सहप्रवासी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
23 May 2013 - 6:20 pm

अर्धवट झोपेत होतो. त्रिशंकू अवस्था.
पण जी काही ग्लानी होती ती झटकन इवॅपोरेट झाली.
When sun beats down, the water gets evaporated and we get salt...बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्या.
मला आता पुढील सहप्रवासाची लक्षणे लगेच लक्षात आली.

कंसक्टर ने मुलाच्या वयाची विचारपुस केली.
वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो.
दोन मिनिटातच मागणी पुढे आली.
"माला भुक लागली"
ताईंनी बिस्किटचा पुडा काढला.
त्यात चित्रविचित्र आकाराची बिस्कीटे होती.
"मी आर्यन मॅन खाणार" पाच मिनिटात सर्व सुपर हिरो़ संपले
"आता मी १०० मीटर खेळणार".
मी दटावणार होत पण कंडक्टरनी पुढाकार घेतला.
पण चिरंजिव काही बधेनात.
परिस्थिती ताब्यात घेण्याकरता मी पापण्ञा वर केल्या.
छोटू लगेच सुतासारखा सरळ.
पण फक्त पाचच मिनिटे.
"आबांना मिश्या नाही"
ते आबा नाहीत. त्यांना को पॅसेंजर म्हणायचे..ताई.
"को पॅसेंजर मंजे काय"
one who travels with us is a co passenger.. ताई
"पॅसेंजर म्हंजे काय"
one who travels from one place to other.. ताई.
मी एक दिर्घ श्वास घेतला आनी मनातल्या मनात स्वतः ला समजावले 'प्रतिक्रिया द्यायची नाही'
"आबा तुम्ही कुठे जाताय"?
चेंबुर ला
"कशाला"?
अरे ऑफिसला. तुझे बाबा जातात ना तसा.
"माझे बाबा कि नै ऑफिसला जात नाहीत. फॅक्टरीला जातात"
हो का. कुठे आहे तुमची फॅक्टरी.
"महाडला".
केमीकल फॅक्टरी आहे असे सांग आबांना.. ताईंचे प्रॉम्प्टींग.
पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.
अरे वा. मग तु कुठे मुंबईला आज्जी कडे का?
छोटू क्षणभर थांबला.
"बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये. माला टॉइज पाठवतात आणि मम्माला मनी. बाबा महाडला, मी आणि मम्मा ठाण्याला".
ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

23 May 2013 - 8:53 pm | निवेदिता-ताई

लहान मुले निष्पाप असतात....... :)

लाल टोपी's picture

23 May 2013 - 11:00 pm | लाल टोपी

चांगलाच कात्रज केला की..!!

पिवळा डांबिस's picture

23 May 2013 - 11:06 pm | पिवळा डांबिस

बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये.

को-पॅसेंजर म्हणायची!!!
:)

डोंबलं ! वॅट काढून जीएसटी आणलाय इतकचं. बाबाच्या जीवनात घंटा फरक पडेल असं वाटतं नाहीये ! :)

प्यारे१'s picture

23 May 2013 - 11:07 pm | प्यारे१

खास शैलीतला खास लेख.

पैसा's picture

23 May 2013 - 11:20 pm | पैसा

त्या निष्पाप मुलाचं वाईट वाटलं. तरी त्याच्या मम्मीला बाबांचं एवढं काय कौतुक कळलं नाही.

पिवळा डांबिस's picture

23 May 2013 - 11:24 pm | पिवळा डांबिस

तरी त्याच्या मम्मीला बाबांचं एवढं काय कौतुक कळलं नाही

आँ?
ज्योताय, तुमचा आयडी काय आहे?
:)

पैसा's picture

23 May 2013 - 11:29 pm | पैसा

हाहाहा! त्याची सतत आठवण रहावी म्हणून घेतलाय तो आयडी. नाहीतर हे असे प्रश्न पडतात!!! =))

अनेक शक्यतांचा विचार करायला भाग पाडणारा अनुभव!बरंच उलगडून सांगणारा आणि काहीसा कोड्यात टाकणारा!

उपास's picture

23 May 2013 - 11:33 pm | उपास

>>ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.
रोचक निरिक्षण! बर्‍याच शक्यता वाचकांवर सोडल्यात.. मज्जा! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 May 2013 - 11:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लहान मुलांना अनेक गोष्टी स्कँड्युलस वाटत नाहीत. मोठ्यांना स्कँडलाईज झालेलं बघून पोरं शिकतात.

