ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी
दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!?
पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू...
जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी!
कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते
रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी!
हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी
जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी!
काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली
लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी!
—सत्यजित
वाचने
6843
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
ती पहा पडली गझल ती,जीव
हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच
जरा गडबड झालीय
सहमत ! शेवटचे दोन्ही शेर
In reply to जरा गडबड झालीय by पैसा
बुवाचे लक्ष गेले कसे नाही
माझं लक्ष काय???
In reply to बुवाचे लक्ष गेले कसे नाही by स्पा
छान !
हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच
तुम्ही गझलेव्यतिरिक्त अजून
धन्यवाद!
आवडली!