Skip to main content

करुण

स्वकीय ?

लेखक psajid यांनी शुक्रवार, 16/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी आकांत माझ्या ओशाळणारे ओठ हलले, ज्यांनी केले वार शेवटी धीर देऊन गेले ! वादळातील शरीर माझे पाहायला तमाशा आले, केले चौकात उभे ज्यांनी नजरा उंचावून गेले ! कारणे ऐकवण्या अपयशाची समीक्षक ते होऊन आले, देऊन धीर उसना भुंग्यांनी वासे पोकळ केले ! हूल भरारीची देऊन बळ वांझोटेच दिले, माझ्या परस्परच त्यांनी आता घरटे माझे हिरावून न्हेले ! फुंकर घालण्याचे नाटक सोद्यांनी हुबेहूब वटवले, उरात दडवल्या दुःखाची शेवटी किंमत करून गेले ! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली
काव्यरस

'दु:स्वास'

लेखक psajid यांनी बुधवार, 14/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
रंग उमलत्या मनकळीवर दारिद्र्याचा ठसा उमटतो, अळणी जीवन काय कामाचे सावलीकडूनही 'दु:स्वास' होतो !! मोहोरभरल्या अम्राला वाटसरुही पाईक होतो, भार ओसरता मग भूमीला पोटातील मुळ्यांचा 'त्रास' होतो !! उमंग , इर्षा , धडपड पाहता त्याचा सन्मान 'खास' होतो, थकून डोळ्यावर हात घेता आंबल्या स्वप्नांचा 'वास' येतो !! कूजट कुबट दारिद्र पाहून तापला जीव कासावीस होतो, मूडदुसलेली मान्स बघून हाती घेतला 'घास' राहतो !! कसं जागीवल आजपातुर बाप संघर्षाचा पुतळा वाटतो, वजनाच्या या दुनियेत मातुर शिकून आयुष्याचा 'नास' होतो !! काळोखात किरण दृष्टी पडता कुठेतरी अस्तित्वाचा भास होतो, झेप घेता अनंतामध्ये गुदमरतो, बंद 'श्वास' हो
काव्यरस

अशी वाहने येती - ( विडंबन )

लेखक विदेश यांनी मंगळवार, 13/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल - अशी पाखरे येती - ) अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ... खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ... पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ... हात एक तो पुढेच सरला- काठीवर खात्रीने फिरला- देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ... पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती ... .
काव्यरस

(गड गड गड)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 12/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
(गड गड गड) पाऊस थांबायचे नाव घेईना खिडकीचे तावदाने थरारत थडथडतायत तावदानावर एक एक नीरओळ लिहून जातोय पाऊस गूढ, अनाकलनीय भाषेत (गड गड गड) ----- धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट कौलांवरची टीपटीप थेंबांची लय चिंचेच्या पानांवरून सरकणारे ओघळ आणि खालच्या पत्र्याच्या डब्यावर होणारे त्यांचे आघात (गड गड गड) ------ खिडकीतून हे सगळे बिचकत बघणारा मी हातात तुझी आणि माझी लग्नातली तस्बीर त्यात हसणारी तू आणि तुला हसतांना बघून हसणारा मी (गड गड गड) ------ रस्त्यांवरच्या पिवळ्या दिव्यांमध्ये चमचमणारे ते चिंचेचे ओघळ डोळ्यांखाली निसटणारे ओले अश्रु स्स...
काव्यरस

शिमगा

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 10/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
माझे कसे म्हणू मी माझाच मी न आहे स्मरतो कधी कुणाला अंतर उगाच दाहे आवेग भावनांचा माया उतून वाहे अभिषेक तोष तरिही संवेदना दुखावे मेघाळ आसमंती संकेत जड पळांचा वारा थके जरासा अंगी उलाल लाही श्वासात जीव लाव्हा रुसवा भला इरेला आतंक सोसलेला शिमगा सुभान देही ………………अज्ञात
काव्यरस

घाबरगुंडी

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 08/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात! समोरून नेता आला तावातावात बोलू लागला हा आपला तो तुपला ऐकलं नाहीस तर तू धुपला तुमची भाषा धोक्यात आहे तुमचा धर्म धोक्यात आहे माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्यांना मत देऊन आलो उगाच कशाला? माझा धर्म, माझी भाषा संपली तर! समोरून दुसरा आला तावातावात बोलू लागला अमुक पॅटर्न तमुक फॉर्मॅट आमचंच आतून सारं ग्याटमॅट आमच्याविना आहे काय? करियर धोक्यात आलं हाय माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्या क्लासमध्ये दाखल झालो उगाच कशाला?
काव्यरस

पाऊस एक चिंतन

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 03/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस म्हणजे नेमकं काय? वाट पहाणे? मिलनाचा आनंद? एक अनामिक हुरहुर? एक अविरत सुरु असणारा काळाचा, विश्वाचा अनंत प्रवास? कि आणखी काही? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडत आलेले आहेत. या प्रश्नांची उकल करतांना स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादाही ध्यानात आल्या. मग एक दिवस या तिघीजणी भेटल्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेल्या आणि काही नवे प्रश्नही.
काव्यरस

नार्सिससचा स्वप्नदोष

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 20/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं प्रतिबिंब पाहतो काचेत अ‍ॅनिमिक प्रकाशात बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात क्षणात रंग बदलणार्‍या बत्तीस बिटी भिंती अन् आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात कंटाळा भरून राहिलेला असतो मख्खपणे त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्‍यात स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे यंत्रांच्या आधाराने या एकविसाव्या श
काव्यरस

" हे असे चालायचेच!! "

लेखक निनाव यांनी गुरुवार, 18/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बोललो न मी काही न काही होते बोलायचे न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे! गाव आले , प्रवास थांबले न होते काही आठवायचे ओझे अवघड घेऊन सोबत न होते कुणास शोधायचे ! काठा सोबत, काठ शोधत , न होते परतायचे थांबवून सावलीस मागे, सोबत न होते न्यायचे ! तरी काही आलेच सोबत, न होते माझे नाव ते मग तोच म्हणाला , जाउदे 'निनाव' हे असे चालायचेच !! बोललो न मी काही न काही होते बोलायचे न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!
काव्यरस

राते- हिंदी रचना आणि भावानुवाद

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 15/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमरः जिंदगी जम चुकी है च्या वेळेस झाला तसा गोंधळ होऊ न देता या वेळेस मी सरळ चाणक्यलाच गळ घातली. म्हटले बाबा रे, ते अनुवाद, भावानुवाद काय मला जमत नाही ते तूच कर, तुला ते भन्नाट जमते. आणि त्याने माझ्या प्रेमाखातर केले त्यासाठी त्याला धन्यवाद देऊन त्याचा अपमान कसा करु?
काव्यरस