मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

रिचर्ड गेयर आणि चीन

अज्ञात ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुन्हा एकदा चीनने आपल्या डोक ला भागात घुसखोरी केली आहे. भारत, भूटान आणि तिबेट या देशांना जोडणारा हा भाग सामरिक दृष्ट्या फार महत्वाचा आहे. तेथे चीन सध्या रस्ता बांधत आहे. भारतीय जवानांनी ते काम रोखल्यावर चीनी लोकमुक्ती सेनेने तीन किमी आत येऊन भारतीय बंकर उध्वस्त तर केलेच पण आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठा तमाशा करून भारतावर नियंत्रण रेषेच्या उल्लंघनाचा आरोप ठेवला आहे. यालाच मराठीत ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे म्हणतात. आपल्यापैकी अनेकांनी ‘रिचर्ड गेयर’ हे नाव ऐकलेच असेल. रिचर्ड गेयर हा नव्वदीच्या दशकातला हॉलीवूड सुपरस्टार. त्याचे अमेरिकन जिगोलो, शिकागो, सारखे अनेक चित्रपट गाजलेले आहेत.

आक्रमक चीनचा धोका

आशु जोग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाकिस्तानला शिव्या देण्याची भारतीय नेते आणि जनता यांना तशी सवय झाली आहे. किंबहूना पाकिस्तानला शिव्या दिल्याशिवाय आमची देशभक्ती सिद्धच होत नाही. शत्रू जेवढा छोटा तेवढ्या शिव्या जोरात. हा भारतीयांचा ढोंगीपणा नेहमी पहायला मिळतो. चीनबद्दल मात्र आमची ब्र काढायची हिम्मत नसते, तिथे आम्ही भारतीय पेग गिळून गप्प बसतो. असो. पाकिस्तानबद्दल सध्या पुरे.

अजून एक कप, 'हमेशा तुमको चहा'

सरनौबत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्मार्टफोन वर लांबलचक पोस्ट्स लोकं वाचत नाहीत. म्हणून 'हमेशा तुमको चहा' मध्ये मोजक्याच गोष्टी लिहिल्या. जिव्हाळ्याचा विषय असल्याने लेखाबद्दल बरेच अभिप्राय आले. ‘आधण शिल्लक आहे आणि गॅस गरम आहे’ तोवर अजून एक कप टाकू म्हणून हा 'दुसरा कप'

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

सहप्रवासी २

विनायक प्रभू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सहप्रवासी भाग 1 असाच एक रविवार. दुपारचे २ सी.एस.टी ठाणे लोकल. सरळ बाजुची खिड़की पकडुन बॅक लॉग भरण्यासाठी उलटी मोजणी. जास्त म्हणजे ६० पर्यंत सुक्ष्मात विलिन होण्याची खात्री. डुलकी लागतच होती आणि दरवाजावर कल्ला झाला. ३ कॉलेज कन्या डब्यात शिरल्या. अगदी गाडी सुटता सुटता. डब्यात इन मीन २ प्रवासी. समोरच्या बाकावर खिदळत समुह स्थानापन्न. ... "ए तु जुली बघितलायस का ग"? कन्या १ माझ्या अंगावर शहारा आला. डोळे अर्धवट उघडुन प्रश्नकर्ती कडे ओझर टाकला. "हॉ" कन्या २ "व्हॉट्स द बिग डील? काय बावळट्पणा. करायच्च ते करायच वरुन आय लव यू म्हणुन पिळायच.

मुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही...

आदित्य कोरडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(मुळात मुलांचे लैंगिक शिक्षण कसे करावे?, त्याना हे शिक्षण कसे द्यावे? हे सांगण्याकरता हा लेख लिहिलेला नाही. ह्या एरवी अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधी सर्वसामान्य पालकांचा आणि सरकारचाही दृष्टीकोन काय आहे आणि तो कसा असायला हवा?, का असायला हवा? हे सांगायचा हा प्रयत्न आहे. खरे पाहू जाता लैंगिक शिक्षण आणि लैंगिकता शिक्षण ह्यात थोडा फरक आहे पण मुळात जेथे लैंगिक शिक्षण ह्या विषयी जबाबदारीने काही लिहिणे बोलणे कमी, त्यात ह्या दोनही गोष्टीतल्या फरकावर विस्तृत बोलणे म्हणजे विषयान्तराला आमंत्रण देणे ...मागे एकदा मी ‘ शिक्षण : धोरण उद्दिष्ट आणि गफलती’ हि चार भागांची लेखमाला लिहिली होती.

नाणी ते नोटा छपाई : नाशिक उद्योग ०७

सुधीर मुतालीक ·
लेखनप्रकार
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.

बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७

खेडूत ·
h . . (प्रासंगिक) सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत. एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.

( वरपरीक्षा )

रातराणी ·
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

प्रमोशन

किसन शिंदे ·
माॅर्निंग ब्रेकची वेळ. ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.