या ताईंना अर्जुनाचं (पोरगा अभिमन्यू असेल तर त्याचे वडील अर्जुन) एवढं कौतुक का असावं हे समजलं नाही. सामान्यतः अशा परिस्थितीत अर्जुनाचा राग-राग सुरू झालेला दिसतो.

अरे ऑफिसला. तुझे बाबा जातात ना तसा.

बाबाच का ऑफिसला जातात, आई का नाही जात? -- हा प्रश्न तुम्हाला आहे मास्तर. खासगीत उत्तर दिलंत तरी चालेल.

विनायक प्रभू's picture

24 May 2013 - 11:35 am | विनायक प्रभू

खाजगीत कशाला? इथेच देतो.
त्याचे काय आहे तै,Birds of same feathers किंवा एक ही डाल के चट्टे बट्टे.
दुसरे कै नै.

विनायक प्रभू's picture

24 May 2013 - 6:47 am | विनायक प्रभू

राग का नसावा? १. संबध तुटल्यानंतर नैतिक जबाबदारी पाळली? २. मी मोकळी तू मोकळा हा मॅच्युअर अप्रोच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2013 - 12:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुलाबरोबर त्याची आई होती का आजी हे मला नीटसं समजलं नाही.

पण त्याने फार फरक पडत नाही. नवरा-बायकोचे संबंध तुटलेले असताना, "मी मोकळी तू मोकळा" इतपत समजूतदारपणा असूनही पन्नास लोकांना नोकरी देण्याबद्दल एवढा अभिमान बाळगणं किंचित मजेशीर आणि बरचसं अनैसर्गिक वाटलं. एवढ्या समजूतदारपणाने वेगळी झालेली भारतीय जोडपी (घटस्फोटित अथवा प्रेमसंबंध तुटलेली) माझ्या पहाण्यात नाहीत; असण्याची शक्यता नाकारत नाही.

बाकी ते birds of same feather बद्दल मलाच टंकाळा आला आहे. फोनवर/प्रत्यक्षात भेटू तेव्हा बोलू.

शित्रेउमेश's picture

29 Jun 2017 - 11:11 am | शित्रेउमेश

"टंकाळा" शब्द प्रचंड आवडला आहे.....

परिकथेतील राजकुमार's picture

24 May 2013 - 5:04 pm | परिकथेतील राजकुमार

टिपिकल गुर्जी लेख.
थोडक्यात आणि महत्वाचे.

महत्वाचे अवांतर :- संपादित.

भावना कल्लोळ's picture

24 May 2013 - 5:50 pm | भावना कल्लोळ

अश्या वेळी त्या नायिकेला कसे react व्हावे हेच कळले नसेल, एक सुन्न आवाज भिनला असणार तेव्हा तिच्या मनात.

वर नमूद केलेल्या कारणांमुळेच विसंगत वाटलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2013 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लहान मुलांचे हाल होतात राव. असो, सर अधून मधून येत चला.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

24 May 2013 - 10:32 pm | संजय क्षीरसागर

मायला, या ताई (अभिमन्युच्या) कोण? हा प्रश्न आता सुटायलाच हवा.

यशोधरा's picture

24 May 2013 - 11:01 pm | यशोधरा

ते आबा नाहीत. त्यांना को पॅसेंजर म्हणायचे..ताई.
"को पॅसेंजर मंजे काय"
one who travels with us is a co passenger.. ताई

ताई खरंच हुशार आहेत. एक अंतर राखून ठेवले.

ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.

काय चुकले?

संजय क्षीरसागर's picture

24 May 2013 - 11:35 pm | संजय क्षीरसागर

ताई (अभिमन्युच्या) कोण? यावर सगळं अवलंबून आहे. जर आई असेल तर प्रश्न चर्चेला येईल. केअर टेकर असेल तर चेहेर्‍यावर काय भाव दाखवणार?

यशोधरा's picture

24 May 2013 - 11:57 pm | यशोधरा

आई असली तरी प्रवासात तिने कोणा अनोळखी व्यक्तीसमोर चेहर्‍यावर भाव दाखवावेत वा काहीच प्रतिक्रिया व्यक्त का व्यक्त करावी?
उलट मुलाच्या मनात (आई हे गृहित धरुन) वडिलांबद्दल ती काहीही नकारात्मक पेरत नाहीये, असेही असू शकते आणि तो मॅच्युअर निर्णय असू शकतो.

इतरांना भोचक चवकशा कशाला?

