मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

भूमिका

क्रान्ति ·
लेखनविषय:
काव्यरस
पाठ वार्‍याने फिरविली ती दिशा माझीच होती मूक, हळवी, दीन, शापित नायिका माझीच होती दैव दुबळे; शाप माझा भोगते जन्मांतरी मी राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती भंगले फुलताक्षणी का स्वप्न माझे मोहराचे? वादळाने मोडलेली वाटिका माझीच होती संशयाने गोठल्या संवेदना माझ्याच होत्या, जाळली क्रोधाग्निने ती संहिता माझीच होती काळजाला विंधणार्‍या आप्तस्वकियांच्या विषारी बोलण्यावर चालली उपजीविका माझीच होती ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी, काय सांगू?

डंकर्कचे विद्धविवेचन

शरदिनी ·
लेखनविषय:
काव्यरस
इस्पिक राजा आणि किल्वर राणीचा सुकुमार धूम्रतरल सहवास बाहेर झिम्मड पाऊस नास्पतीची गळणारी पाने अन् मोक्याच्या क्षणी त्याची निरभ्र माघार न सोसणारं कदाचित अपेक्षांचं ओझं पण का व्हावी नेहमीच ही थुलथुलीत प्रतारणा? हे नातंच असं पोकळ रंग, गंध ना चव जणू हिंग उडालेली पोकळ बांधानी डबी मग फेकून द्याव्या सार्‍या सहवासखुणा अन् घेतले दिलेले मनातलेच अल्लड काहीबाही----------- ----------------------काहीबाही म्हणजे हेच--- -रुसवा फुगवा रुतला चावा

हिंदोळा

शरदिनी ·
लेखनविषय:
काव्यरस
हिंदोळा साम्राज्ये लयाला जाती पडली नि:शस्त्र समता भाव तेथे ऋजुता टणत्कार ढसाढसा तप्त अग्निवर्षा सुप्त जनगणना भावविभोर कंकणराणा तुझा फ़सफ़शीत उत्साह जणू तेजतर्रार गोक्षुरादि गुग्गुळ संहत नायट्रिक आम्लात माझ्या दुधारी वेदनेचे समूळ उच्चाटन प्रेरणा समिधा यांची एकत्र भावधुम्मस आणि एकटाच डोलणारा सचिंत हिंदोळा ५ ऑगस्ट २००९, पुणे

(धोतरत्र्य )

विजुभाऊ ·
लेखनविषय:
काव्यरस
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/8753 धोतरत्र्य चोपन्नपदरी वहीची मास्तराने केली धोतर चतुर चिरफ़ाड भाद्रपदाच्या द्वितीय दिवशी भादरले डोके भरपूर परजावुनी कित्येकां छडीने रंगवली ढुंगणावर पानेच्यापाने पांजरपोळी कडब्याच्या विरहाने व्याकूळ शोकाकुल बैल ओरडलो असा की थिजले तैल बसले आता सपत्नीक मूर्तीमंत लेखनिक टक टकाक टक टकाक टपल ढुम् टु...र्र..... ठूस्स..... (शेवटचे आवाज टाईपरायटरमध्ये अडकून धोतर फाटल्याचे आवाज आहेत असे समजावे. गैर समज नको)

(कट्ट्यानंतरचे कवित्व)

पिवळा डांबिस ·
लेखनविषय:
कच्चा माल ह. घ्या... लालभडक मिसळीने केली आतड्यांची विकल चिरफाड मिपाकट्ट्याच्या द्वितीय दिवशी तासभर 'बसून' काढले भरताड घामाघूम शरीर ओथंबली मने धुंद पार्टीचे परिणाम आता भोगणे पंजरी कमोडच्या थकलेला भीष्म तेजस्वी तळपला मामलेदारी ग्रीष्म म्हणायलाच सपत्नीक तिच्या शिव्या अगणित पँक पूंक फुर्र ढूम :)

चारित्र्य

शरदिनी ·
लेखनविषय:
चारित्र्य चोपन्नकशी चित्रकूटाने केली चारित्र्याची चतुर चिरफ़ाड भाद्रपदाच्या द्वितीय दिवशी खुदुखुदु डोकावे अलवार भरतार भंगुनी कित्येक ओथंबली मने झुरली जर्जर गळाठली पाने पंजरी बाणांच्या शोकाकुल भीष्म असा तळपला भयाकारी ग्रीष्म बिल्वदल सपत्नीक मूर्तीमंत मेकॅनिक चपल ड्रुपल टपल ढुम् ३० जुलै २००९ ,पुणे

ताई

बेसनलाडू ·
लेखनविषय:
काव्यरस
नाही कधीच बसले ते पाठीवरी धपाटे, जाण्या कुशीत रडण्या नशीब झुरले आहे खेळातले भांडणे वा लाडातले गालगुच्चे, ताईकडे झोपण्याला नशीब चुकले आहे ताऊचा घास पहिला भरविता म्हणे आई, "सोन्या, तुझ्या पाचवीला नशीब पुजले आहे" फोटोत फक्त हसते किती गोड माझी ताई! घेण्यास बघ मुका तो नशीब मुकले आहे रेषा कुठली चुकीची कळण्यास वाव नाही, भरल्या हातावरूनी नशीब उठले आहे (काही बदलांसह पूर्वप्रकाशित)

त्सुनामी

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
उद्दंड जाहल्या लाटा तांडव करीती वारे स्तब्ध चंद्रमा नभात हरवुन गेले तारे... बेभान जाहली गाज सागरा जावु कसा रे सारे किनारे संपले कसा आवरु पिसारे... मिठीत घेण्या धरणी करशी किती पसारे डोळ्यात दाटले पाणी सांगु वेदना कशा रे पांघरशी स्वप्न निळे स्वप्नांचे धुंद मनोरे स्नेह तुझा ओसरला रे बघ खुंटले फुलोरे विशाल

उंबरठा..

प्राजु ·
लेखनविषय:
काव्यरस
अर्थ नेमका संसाराचा कधी कुणास कळला आहे उंबरठ्यावरी तडजोडीच्या जीव सतत हा जळला आहे कुणी जपावे? का जपावे? अन कोणाचे मोठेपण? किती पुरावे? किती उरावे? आकांक्षांचे आत्मसमर्पण.. अहंकार तव फ़ोल पणाचा सर्व समक्ष मी लपवावा घेऊन सार्‍या चुका मजवरी दुभंगलेला जीव जपावा हसरा चेहरा जनांत राही मनांत सार्‍या गर्द छटा शांत जळाच्या अंतरी असती गढूळलेल्या वादळी लाटा नाव तुझे नि गाव तुझे ओळख माझी विरून गेली कर्तव्याच्या मढ्याखाली स्वप्ने सारी पुरून गेली.. - प्राजु