Skip to main content

तुझे मजवरी भाळणे ते अवेळी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 27/08/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या कवितेच्या वेळी पैसाताईने तक्रार केली की विशालकडून अशा कवितेची सवय नाही. ;) त्यामुळे ही भुजंगप्रयात वृत्तातली गझल :) तुझे लाघवी बोलणे ते अवेळी तुझे विभ्रमी हासणे ते अवेळी जसे पावसाचे अकाली बरसणे तुझे आर्जवी वागणे ते अवेळी लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे मंद घोटाळणे ते अवेळी लगावली : लगागा लगागा लगागा लगागा वृत्त : भुजंगप्रयात
काव्यरस

तो क्या करे... अख्तर शिरानी यांची ग़ज़ल

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/08/2015 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, उर्दू काव्यजगतातल्या आणखी एका शायरची आणखी एक ग़ज़ल आणि मला उमगलेला तिचा अर्थ इथे लिहीत आहे. हा शायर म्हणजे अख्तर शिरानी. यांचं मूळ नाव मुहम्मद दावूद खान. लाहोर ला वाढलेल्या या शायरचं काव्य हे विलक्षण तरूण आहे. त्यांची ही ग़ज़ल विरहानंतरच्या, ताटातुटीनंतरच्या हतबलतेचं अत्यंत ह्र्द्य वर्णन करते. मत्ला असा आहे, काम आ न सकी अपनी वफा़एं तो क्या करे उस बेवफ़ा को भूल न जाए तो क्या करे प्रेमभंग आणि विश्वासघात हातात हात घालूनच असतात. आपण सर्वस्व अर्पावं आणि दुस-याने त्या विश्वासाला तडा द्यावा याचं दु:ख वाट्याला आलं की काय करावं सुचत नाही.
काव्यरस

आमची 'कर्म'फळे

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी गुरुवार, 06/08/2015 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
नुक्ताचं बुवांना भेटलो. त्याचा आफ्टरइफेक्ट =)) आमचा पेर्णास्त्रोत:माझी मुक्ताफळे मुळ कवितेचा आशय खरचं खुप सुंदर आहे. पण हाताची खाज अगदीच नं आवरली गेल्याने धागाकर्त्याची माफी मागुन.
काव्यरस

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

नुसतेच शब्द ओठी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 29/07/2015 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा. नुसतेच शब्द ओठी रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी मी थोपवून धरले भलतेच शब्द ओठी मी आवरू न शकलो आवेग भावनेचा अन योग्य ते न सुचले, चुकलेच शब्द ओठी शून्यात पाहताना असतो मनात वणवा ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी एका दिशेस वळती माझे विचार सारे एकसारखेच होती सगळेच शब्द ओठी होते कधीतरी जे हरवून ऐकलेले नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी कानी पडू न शकले झुरलेच शब्द ओठी विरले तसेच तिकडे नुरलेच शब्द ओठी ऐकूनही न येती ऐकू इथे अपूर्व या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी - अपूर्व ओक सर्व हक्क र
काव्यरस

गोषवारा

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 25/07/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
हा कशाला गोषवारा पाहिजे फक्त थोडासा इषारा पाहिजे माणसाला अन्न वस्त्रे खोपटे शासनाला शेतसारा पाहिजे श्वासही आहेत चोरासारखे जिंदगानीवर पहारा पाहिजे हात या राखेतही टाकेन मी पोळणारा पण निखारा पाहिजे जीव ओवाळून टाकावा असा जीव कोणी लावणारा पाहिजे घोषणांची केवढी बुजबुज इथे- देशव्यापी एक नारा पाहिजे माणके मोती हिरे सगळीकडे फक्त माती खोदणारा पाहिजे काजवे उसने किती आणायचे आपुला कोणी सितारा पाहिजे टाक तू कचरा पुरेसा अंगणी स्वच्छतेसाठी पसारा पाहिजे डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

जो ज़िंदा हो तो फिर....

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 16/07/2015 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी साहित्याला कुठेही कमी न लेखता म्हणेन, की उर्दू शायरी किंवा एकंदरितच उर्दू साहित्य वाचताना एक अवर्णनीय भारदस्तपणा सतत जाणवत रहातो. शब्दांचा भारदस्तपणा, अर्थाचा भारदस्तपणा, रचनेचा आणि वाचनानुभवाचा. उसकी बात अलग है. बिलकुल अलग. किसी दूसरी भाषा में इसे बयां तो किया जा सकता है, पर महसूस नही किया जा सकता. तरीही, मिपावर आतापर्यंत तीन चार ग़ज़ल अर्थासहित, रसग्रहणासह पोस्ट झाल्या, तो सिलसिला चालू ठेवत उर्दू काव्यजगतातल्या आणखी एका ता-याची ही एक जरा वेगळी पण मला भावलेली ग़ज़ल तुमच्यासोबत वाचतोय. हा शायर म्हणजे वसीम बरेलवी. गावाच्या नावावरून आडनावं पडलेली उदाहरणं अनेक आहेत. त्यापैकीच हे एक.

होठोंपे मुहब्बत के फ़साने नहीं आते

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 03/07/2015 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
गविशेटांनी जो सिलसिला सुरू केला, त्यात आपणही भर घालावी असा मोठ्या धैर्याने निर्धार करतो आहे. अहमद फराज़, फैज़, हसरत झालेत. तेंव्हा एका आणखी वेगळ्या शायरची एक ग़ज़ल व जमेल तसा अर्थ इथे देतो आहे. :) ते शायर म्हणजे बशीर बद्र. अयोध्येत जन्म झालेल्या या शायरने अनेक ग़ज़ल, नज़्म लिहिल्या. तशी सोपी भाषा आणि सामान्यतेतील असामान्यता टिपण्याची हातोटी यामुळे बशीर बद्र यांना लोकप्रियता मिळाली. त्यांचे अनेक शेर म्हणजे मास्टरपीस आहेत.

वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/07/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
फसवले काळासही मधुमास होते भोगले जीवनाशी झुंजलो मरणास होते भोगले राम होता सोबती, जगण्यात नाही राहिला जानकीने का इथे वनवास होते भोगले ? दु:ख येथे लाजले, कोमेजलेली वेदना सोसलेले विरह, अन सहवास होते भोगले पोर झालो, चोर झालो, वागलो स्वच्छंद मी प्राक्तनाचे पाशवी उपहास होते भोगले रोज खोटी हूल, खोट्या पावसाच्या चाहुली यार, फसलेले किती अदमास होते भोगले वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ? स्मरण कटु ना साहवे, इतिहास होते भोगले वृत्त : कालगंगा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा काफिया : मधुमास, मरणास, वनवास, परिहास, सहवास, उपहास, अदमास रदीफ़ : होते भोगले विशाल
काव्यरस

.....पाऊस गात आहे .....

लेखक चुकलामाकला यांनी मंगळवार, 23/06/2015 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
विस्तीर्णशा नभाला सोडून जात आहे पाऊस भोवताली, पाऊस आत आहे ... ठरले कधीच होते, नयनी पुन्हा न पाणी मी कोरडा तरीही पाऊस न्हात आहे ... शब्दात लपविलेली दु:खे क्षणात कळती शब्दाविना सूरांनी , पाऊस गात आहे ... राजांस वाचवाया, खिंडीत झुंजलेला, रक्तात पेटलेला पाऊस ज्ञात आहे ... कर्जात बुडलेला, गळफास लावताहे आई जमीन त्याची, पाऊस तात आहे ...
काव्यरस