जगत रहायच,जगत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
झाडाने जन्म दिलेल्या फुलासाठी
फुलाने जन्मदात्या झाडासाठी
कधी प्रेम म्हणून, कधी कर्तव्य म्हणून
कधी ओझे म्हणून, कधी नाइलाज म्हणून
तेच तेच करत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
स्वप्नांच्या अपमार्जकाचे फुगे
हवे मधे सोडत रहायच
काही पहायचे उंच उडताना
काही तेंव्हाच फुटताना
अमिबाच्या विभाजनासारख
एकातून दूसरी, दुसर्यातून तीसरी
वासना प्रसृत करत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
जगत रहायच,जगत रहायच
गवताने पहायचे झाडाकडे
झाडाने डोंगराकडे,
अन डोंगराने उंच आकाशाकडे
आणि मांडायच समीकरण
आपल्या खुजेपणाचे.
भुकंप झाला तरी बेहत्तर
उंची आपली वाढवत रहायच
जगत रहायच,
आजच चारीही काव्ये वाचली.
In reply to आजच चारीही काव्ये वाचली. by स्पंदना
आजच चारीही काव्ये वाचली...
छा...............न,एंडींग.
आह!
उत्क्रुष्ट काव्यचित्र.
झ का स !!
सुंदर.. क्लोजिंगही सुंदर जमले
सैरभैर झाले परत एकदा...
शब्दन्च्या पलिकडले!
अप्रतिम !!
अन्तिम ???