्त गुणोत्तर असते
प्रश्न तुला मी तोच कितीदा केला
तुझे आपले एकच उत्तर असते
कुठून कोठेतरी जायचे नुसते..
प्रेम शेवटी एक अधांतर असते
डॉ. सुनील अहिरराव
भिंतीपल्याड जग असतं...
छायाचित्र जालावरून साभार
भिंतीपल्याड जग असतं, निरखावं की
कड्या काढून दार सताड उघडावं की
पुढे जायचा वसा कधी टाकू नये
ठेच लागली जराशी तर लंगडावं की
आहे त्यातच समाधानी रहावं, पण
इच्छित साध्य करण्या थोडं झगडावं की
घेऊ द्यावा मनालाही निर्णय त्याचा
मनाला जे आवडतं ते, निवडावं की
सदासर्वदा चांगुलपणा अळणी होतो
अधनं मधनं जरा जरासं बिघडावं की
निसटून जातो काळ हातून तरीसुद्धा
जमेल तितकं आपण घट्ट पकडावं की
भिंतीपल्याड जग असतं निरखावं की
कड्या काढून दार सताड उघडावं की
- अपूर्व ओक
काव्यरस
गझल गायक 'सुधाकर पांडुरंग कदम'
मौजे आर्णी जिल्हा यवतमाळ येथील कुणी 'सुधाकर पांडुरंग कदम' गझल गायकी करत असावेत. विकिपीडीयावर बर्याच केसेस मध्ये ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे कठीण जाते. तसेच काहीसे सुधाकर कदम यांच्या विषयीच्या लेखाबाबत झाले आहे आंतरजालावर इतरत्रसुद्धा त्यांनी स्वतःबद्दल स्वतः मोठ्या प्रमाणावर लिहिले असणार त्यामुळे स्वतंत्र संदर्भ शोधणे कठिण जात आहे. एकीकडे छोट्या गावांमधील गतीविधींची शहरी माध्यमांकडून दखल कमी घेतली जाऊन मूळ नोंदी कमी पडतात मग संदर्भांच्या अभावी ज्ञानकोशीय दखल घ्यावी अथवा नाही असा प्रश्न पडतो.
आरसा हरवेल तेव्हा ये ..
आरसा हरवेल तेव्हा ये
(चेहरा गवसेल तेव्हा ये)
केवढी गर्दी तुझ्याभवती..
एकटे वाटेल तेव्हा ये
पोकळी आहे जशी येथे
ही तिथे दाटेल तेव्हा ये
दाह सोसावा कसा तुजला
हा ऋतू बदलेल तेव्हा ये
वाहती आहेच ही दुनिया
पण कधी आटेल तेव्हा ये..
डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस
कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.
मिसळपाव