लेखकपद्मश्री चित्रेयांनी मंगळवार, 12/12/2017 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा
वाटा कितीक असती
येती तुझ्याकडे ज्या
नाहीच एकही माझी
परक्याच वाटती साऱ्या
दूरस्थ तूही तेथे
ठाऊक पाहसी मजला
ओठांवरी तुझ्या ही
वसलेला तोच अबोला
वाटे परंतु तरीही
बोलणार कुणीही नाही
निःशब्द भावनांना
आभाळ साक्षी राही
पद्मश्री चित्रे
24102017
पद्मश्री ताई, मनातले वेगवेगळे भाव खूप सुंदर रित्या मांडले आहेत. शेवटच्या कडव्याचा अर्थ नीट कळाला नाही. चालीत वाचताना थोडे अडखळया सारखे वाटले म्हणून हा बदल सुचवावासा वाटला (न मागता सल्ला देतोय किती मनावर घ्यायचा ते तुम्ही ठरवा.)
वाटा कितीक फुटती
(माझे मन चंचल आहे, एकीकडे त्याला तुझी ओढ आहे, आणि ते सतत नवनवीन बहाणे शोधात आहे. म्हणून "असती" च्या ऐवजी "फुटती" )
नेती तुझ्याकडे त्या
(त्या वाटा, मला तुझ्याकडे खेचत आहेत. त्या वाटा नुसत्याच तुझ्या कडे "येत" नाहीत तर त्यांच्याबरोबर मलाही तुझ्याकडे ओढतात )
मी वाट शोधते माझी
(मी द्विधा मनस्थितीत आहे, पुढे काय करू हे मला कळत नाहीये, मी मार्ग शोधतेय. कदाचित तुझ्याकडे येण्याचा ? पण ती वाट असावी, मनाला पटणारी )
परक्याच भासती साऱ्या
(मला तसा भास होतोय)
दूरस्थ तूही तेथे
ठाऊक पाहसी मजला
(पाहसी चा अर्थ काळाला नाही. प्रतिक्षा करतोय असे सूचित करायचे आहे का?)
ओठांवरी तुझ्या तो
परिचित सा अबोला
"वसलेला तोच" च्या ऐवजी हे गेय होईल व त्याचप्रमाणे "तोच" पेक्षा "परिचित" हा जास्त अर्थपूर्ण होईल.
वाटा जरी मिळाल्या
(या शेवटच्या कडव्यात नेमके काय म्हणायचे ते कळाले नाही. परंतु आणि तरीही या दोघांचा अर्थ जवळपास एकाच होतो. "जरी आपण भेटलो तरी" असे सूचित करायचे आहे काय?)
प्रतिक्रिया
'...एक राह अकेली सी कदमों से
खरंच
In reply to '...एक राह अकेली सी कदमों से by एस
कविता आवडली
सुंदर!
सुरेख...
पैबु...व्हाट्स धिस..
In reply to सुरेख... by ज्ञानोबाचे पैजार
अरे !!! तू पण ना संदीप...
In reply to पैबु...व्हाट्स धिस.. by चांदणे संदीप
खूप छान रचना आहे.
वाटे तरी परंतु
In reply to खूप छान रचना आहे. by गबाळ्या
सूचनांसाठी
धन्यवाद