मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भिंतीपल्याड जग असतं...

वेल्लाभट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
a छायाचित्र जालावरून साभार भिंतीपल्याड जग असतं, निरखावं की कड्या काढून दार सताड उघडावं की पुढे जायचा वसा कधी टाकू नये ठेच लागली जराशी तर लंगडावं की आहे त्यातच समाधानी रहावं, पण इच्छित साध्य करण्या थोडं झगडावं की घेऊ द्यावा मनालाही निर्णय त्याचा मनाला जे आवडतं ते, निवडावं की सदासर्वदा चांगुलपणा अळणी होतो अधनं मधनं जरा जरासं बिघडावं की निसटून जातो काळ हातून तरीसुद्धा जमेल तितकं आपण घट्ट पकडावं की भिंतीपल्याड जग असतं निरखावं की कड्या काढून दार सताड उघडावं की - अपूर्व ओक ब्लॉग दुवा हा

वाचने 2365 वाचनखूण प्रतिक्रिया 9

मयुरMK 10/02/2016 - 15:52
कविता छान बाकी फोटो ( ब्लॉग वरचा) खूप आवडला

एक एकटा एकटाच 14/02/2016 - 11:13
घेऊ द्यावा मनालाही निर्णय त्याचा मनाला जे आवडतं ते, निवडावं की हे मनापासून आवडलं