प्यारे१'s picture

25 May 2013 - 12:19 am | प्यारे१

मुलगा थेट बाबानं दुसरी मम्मा आणली वगैरे बोलेल असं त्या बाईंना वाटलं नसेल.
त्याबरोबरच आत कदाचित कुठंतरी त्या बाईंना आपल्या नवर्‍याचा अभिमान असेल,
कदाचित नवरा बायकोच्या संबंधांमध्ये बाई चुकू शकते ह्याबद्दल हे तिला स्वतःला कुठंतरी मान्य असेल
त्यामुळं त्रागा न करता ती निर्विकार चेहरा ठेवून बघत असेल.

माणसाला एकदा चष्मा लागला की जाता जात नाही ब्वा. कोणी नेत्रतज्ज्ञ आहेत का????? ;)

खरं आहे!

त्याबरोबरच आत कदाचित कुठंतरी त्या बाईंना आपल्या नवर्‍याचा अभिमान असेल,

ज्या पत्नीला नवर्‍याचा अभिमान आहे ती कशाला डिवोर्स घेईल?

कदाचित नवरा बायकोच्या संबंधांमध्ये बाई चुकू शकते ह्याबद्दल हे तिला स्वतःला कुठंतरी मान्य असेल

शाब्बास! इतका समंजसपणा असल्यावर डिवोर्स होतो?

मुलगा थेट बाबानं दुसरी मम्मा आणली वगैरे बोलेल असं त्या बाईंना वाटलं नसेल.

इतकी सूज्ञ पत्नी अशा वेळी निर्विकार राहील? अनाहूतपणे ती नवर्‍याच्या बाजूनं काही तरी बोलेल.

प्यारे१'s picture

25 May 2013 - 12:40 am | प्यारे१

कोण प्रभू सर का? हा. आलो आलो.

साहेब, एक्स्क्यूज मी. सर बोलावत आहेत.
मी एक काम करतो. को पॅसेंजरचा नंबर घेतला का विचारतो.
घेतला असेल तर तुम्हाला फॉरवर्ड करतो. नाहीतर आपण सगळे मिळून फोन करु.
सोक्षमोक्ष लावूनच टाकू. असं कसं निर्विकार राहतात लोक? श्श्श्श्या!

पण नंबर नसेल घेतला तर काय करता येईल? काही सुचतंय का बरं?

संजय क्षीरसागर's picture

25 May 2013 - 1:02 am | संजय क्षीरसागर

ज्या पत्नीला आपल्या नवर्‍याविषयी अजूनही आपुलकी आहे ती स्वतःच्या मुलाला पहिल्या वाक्यालाच अडवेल.त्या क्षणी ती सर्व प्रसंग सावरेल. इतक्या पुढच्या गोष्टी ती त्याला इतरांसमोर बोलूच देणार नाही.

प्रश्न चष्म्याचा नसावा, गैरसमजाचा आहे. तो एकदा दूर झाला की नीट वाचता येतं आणि लेखनाचा नेमका अर्थ कळतो.

प्यारे१'s picture

25 May 2013 - 1:14 am | प्यारे१

एक काम करुया.
"बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये. माला टॉइज पाठवतात आणि मम्माला मनी. बाबा महाडला, मी आणि मम्मा ठाण्याला".

मनातल्या मनात म्हणा. किती वेळ लागतो? १० सेकंद?
तेवढ्या वेळात त्या स्त्रीनं मुलाला कशा पद्धतीनं अडवायला हवं होतं?
मुलाचं तोंड हातानं बंद करणं? गप्प बस असं डाफरुन?

त्यापेक्षा चेहरा निर्विकार ठेवणं जास्त मॅच्युरिटीचं नाही वाटत?

वैयक्तिक विचारतोय : हल्ली दूध घरच्या बैलाचं असतं का?

संजय क्षीरसागर's picture

25 May 2013 - 10:35 am | संजय क्षीरसागर

तो मुलगा सार्‍या प्रवासात एकदाही त्या स्त्रीला मम्मा म्हणाला नाहीये.

आणि तसं ही बैलाला कळायला वेळ लागतो. सगळी वाक्य बोलायला किती सेकंद लागतात हा प्रश्नच नाही. सुरूवात होता क्षणी माणसाच्या लक्षात येतं की विषय कुठं चालला आहे.

विनायक प्रभू's picture

25 May 2013 - 11:07 am | विनायक प्रभू

नियमाला अपवाद नसतो का?

माझं निरिक्षण सरळ होतं :

तो मुलगा सार्‍या प्रवासात एकदाही त्या स्त्रीला मम्मा म्हणाला नाहीये.

