मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो · · जनातलं, मनातलं
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्‍या कोणातचं नसल्याने आज ही "गोsssSSssड कामगिरी" मी माझ्या अंगावर घेतो आहे. (५ सेकंद कॅमेर्‍याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर) म्हाग्रु: माझ्या महागुरुंची ओळख करुन द्यायच्या आधी सर्वात प्रथम मी आजच्या भागाच्या प्रायोजकांचे आभार मानतो. आमच्या महागुरुंच्या येण्याजाण्याचा भत्ता देणारे घे-शियन पेंट्स (रेड पेश्शालिस्ट) ह्यांचे सर्वप्रथम भरभरुन आभार. मी आणि माझे गुरु दोघ्यांच्या आयुष्यात ह्या लाल रंगाने जी काय बरकत आणलिये म्हणुन सांगु. aaa तसचं आजच्या कॉफीच्या मगातला कटिंग ज्यांनी स्पॉन्सर केला त्या रेड लेबल चहावाल्यांचेही मी आभार मानतो. शेवटी प्रेक्षकांमधे जागृती निर्माण करायचं महान काम ज्यांनी केलं त्यांचे तोंडदेखल्या आभार मानायची पद्धत तोंडदेखल्या का होईना मी पाळतो. a (अंगवि़क्षेप करुन पडणारा विग सावरत कॅमेर्‍याच्या जवळ तोंड नेउन खाजगी आवाजात) खरं तर ह्या कंपनीला चहा बनवायची आयड्या माझीचं. शिवाय त्या झाकीर हुसेनांच्या तबला बडवतानाच्या झैरातीच्या धर्तीवर माझीपण सतार खाजवतानाचा किंवा बासरी फुंकतानाची झैरात करु म्हणुन पण आयडिया दिलेली पण त्यांच्या दूत्त दूत्त डायरेक्टराला माझ्याएवढी डायरेक्शनची जाण नसल्याने ती कल्पना त्यानी फेटाळुन लावली. तर असो मुद्द्याची गोष्ट म्हणजे माझं गाणं....आपलं माझे प्रायोजक...हात्त तेजायला...माझे महागुरु. राजाश्रय असल्याशिवाय कलाजंताची कला कधी फोफावते काय? आमच्या ह्या उपक्रमाला आमचे पच्चिम बाँगाल मधले आणि सौथिंडियन लाल भाई कम्युनिष्टांचाही पाठिंबा आहे. aa आता माझ्या महागुरुंबद्दल काय बोलावं? अर्थशास्त्रं, इतिहास, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, समाजसेवा, भारतीय वैद्यक, पाककलाशास्त्र, ग्याजेटशास्त्रं व अश्या कित्येक शास्त्रांमधे गुरुवर्यांनी आपली पथारी पसरलेली आहे. आजवर मिपा नामक उणिवर्सिटीमधे त्यांनी एक नव्हे दोन नव्हे तीन नव्हे तर

