काटा
लेखनविषय:
काव्यरस
सर्वांनी बंद केल्या मजकडे येणार्या वाटा
राहिली फ़क्त तुझ्या पाऊलाची वाट आत्ता
स्वत:चे जीर्णावशेष घेवुन सोबतीला
जुन्या स्मृतींच्या आधारे उभा गाभारा
माझ्या स्वप्न राज्यात ना राणी ना प्रजा
विना प्रजेच्या राज्याचा मी हा अभागी राजा
न उगवताच कशी मावळते चांदणी
किनार्यास न भेटताच परततात लाटा
सुमनावरती स्वप्न शय्या सजलीच नाही
फुलाच्या ताटव्यात त्या होतो मी एक काटा
वाचने
1534
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
कल्पना ठीक. रचना अजून गेय
धन्यवाद राघव प्रयतन करेन .
कवितेचा आशय छान आहे!!
In reply to कवितेचा आशय छान आहे!! by शार्दुल_हातोळकर
धन्यवाद शार्दुल ..भाऊ