Skip to main content

<<मनातलं सांगताच येईना>>

लेखक प्रास यांनी शनिवार, 10/11/2012 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे! तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे. नाक्या नाक्यावर तुझा हक्क मला नाकारता येईना अड्ड्याची जुळवणी काट्याचा नायटा करतेय... मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... खातं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता उघडता येईना उधारीतल्या वारूणी गिळूनही नरडेच चिंब ना होतेय... बतावणींची यादी चाळली तरी अजिबात अंदाज येईना केव्हातरी मला आठवण येईल दादागिरी समजूत घालतेय...
लेखनविषय:

वाचने 5637
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

=)) =)) . =)) =))

एका सुपरफास्ट विडंबनं पाडणार्‍याला संपादक करून त्याच्या मुसक्या आवळल्या पण त्याची जागा समर्थपणे घेतल्याबद्दल हाबिणंदन! लै भारी!

In reply to by पैसा

एखाद्याच्या मुसक्या आवळण्यासाठी संपादक केले जाते हे थोडक्यात सांगितल्याबद्दल संपादक पॆसा यांचे आभार! :-)

In reply to by पैसा

@एका सुपरफास्ट विडंबनं पाडणार्‍याला संपादक करून त्याच्या मुसक्या आवळल्या >>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif आणी म्हणे,,,,,,, ''मी विडंबक नाही हो...............!'' http://www.sherv.net/cm/emo/laughing/free-laughing-smiley-emoticon.gif

तुफान लिहिलस. बाकी हे पण येतं वाटतं डॉक्टर तुम्हाला??????? बेश्टम बेष्ट

पदार्पणातच ढिंगाणा !! मस्तच ! मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... >>> संदर्भ डोस्क्यात यायला जरा उशीरच झाला, पण आल्यावर महाभयन फुटलो हसुन !! लगे रहो !

लैच =)) =))

खटक्याव ब्वॉट.. जाग्याव पल्टी..

=))