आणि आता तुम्ही म्हणताय :

छोटू चे ते वाक्य " मम्मा माला भुक लागली" असे होते

हे संवादातलं पहिलंच वाक्य आहे!

ते वाक्य अचूक असतं तर या पोस्टवर मी एकही प्रतिसाद दिला नसता.

माझ्या एका साध्याश्या विनोदावर (ज्याचा कुणावर काहीही व्यक्तिगत रोख नव्हता) सभासदांनी किती वैयक्तिक राळ उडवली ते मात्र पाहण्यासारखं आहे.

संजय क्षीरसागर's picture

25 May 2013 - 12:23 am | संजय क्षीरसागर

ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.

हा पोस्टचा शेवट आहे. ती संबंधित नसेल तर चेहरा निर्विकार असण्यात काही विषेश नाही. आई असेल तर डिवोर्सी असून नवर्‍याचं कौतुक कसं ?(पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.) असा साधा प्रश्न आहे आणि वरचे काही प्रतिसाद त्या अंगानं आहेत. चवकशी भोचक असणं हा मात्र पाहणार्‍याचा दृष्टीकोन आहे.

यशोधरा's picture

25 May 2013 - 12:30 am | यशोधरा

पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते. - हाही पाहणार्‍याचा दृष्टीकोनच आहे.

व्यक्ती पत्नी आहे हे गृहीत धरुन, कदाचित त्यांचा दृष्टीकोन - जे काही मतभेद, बेबनाव आहेत ते त्यांच्यात आणि नवर्‍यात असू द्यावेत व मुलाला त्याची काही झळ बसायला नको असा असू नाही का शकत? मुलगा लहान आहे, बालबुद्धी अतिशय सत्य बोलते. उलट तिथे मुलाच्या म्हणण्यावर काहीच नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त न करण्याच्या व स्वतःचा आब राखून राहण्याच्या वृत्तीचे कौतुक वाटते.

संजय क्षीरसागर's picture

25 May 2013 - 12:49 am | संजय क्षीरसागर

कुठल्या जगात राहता?

"बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये. माला टॉइज पाठवतात आणि मम्माला मनी. बाबा महाडला, मी आणि मम्मा ठाण्याला".

याचा उघड अर्थ ती स्त्री त्याची आई नाही असा होतो. नाही तर समोर असणार्‍या आईला मुलानं एकदा तरी सरळ `हिला' म्हटलं असतं. त्यानं सतत `मम्मा' असा (तृतीय पुरूषी) उल्लेख केला नसता.

यशोधरा's picture

25 May 2013 - 12:58 am | यशोधरा

गृहितक.

संजय क्षीरसागर's picture

25 May 2013 - 1:06 am | संजय क्षीरसागर

साधी गोष्ट आहे : नवर्‍याबद्दल आपुलकी असलेली आई स्वतःच्या मुलाला पहिल्या वाक्यालाच अडवेल! ती इतरांसमोर असा तमाशा होऊ देणार नाही.

लहान मुलं पटकन बोलून जातात हो, ती खर्‍या अर्थाने "मी" ची कन्सेप्ट जाणतात. असो.

संजय क्षीरसागर's picture

25 May 2013 - 10:39 am | संजय क्षीरसागर

एखादी उघड गोष्ट अमान्य करण्यात आपण उगीच दुसर्‍यावर अहंकार वगैरे कल्पना लादून, स्वतःचा `मी' कसा वाचवतो हा आहे.

एखादी उघड गोष्ट अमान्य करण्यात

काय उघड गोष्ट आहे..? "मला" पण कळूदे, संपूर्ण लेख वाचूनही "माझ्या" वाचण्यात काही गफलत होते आहे का..

****************

आमची येष्टी...???? आता मास्तरांनी रिंगणात प्रवेश घेतला. (पुलंच्या म्हैस मधून साभार!)

यशोधरा's picture

25 May 2013 - 8:18 pm | यशोधरा

स्वतःचे चपखल वर्णन करु शकल्याबद्दल. भल्याभल्यांना जमत नाही म्हणे.

अवांतर: आईच म्हणे की लेकराची. असो, असो.

बॅटमॅन's picture

25 May 2013 - 12:35 am | बॅटमॅन

चवकशी भोचक असणं हा मात्र पाहणार्‍याचा दृष्टीकोन आहे.

या केसमध्ये सहमत.

