Skip to main content

धोरण

सह्याद्री वाचवा !

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 26/10/2026 09:06 या दिवशी प्रकाशित केले.

सह्याद्रीच्या जंगलावर कुऱ्हाड, जनतेच्या पैशांवर भार आणि सत्ताधाऱ्यांचे उद्योगपतींशी हितसंबंध — टॉरंटच्या कर्जत प्रकल्पाला विरोध का केला पाहिजे?

३२,४९० झाडे तोडून ३,००० मेगावॅटचा पंप स्टोरेज प्रकल्प उभारणे म्हणजे विकास की निसर्गाच्या किमतीवर खासगी कंपनीसाठी नवा व्यवसाय?

उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम म

लेखक ताजे प्रेत यांनी बुधवार, 18/03/2026 12:54 या दिवशी प्रकाशित केले.

उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम

पुण्यातील एका वस्तीत 'रखमा' नावाच्या एका स्त्रीचा हातभट्टीचा (गावठी दारूचा) अड्डा होता. अंगावर जुनी साडी, दारूच्या वासाने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम एक निर्विकार भाव... हीच रखमाची ओळख होती. पण यामागे एक मोठे रहस्य होते. रखमाने 'न्यूक्लिअर इंजिनिअरिंग'मध्ये डिप्लोमा केलेला होता. पण वशिलेबाजीमुळे आणि नशिबामुळे तिला कुठेच जॉब मिळाला नाही. शेवटी पोटापाण्यासाठी तिने पुण्यात हातभट्टी लावली होती.

सहज सुचलं म्हणून _ २०२६

लेखक कंजूस यांनी बुधवार, 18/03/2026 10:03 या दिवशी प्रकाशित केले.

मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे.
राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी.
-----------------------------

खाडीवरचे दिवस!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 21/02/2026 14:33 या दिवशी प्रकाशित केले.

कालच एक जुना मित्र बरेच दिवसांनी भेटला होता आणि बोलण्याच्या ओघात गप्पा खाडीवर पोहण्याकडे वळल्या. आणि झरकन सगळ्या आठवणी एक एक करून डोळ्यापुढे नाचू लागल्या.

कुंपण

लेखक रांचो यांनी शुक्रवार, 23/01/2026 18:43 या दिवशी प्रकाशित केले.

खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती.
ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे.
इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता.

वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती.

सैरभैर डायरी - २.३

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 12/01/2026 19:27 या दिवशी प्रकाशित केले.

२.१

२.२

"मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले.

२.३

67 नगरसेवक बिनविरोध विजयी

लेखक बाजीगर यांनी रविवार, 04/01/2026 20:29 या दिवशी प्रकाशित केले.

निवडणूक झाली नाही,
पण विजयी झाले काही.
नवीन फंडा बिनविरोध...
व्हा बाप वापरून निरोध !

५ कोटी बक्षीस द्या...
माघारपत्र विकत घ्या...

निवडणूक आयोग करणार
आहे चौकशीचा फार्स,
एक affidavit फेकून मिळणार,
शेती, फार्म हाऊस, महागड्या कार्स.

कुणाचाही नव्हता दबाव,
माघारवीर करणार बनाव.

जिंकला गेल्याचे नाही,
मतदारांचा मारला हक्क..
म्हातारी मेल्याचे नाही,
काळ सोकावतो हे दुःख.

एक उमेदवार असला तरी,
घ्याच मतदान प्राधिकार,
'None of the above' NOTA
चा मतदार वापरतील अधिकार !