टेंडर कोकोनट आईस्क्रीम

उन्हाळा सुरु झाला,की,निरनिराळ्या थंड वस्तूंचा मारा शरीरावर होऊ लागतो.त्यात काय नसतं?सब्जाचे बी,ठेचलेल्या धने+जिऱ्याचे पाणी कोकम-लिंबू-बेलफळ यांची सरबतं,पन्हं,ताक,लस्सी,दुधी-पालक-काकडी यांचा पुदिना,कोथिंबीर घालून काढलेला रस,निरनिराळ्या स्वादाची मिल्कशेस्,शहाळ्याचे पाणी, निरनिराळ्या स्वादाची आईस्क्रीम्स. यादी संपतच नाहीये.
तर सांगायची गोष्ट अशी की,भर उन्हाळ्यात नागीण झालेला पेशंट घरात असल्याने भेटायला येणारे पाहुणे भेटीदाखल शहाळी घेऊन येऊ लागले.