मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुंकवाचा भार ना होतो कपाळी ...

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तू तरी कोठे तशी हसतेस आता बोलक्या मौनासही जपतेस आता पालखी माथ्यावरी रुतलीच आहे जोखडांना सौख्य तू म्हणतेस आता कुंकवाचा भार ना होतो कपाळी 'भाग्य' म्हणुनी त्यास का फसतेस आता कोडगा तो उंबरा हसतो मुक्याने का स्वतःची वंचना करतेस आता दांभिकांचे दंभ तू नाकार वेडे तूच दुर्गा, कालिका असतेस आता विशाल

वाचने 3294 वाचनखूण प्रतिक्रिया 19

विशाल कुलकर्णी 04/01/2016 - 21:30
संपादक मंडळी, शेवटच्या द्वीपदीत अर्ध्वयूंचे दंभ तू नाकार वेडे अर्ध्वयूंचे हा शब्द चुकला आहे, तो 'अध्व र्यू' असा हवा, पण त्यामुळे वृत्तभंग होतोय, त्याऐवजी 'दांभिकांचे'हा शब्द टाकाल का? धन्यवाद.

बोका-ए-आझम 04/01/2016 - 22:53
का कुणास ठाऊक पण खालील ओळी आठवल्या - पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी । आपुल्या घरीच हाल सोसते मराठी । हे असे कित्येक खेळ पाहते मराठी । शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।

माहितगार 05/01/2016 - 10:53
काही ओळींनंतर प्रश्नचिन्ह गृहीत असावे असे वाटते तसे 'कुंकवाचा भार ना होतो कपाळी' या ओळीनंतरही प्रश्नचिन्ह अभिप्रेत आहे का ?