तेवीस पी.एच.ड्यांचे. प्रबंध

लिहिलेले आहेत. इच्छुकांनी सदर लिंकेवर जाउन लाल रंगात न्हाण्याची इच्छा पुरी करुन घ्यावी अशी नम्र विनंती. तसचं सदर प्रबंध तुम्हाला चिमण हटेला पब्लिशर्स बुक डेपो मधे ५००% किंमतीमधे मिळतील ह्याचीही इच्छुकांनी नोंद घ्यावी. तर अश्या ह्या माझ्या गुरु'वर्ज' श्री.श्री.श्री.श्री.श्री. वसंत काटकर ह्यांचे ह्या लाल रंगमंचावर स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या, बसायच्या खुर्च्या आणि बरोबर आणलेल्या पाण्याच्या बाटल्या वाजवुन सहानुभुती व्यक्त करावी. (समोरच्या गर्दीमधुन उगाचं दोन चार लोकं टाळ्या वाजवायचा आवाज येतो आणि म्हाग्रु पडक्या चेहेर्‍याने साउंड गाय कडे बघत) एडिटिंग मधे टाळ्यांचा कडकडाट टाका रे. (तेवढ्यामधे गुरुवर्ज वसंत काटकर लाल रंगाचा पडदा सारुन रंगपटावर प्रवेश करतात. पडदा सारुन पहिलं पाऊल रंगमंचावर टाकतानाचं स्वत:च्याचं धोत्राला अडखळतात आणि एक माकडउडी मारुन स्वतःचा तोल सांभाळतात. गुढग्याची वाटी चोळत चोळत थेट खुर्चीत लँड होतात) म्हाग्रु: अरे वा गुरुजी अगदी कसलेल्या कुंग-फु वाल्याप्रमाणे कोलांटी उडी मारलीत सर्र्र्र्र्र्र तुम्ही. वसंत काटकर्र्र्र्र्र्र्र्र सर (अ.का. व.का) शिंच्या, कुंग-फु, बिंग-फु चे माझे दिवस संपले. हि कला मी गेल्या दिल्ली दौर्‍यामधे त्या मफलरवाल्याकडुन गुरुदक्षिणा म्हणुन मिळवली की रे. बघ कसा अडखळता अडखळता थेट खुर्चीत पोचलो तें. तु ही शिक हो ही कला. म्हाग्रु: अरे वा, गुरुजी तुमची विनोदबुद्धी ह्या वयातही शाबुत आहे म्हणायची. व.का. : माझ्या विनोदबुद्धीला कांय धाड भरणारे. तेवढे तु यत्तां दुशली बं मधे असतांनां सांगायचास ते पाचकळ कमरेवरचे विनोद सांगु नकोस. पाहिजे तर माझं विनोदशास्त्रावरचं पुस्तकं विकतं घेउन वाचं हो शिंच्या. जाताना माझी चिठ्ठी घेउन जा म्हणजे घसघशीत दिड टक्का सुट देतील तुला. म्हाग्रु: आज आपण माझ्याबद्दल नको बोलुयात बर्रं का सर. आज स्वत:ची ला....(जीभ चावुन)..स्वतःविषयी बोलायचा मान तुमचा. मी उरलो फक्तं प्रश्णं विचारण्यापुरता. व.का.: असं म्हणतोसं? बरं मग आज कुठल्या विषयावर आपल्या प्रेक्षकांना ज्ञानामृत पाजायचं म्हणतोस? आज त्यांना आर्यकालीन पाककृती शिकवायची का बिकिनी घातल्यामुळे होणार्‍या संस्कॄतीच्या र्‍हासाबद्दल माहिती देउ म्हणतोस? का असं करुया जरा लेटेष्ट विषय घेउयात काय? म्हणजे बाजीराव मस्तानी आणि चित्रपटाची भन्साळ्याने केलेली काशी? आज प्रेक्षकांनमधे स्त्रीया जास्तं दिसतं आहेत मग म्हणालास तर सौंदर्य प्रसाधनाच्या साधनांवरही बोलु हवं तर. आपल्याकडे वाटायला बरचं आहे. प्रत्येक विषयामधे सखोल अभ्यास असल्याने आपण कोणात्याही विषयावर प्रेक्षकांचं परबोधन करु शकतो. काय समजासं शिंच्या? म्हाग्रु: आपण असं करुयात का? की विषयामधुन विषय निघेल तशी आपली संभाषणाची गाडी कल्लुभायसारखी मोकाट जाउ द्यात काय? रस्त्याकडेला, रस्त्यावर आपले प्रेक्षक आहेतचं की. किंवा मी असं करतो विषयांतर होउ नये म्हणुन आपण फक्तं मिपा उणिवर्सिटीमधल्या तेवीस पी.यच्चं.ड्यांमधल्या सगळ्या थिसिसांवर क्रोनोलॉजीकली चर्चा करुयात? व.का.: ठिक आहे. मग आपण माझ्या सगळ्यात आधीच्या सखोल आणि सर्वांच्या जिव्हाळ्याच्या अर्थशास्त्रावर बोलुयात का? तु मला प्रश्ण विचारुचं नको कसे. मीचं घडाघडा बोलीन. तुझ्या प्रश्णांनी माझ्या ज्ञानधबधब्यामधे अडथळा येईल. त्यामुळे तु आपल्या ओठांची घडी आणि हातावर बोट ठेउन त्या कोपर्‍यात शांतपणे जाउन बैस बरं. तर प्रेक्षकहो आपण बोलु...म्हणजे मी बोलु तुम्ही गपचुप ऐकु अर्थशास्त्रामधला एक महत्त्वाचा विषयः पगार दर आठवड्याला झाला तर काय ह्या जिव्हाळ्याच्या विषयावर. (म्हाग्रुं ताडकन उठुन उभे रहात..घड्याळाकडे लक्ष जाउन ओरडतात...कट कट. वेळ झालीये एका ब्रेक ची. हा भाग स्पॉन्सर केलाय तुमच्या आमच्या पेश्शल ब्रँडने a अर्थात क्रमश:. भेटु पुढच्या भागात. तोपर्यंत पहात रहा म्हाग्रुंचे महागुरु काटकर ह्यांचे तोंड व लालेलाल जाहिराती.

क्रमशः


वाचन 18348 प्रतिक्रिया 0