मादाम तुसॉ ह्यांना पत्र
माननीय व्यवस्थापक,
मादाम तुसॉ वॅक्स म्यूझियम,
मुक्काम पोस्ट लंडन
पत्र लिहिणेस कारण कि परवाची बातमी. तुम्ही आमच्या अतिशय लाडक्या मधुबाला चा मेणाचा पुतळा बनवणार आहात म्हणे! साक्षात विधात्याला पुन्हा इतकी सुंदर स्त्री घडवणे जमले नाही. त्याने माधुरी बनवून पाहिली, गेला बाजार कतरीना देखील केली. पण मधुबाला ची सर काही त्यांना आली नाही.
तुम्ही देखील आत्तापर्यंत अतीव सुंदर पुतळे घडवले. इतके हुबेहूब कि बघणाऱ्यांचा 'पुतळा' झाला. मात्र भारतीयांचे पुतळे तुम्हांला म्हणावे तसे जमले नाहीत बुवा. बच्चन कुटुंबियांवर तुमचा इतका राग का? अमिताभचा पुतळा एखाद्या उर्दू शायर / गज़ल गायकासारखा दिसतो.
मिसळपाव
.
.
(प्रासंगिक)
सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत.
एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.