स्पंदना's picture

25 May 2013 - 5:25 am | स्पंदना

पहिला नमस्कार गुर्जींना. भिडलं लिहिलं अन आम्हालाही पोहोचलं.
प्रसंग छोटासाच पण इतक्या लहाण मुलाच्या तोंडुन ऐकताना आपल्या भावभावना डचमळतात. नव्याने चालायला बोलायला शिकताना समोर येणारे शब्द तसेच्या तसे उच्चारत बाळ बोलुन गेल. त्यात भावनांची फोडणी घालायला त्याला अजुन जमणार नाही , ते त्याच वयही नाही.
जे काही शिकवणं आहे या प्रसंगाच्या आधीच, ते बरच काही सांगुन जात 'त्या' बाईंबद्दल. सरळ साधी फॅक्टस सांगण चाललय. इवॅपोरेट म्हणजे पाण्याला पंख फुटतात अन त्याचे ढग होतात अस मी सांगितल असत. तेव्हढा आयुष्यात रस आहे, लहानग्याच कल्पना विश्व ही गोष्ट स्विकरुन गेलं असत.
तसच 'आबा' को-पॅसेंजर असणं हे ही ती तेव्हढ्याच अलिप्ततेने सांगते आहे. आपले आजोबा ना? अस वगैरे पाल्हाळ नाही आहे. म्हणजे अगदी शेवटी बसणारा धक्का हळु हळु का असेना पण पहिल्या वाक्यापासुनच बसतो आहे.
गुर्जी __/\__

विनायकराव लिखाण आणि निरीक्षण तेंडुलकरांची आठवण करून देतंय ,सार्वजनिक वाहनाने प्रवास डुलक्या घेत चालूच ठेवा नंतर लिहित राहा . पूर्वी राजांच्या बऱ्याच राण्या असायच्याच पण एक मी तरी राहीन नाहीतर ही असं कधिच झालं नाही .प्रत्येकीला छोटे मोठे महाल वाडे हेतेच . साधा सायकलवरून पाव विकणाऱ्याच्या चार बायका असतात . नवीन केली की तिच्या हाताला मेंदी आणि पहिलीच्या हातात विम पाउडर असे सर्वच पुरुष करत नाहित . एका प्रसिध्द आणि मान्यवर मराठी निर्मात्याने तीन केल्या पण कधिच चर्चेत प्रकरणं आली नाहित .'दिल' और 'दौलत' आहे तर 'दर्द' गायब . अभिमन्युही लहान वयातच 'समजदार' वाटतोय .ताईंचा चेहरा नाही पाहिला तरी वाईट वाटायला नको ,संवादातला दृष्टिकोन महत्वाचा वाटतो .

विनायक प्रभू's picture

25 May 2013 - 10:36 am | विनायक प्रभू

छोटू चे ते वाक्य " मम्मा माला भुक लागली" असे होते.
यशोधरा व अपर्णा तुमच्या प्रतिक्रिया वाचल्यावर माझे बरेच गोंधळ दूर झाले.
सहमत आणि धन्यवाद.

प्यारे१'s picture

25 May 2013 - 8:22 pm | प्यारे१

सार,
अम्बल रिक्वेश्ट सार,
प्ळिज डोण्ट राईट येन्नीतिंग क्रिप्टीक्क हेन्सफोर्थ
येल्याबोरेट येवरीतिंग, सार. ;)

यशोधरा's picture

25 May 2013 - 8:28 pm | यशोधरा

ती स्त्री आई होती हे स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही समाज बर्‍यापैकी जवळून पाहिला आहे ना? निदान तुम्हांला तरी त्या माऊलीचं सर्वांपासून एक अंतर राखून असणं समजू शकेल अशी एक आशा मला आहे. तिचं काही चुकलं असं मला अजिबात वाटत नाही. ती स्वतःला समाजाच्या एकूणच भोचकपणापासून सांभाळू पहात असेल. जरी तुम्ही आबांच्या वयाचे असलात तरी कधीतरी कुठे पहिल्यांदांच काही तासांच्या प्रवासात योगायोगाने तुम्ही एकत्र आला होता, तुमच्यावर एकदम विश्वास जर ती स्त्री टाकू शकत नसली तरी त्याबद्दल तिला दोष देता येईल असंही नाही. तुम्हांला काय वाटतं? तिच्या दृष्टीकोनातून कृपया विचार करुन पहा. तुमच्या जागी इतर कोणी असते तरीही ती तशीच वागली नसती का?

