घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३
क्रेकन
द मॉन्स्तर!
क्रेकनने त्याला गिळले.
आणि तो एका अंधार पोकळीत घुसला!
अंधार आणि फक्त अंधार!
डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही.
"आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला.
"हो" अरब म्हणाला.
"शैतानाची कलमे लक्षात आहेत?"
"हो"
"वागशील त्यानुसार?"
"हो"
"चांगलं की वाईट?"
"वाईट"
"नाग की गरुड़?"
"नाग"
"बकरा की गाय?"
"बकरा"
"स्वर्ग की नरक?"
"नरक"
"प्रेम की द्वेष?"
"द्वेष"
तो हसला!
"शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?"
"जमीन!"
"नाग आणि बकरे तुला मदत करतील."
तो अंधार पोकळीतून बाहेर आला.
समोर पूर्ण वाळवंट!
वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती.
त्याच्या कानात आवाज घुमला
'तू जमीन निवडलीस'
पायरेट ऑफ़ डेज़र्ट!
पायरेट ऑफ़ अरेबिया!
त्याने जहाज बघितले.
अत्यंत अतिप्रचंड!
जहाजावरून एक दोरी खाली आली.
अत्यंत जाड!
काळी!
सुळसुळ!
साप!!!
जहाजाच्या प्रत्येक दोरीच्या जागी साप होता!!
छोटे,मोठे,जाड,बारीक!
तो जहाजावर चढला.
जहाजावर बरीच माणसे होती!
बोकडाचे तोंड असलेली!
'नाग आणि बकरे तुला मदत करतील'.त्याला शब्द आठवले.
आणि तेव्हापासून सुरू झाले,
पायरेटचे तांडव!!!!!!
वाचन
7094
प्रतिक्रिया
0