आज ब्ल्यू हैं पानी पानी...
आज ब्ल्यू हैं पानी पानी
परवा कपाटाची आवरा-आवर करताना माझा आवडता Arrow चा पांढरा शर्ट दिसला. पांढरा शर्ट घालणे म्हणजे माझ्यासाठी 'पांढरा हत्ती' पोसण्याइतके अवघड काम आहे. पांढराशुभ्र शर्ट मी माझ्या अब्रु इतका जपतो. सर्फ एक्सेल कंपनीसाठी भले 'दाग अच्छे' असतील, पण पांढऱ्या शर्टसाठी अजिबात नाही. छोटासा डाग देखील पांढऱ्या रंगावर ठळकपणे दिसतो. म्हणून चुकूनही डाग पडू नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते. कधीनव्हे तो पांढरा शर्ट घालावा आणि नेमकी त्याच दिवशी घरी आवडती उडदाची आमटी असते. आमटीचे मनसोक्त भुरके मारताना शर्टवर एखादा शिंतोडा उडण्याची भीती.
मिसळपाव