लहानग्याच्या विश्वात बाबाला अजूनही एक स्थान आहे. ते स्थान ती मोडत नाहीये, ह्याबद्दल तर तिचं मनापासून कौतुक. माऊलीचं मन मोठं आहे. मोठ्या लोकांच्या हेव्यादाव्यात लहानग्याच विश्व करपू नये इतकी जाण असावी. स्वतःचं दु:ख, त्रास, मनस्ताप (होत नसेल?) बाजूला ठेवून ती मुलाच्या भावविश्वाला जपते. यथावकाश मुलाला कळेल तेह्वाही ती ते व्यवस्थित निभावून नेईल ह्याबद्दल मला तरी शंका नाही.

ह्या अनुभवाबद्दल आणि सहमतीबद्दल धन्यवाद.

अवांतरः ३ पासून २०० परेंत वाढलेल्या पसार्‍यावरही काही लेखन येऊ देत. वाचायला खूप आवडेल.

विसोबा खेचर's picture

25 May 2013 - 10:37 am | विसोबा खेचर

मास्तर........

सहज's picture

25 May 2013 - 11:21 am | सहज

केवढा प्रवास केलात मास्तर, सहप्रवासी दमले ना :-)

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2013 - 1:38 pm | प्रभाकर पेठकर

केमीकल फॅक्टरी आहे असे सांग आबांना.. ताईंचे प्रॉम्प्टींग.
पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.

कदाचित ताई त्या कारखान्यात बरोबरीच्या भागिदार असाव्यात. घटस्फोट झाला म्हणून भागिदारी निकालात निघत नाही. भागिदारी निकालात न काढण्याचा निर्णय झाला असावा.

कौतुक ओसंडून जात होते ते कारखान्याच्या यशामुळे असेल. नवर्‍याबद्दल असेलच असे नाही.

तसेच,

जर एक व्यक्ती म्हणून नवर्‍याबद्दल कौतुक असेल तर, आपापसातल्या मतभेदांमुळे, लहानग्याच्या मनांत वडिल ह्या नात्याबद्दल कटूता निर्माण होऊ नये, त्याच्या भावनिक प्रगती आड ती कटूता येऊ नये असा विचार असेल. वडिलांच्या, व्यवसायातील, संघर्षाबद्दल सतत बोलून आणि त्यांच्या यशाबद्दल नेहमी कौतुकोद्गार काढून मुलाच्या मनात एक यशस्वी उद्योजक बनण्याची बीजे रोवण्याचाही संस्कार असू शकतो.

समंजस's picture

27 May 2013 - 7:28 pm | समंजस

पावणे दोन वर्षाच्या मुलाने विज्ञान शिकणे, मिठ कसे तयार होते हे शिकणे......
परिस्थीती गंभिर होत चाललीय हे माहित आहे परंतू एवढी गंभिर?
आनंद आहे आणि दु:ख आहे.....

अवांतरः रेडी टू वर्क मुलेच जन्माला घातली तर? :)

छोटेखानी प्रसंग आवडला.
काही मंडळी उगाच किस काढत बसतात राव.
ती को-प्रवासी, प्रसंगाचा नायक आणि मास्तर निवांत घरी जाऊन झोपले असतील एव्हाना आणि आपली मंडळी इथे रवंथ करीत बसली आहेत. =))

मी-सौरभ's picture

28 May 2013 - 11:29 pm | मी-सौरभ

अगदी हेच म्हणायच होतं....
गंपाशेट तुमच्या प्रतिक्रिया किती आधार असतात मला +१ टंकायला :)

बंडा मामा's picture

28 May 2013 - 12:02 am | बंडा मामा

वय पावणे दोन वर्षे (१८ महिने) ? इथल्या कुणी लहान मुले बघीतली नाहीयेत का?

ह्या वयात मुलांना सर्वसाधारणपणे १२ शब्द येतात. पूर्ण वाक्ये म्हणता येत नाहीत. एखाद दोन शब्द जोडून जसे की 'खाऊ दे' वगैरे प्राथमिक वाक्ये म्हणता येतात. वरील कथेतला मुलगा खरंच पावणेदोन वर्षाचा असेल तर सदर कथा ही १००% काल्पनिक आहे.

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2013 - 1:53 am | प्रभाकर पेठकर

बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्या.

लेखकाच्या वरील वाक्यावरही विचार व्हावा.

