Skip to main content

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

रंगल्या रात्री अश्या

लेखक भैड्या यांनी रविवार, 13/09/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
रंगल्या रात्री अश्या गोलघुमट टक्कल जश्या तो विजेचा खांब तरर्राट उभा असा या सडकेच्या तोंडावरती देऊन टाक भसाभसा दुरून पहा ते कुत्रे सांडांच्या खांद्यावरचे लावलाय लळा तु त्यास आज असा कसा? बुंगाट ढेकर देऊन ऊठ त्या पानावरुन घेऊन जा घागरी अनं हलव तो हापसा आम्ही सुर्याची लेकरे कोवळ्या ऊन्हात निपजितो अन घेऊन या घागरी आज सकाळीच हापसितो दे दे मला तो बंजरखंड मशेरी त्यावर मी भाजितो आज सकाळी टकलावर हात मी फिरवितो

चूक नाही

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 08/09/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
जरी सुखाची आस असणे चूक नाही हाव आहे ही आता, ही भूक नाही ओरडूनी सांग अथवा बस कुढत तेच आहे सत्य की जे मूक नाही बुद्धीची तलवार तू चालव स्वतःवर जातीची तुझियाकडे बंदूक नाही आमुचे ते वेगळेपण प्रिय आम्हा एक बिक होणे मुळी ठाऊक नाही कारणाविण काही येथे होत नाही अचानक हसणे कुणी हा फ्लूक नाही वाटते ते हो करूनी मोकळा तू धाकधूक नाही आणि रुखरुख नाही शेवटी पैसाच देतो चार घास भावनांनी भागणारी भूक नाही आरशाला दोष देणे चूक आहे आरशावर प्रेम करणे चूक नाही एक माझे वेगळेपण वर्ज्य त्यांना यापरी माझी अपूर्व चूक नाही - अपूर्व ओक ब्लॉग दुव
काव्यरस

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

मोकळा आहे तरी ना मुक्त मी...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 07/09/2015 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास आहे घास नाही कोरडे नि:श्वास केवळ भाकरीचा चंद्र नाही, चांदण्याचा भास केवळ साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ मिरग गेला हस्त गेला पांढरीला ओल नाही धान नाही पेरणीला, पावसाची आस केवळ प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ खोल नांदे जखम ओली वेदनेला अंत नाही मोकळा आहे तरी ना मुक्त मी... आभास केवळ अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ विशाल ५/०९/२०१५
काव्यरस

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

नभाचा सातबारा

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 05/09/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
ढगच दाटतात आकाशात सध्या, नभाचा सातबारा राहतो कोराच हल्ली... जगणे सुद्धा कठीण झाले सध्या, पाऊसही बरसतो फक्त कवितेतच हल्ली... जरी बाप राबतो शिवारात त्याचा, शेतकरी असण्याची त्याला लाज वाटते हल्ली... पाहू कोण पुरुन उरतो सध्या, मारण्याचीच स्पर्धा सुरु झाली हल्ली... सारे नेतेच उदंड झाले सध्या, आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली... जिप्सी
काव्यरस

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

चेहरे

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 31/08/2015 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
आश्वासनास भुलले चेहरे काळोख पीत निजले चेहरे हातात आंधळ्यांच्या, बंदुका.. रक्तात हाय, भिजले चेहरे! त्यांची नज़र ढगांना बोचली अन् वावरात रडले चेहरे मी कळवळून गातो मर्सिया अन् दाद देत बसले चेहरे लिहतोस तू कुणासाठी गझल त्यांचे कधीच थिजले चेहरे ---------------------------- आणि जाताजाता ग़ालिबच्या एका शेराचा अनुवाद:- सगळेच काय दडले चेहरे? काही फुलांत दिसले चेहरे मातीत काय शोधीशी अता? झाले विलीन, लपले चेहरे मूळ शेर :- सब कहाँ, कुछ लाल:-ओ-गुल में नुमायाँ हो गईं ख़ाक में क्या सूरतें होंगी, कि पिन्हाँ हो गई