अभिमन्यूने चक्रव्यूवाची रचना गर्भात असताना ऐकली (आणि आत्मसात) केली असे पुराणात म्हंटले आहे.
त्यामुळे, आपला कथानायक वयाने लहान आहे, ह्याची जाण लेखकास आहे. आणि आईचे प्रयत्न, एवढ्यालहान वयातच, त्याला ज्ञानांमृत पाजण्याचे आहेत असे निरिक्षणही लेखकाने, अभिमन्यू नांव योजून, नोंदविले आहे.

हल्लीच्या काळातही गर्भातील बालकाला संगीत ऐकविण्याचे वगैरे प्रयोग झाले आहेत.

बंडा मामा's picture

28 May 2013 - 2:28 am | बंडा मामा

लेखकाने कथा काल्पनिक आहे असे कुठेही लिहिलेले नाही. दुसरे म्हणजे काल्पनिक असली तरी त्यात कन्विन्सिंग एलेमेंट असला पाहिजे. १८ -२० महिन्याचा काय दोन वर्षे पूर्ण झालेला मुलगाही वरील लेखात दिलेली वाक्ये बोलताना कुणाला दिसला असल्यास मी माझे प्रतिसाद बिनशर्त मागे घेईन. आजुबाजुस कुणी ह्या वयाचे बालक असल्यास प्रयोग करुन पाहणे. वर दिलेली वाक्ये म्हणता येणार्‍या बालकाचे वय किमान ३ वर्षे जवळपास हवे.

(त्या मुलाचे नाव रजनीकांत होते असा खुलासा केल्यास सगळेच मुद्दे निकालात निघतील.)

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2013 - 2:40 am | प्रभाकर पेठकर

वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो

ह्या वाक्यातही मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे हे ऐकून लेखकाला आश्चर्य वाटले. (म्हणजे लेखकाच्या मते मुलाचे वय पावणे दोन वर्षांपेक्षा जास्त असावे असे वाटले असणार) नाहीतर 'फ्रिझ' कशामुळे झाले? हा प्रश्न उद्भवतो.

मुलाचे वय आईने सांगितले आहे. तिकिटाचे पैसे वाचविण्यासाठी मुलांचे वय चोरणे हे सर्वत्र दिसून येते. आया तर स्वतःचे वयही चोरतात. (तिकिटासाठी नाही, सर्वसामान्य प्रसंगी) असो.

बंडा मामा's picture

30 May 2013 - 2:49 am | बंडा मामा

पावणे दोन वर्षाचा मुलगा असुन किती स्पष्ट बोलतो आहे ह्यामुळे ते फ्रिज झाले होते असे लेखनातुन मला तरी वाटते. आई वय चोरायसाठी खोटं बोलत आहे ह्यामुळे ते फ्रिज झाले असल्यास त्याचा ह्या कथेशी काहीही संबध दिसत नाही. तिकिटाचे पैसे चोरायला आई खोटे बोलते आहे ह्याचा लेखातल्या थीमशी काहीच संबध नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे, त्या ताईंना पैशाची कमी नाही असे लेखातुन दिसते, त्यामुळे बसच्या तिकिटाचे पैसे वाचवायला ते खोटे बोलत असतील हे पटणारे नाही.

कंसक्टर ने मुलाच्या वयाची विचारपुस केली.
वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो.

ही वाक्ये वाचून मला असे वाटले होते की त्या ताईंनी मुलाचे अर्धे तिकीट वाचवण्याकरिता (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.

बंडा मामा's picture

30 May 2013 - 2:51 am | बंडा मामा

(आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.

तसे असते तर त्या बाई पावणे तीन म्हणाल्या असत्या. पावणे दोन म्हणण्यात काहीच पॉइंट नाही. लेखातली ही विसंगतीच आहे.

मोदक's picture

30 May 2013 - 2:56 am | मोदक

याच लॉजीकने पावणेतीन म्हणण्यात तरी काय पॉईंट आहे.. त्यांनी अडीच म्हणायला हवे होते. ;-)

या न्यायाने आपण तर्क लढवून काहीच साध्य करू शकणार नाही. तस्मात्.. माझ्याकडून चर्चेला पूर्णविराम. :-)

बंडा मामा's picture

30 May 2013 - 5:21 am | बंडा मामा

वय वर्षे ३ च्या पुढे अर्धे तिकिट लागत असल्यास आणि ते खोटे बोलुन वाचवायचे झाल्यास तीनच्या जवळात जवळचा नंबरच कुणीही सांगेल. मुलगा तीनच्या वर असताना पावणे दोन सांगणे हे सांगणे ह्यात काहीच हशील नाही, सोयीसाठी पावणे तीन हा नंबर जवळचा वाटतो. जितका कमी नंबर सांगाल तितका संशय येण्याची शक्यता अधिक असल्याने.

तसेच कंडक्टरही तुम्ही सांगेल ते वय ग्राह्य धरण्यास बांधील नसतो. एका दांडगोबाचे १२च्या आत वय आहे असे सांगुनही, त्याच्या आकारमानाकडे पाहुन त्याला पूर्ण तिकिट घ्यायला लावलेला कंडक्टर मी पाहिला आहे.

विनायक प्रभू's picture

28 May 2013 - 7:12 am | विनायक प्रभू

़कमाल आहे मामा, कुठ ल्य्या जगात?

मराठी_माणूस's picture

28 May 2013 - 9:03 pm | मराठी_माणूस

एकंदरीत लेखन गंडलेले दिसतेय

प्यारे१'s picture

28 May 2013 - 11:40 pm | प्यारे१

इ तो बिलकुलही सो टके की बात कही हय मराठी माणूस आपने.
कौनो समझदारी हय ही नही ना इस लिखाईमें.
बस्स कीबोर्ड पे पटका और लिख दिया कुछ भी.

परभू सरजी, आपय भी रिटायर हो ही जावो अब्ब!

वरील लेखात दिलेली वाक्ये बोलताना कुणाला दिसला असल्यास मी माझे प्रतिसाद बिनशर्त मागे घेईन

संपूर्ण सहमत. पुन्हा बायलिंग्विअल संभाषण कौशल्य आणि समज त्या वयाला अशक्य आहे. सगळ्यात भक्कम पुरावा म्हणजे

When sun beats down, the water gets evaporated and we get salt...बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्या

असा अभ्यासक्रम पावणे दोन वर्षाच्या मुलाला असणं शक्य नाही.

ताईंनी मुलाचे अर्धे तिकीट वाचवण्याकरिता (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.

येस. बाई फ्रॉड असणार.

इरसाल's picture

30 May 2013 - 10:13 am | इरसाल

छोटू लगेच सुतासारखा सरळ.
पण फक्त पाचच मिनिटे.
"अ‍ॅडमिनना अधिकार नाहीत"
"त्यांना अ‍ॅडमिन नाही सल्लागार म्हणायचे इति ताई
सल्लागार म्हणजे ?
जे सल्ला देवुन मालकाला गार करतात ते ?
मालक म्हणजे ?
जे संस्थळ चालवतात ते ?
मी एक दिर्घ श्वास घेतला आनी मनातल्या मनात स्वतःला समजावले ' खरचं एकही प्रतिक्रिया द्यायची नाही'
अ‍ॅडमिन तुम्ही कुठे जाताय ?
मराठी संस्थळावर.
कशाला ?
अरे तुझे बाबा जसे आंतर्जालावर जातात ना तसे !
"माझे बाबा कि नै आंतर्जालावर जात नाहीत. आंतर्जालच त्यांच्याकडे येते"
हो का. कुठले आहे तुमचे आंतर्जाल.
"मिपा".
मराठी अतरंगी आणी मराठी अतिव्यक्तींची फॅक्टरी आहे असे सांग अ‍ॅडमिनना.. ताईंचे प्रॉम्प्टींग.
चारशे-पाचशे सदस्य कायम पडिक असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.
अरे वा. मग तु कुठे मुंबईला कट्ट्यासाठी का?
छोटू क्षणभर थांबला.
"बाबांना की नै कट्टा/संपादक आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन संस्थळ उघडायचे ठरवलेय संपादकांशिवाय/मम्माशिवाय. मला खरडी पाठवतात आणि मम्माला व्यनी. बाबा मिपावर, मी आणि मम्मा ****".
ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.

मुक्त विहारि's picture

28 Jun 2017 - 9:43 pm | मुक्त विहारि

मस्त...

सतिश गावडे's picture

29 Jun 2017 - 11:48 am | सतिश गावडे

कथानायकाचा प्रवास चार वर्षांपूर्वीच संपला. मात्र एका प्रतिसादकर्त्याचा "वैशिष्ठ्यपुर्ण सहप्रवास" अजूनही चालूच आहे.

माझा हा प्रतिसाद ज्यांना कळला असेल त्यांनी पटकन लाईक करा पाहू. बघू किती लाईक मिळतात या पोस्टला.

मुक्त विहारि's picture

29 Jun 2017 - 7:07 pm | मुक्त विहारि

आम्ह्ला सगळ्या विषयातले सगळे कळते.