मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

गंधार घेतले तू

सांजसंध्या ·
लेखनविषय:
काव्यरस
कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू आईस रडवण्याचे, आभार घेतले तू वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू मातीत वेदना ही, का उगवते अजूनी झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू - संध्या

अंगाई मज गाती..

सांजसंध्या ·
लेखनविषय:
काव्यरस
अंगाई मज गाती इथे ओळखीचेही पक्षी, अनोळखी का होती रंगभूमीची गाणी कसली, रंग असेतो गाती भिरभिरणा-या आभाळाचे, क्षितिजामागे रडणे नभी पाहता निशिकांताला, अर्णवा ये भरती कुशल हातांचा स्पर्श लाभता, विराणशा माळाला फुललेल्या बागेतुन होते, भ्रमरांची या दाटी गेला गेला दिवस बुडाया, पश्चिमेच्या पाठी कातरवेळी लांबल्या छाया, तेवते मी वाती हिरवी माया, नयनी एका.. पाखरांची घरटी निळ्या लोचनी, हासते पणती, अंगाई मज गाती - संध्या

दुष्काळ...

अज्ञात ·
लेखनविषय:
काव्यरस
आई पाझरत्या डोळ्यांनी तू जेव्हा मला पाठमोरा पहात होतीस जाताना... तेव्हा माझे पाय अडखळले....मी मागे वळून पाहिल्यावर मला दिसला... बाभलीखाली उभी राहिलेली तू अन तुझा तो फाटका पदर... ते रनरनत उन, बांधावर आडवा पडलेला तो नांगर... सावलीत उकिडवा बसून एक टक आभाळाकडे कोरड्या डोळ्याने पाहणारा तात्या.... हाडावंर कातडं ताणून खपाटीला गेलेलं पोट सांभाळत शेवटच्या घटका मोजणारी ढोरं.... पलिकड जमिनीचा ठाव घेत आ वासून बसलेली ती विहीर... आणि बांधावर लिंबाखाली भर उन्हात तिरपी किरणं अंगावर घेत घाम फुटल्यासारखा मक्ख बसलेला तो शेंदरी म्हसोबा... मला आता जायलाच हवं पुढं....

(प्रतिसादांचे........)

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
काव्यरस
उदंड झाले वार प्रतिसादांचे किती गेले घातवार प्रतिसादांचे कुस्करणारे, कुजके बोलणारे कसे असे व्यवहार प्रतिसादांचे तू प्रेमाने कुरवाळले कवितेला शब्द शब्द टोचले प्रतिसादांचे मिळे न प्रोत्साहनाचे उत्तर उठले बाजार प्रतिसादांचे थडगे माझ्या लाडल्यांचे अन, गळाभर हार सडक्या प्रतिसादांचे मोक्ष मिळावा निदान फाट्यावर फोफावले आजार प्रतिसादांचे -- फुकटरंग

उशीर

डॉ अशोक कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
उशीर ती ही समीप होती, पुनवेस चांद राती अन बात छेडण्याची फक्त देर होती नक्षत्र पाहतांना थोडीच रेलली ती आधार द्यावयाची फक्त देर होती ठावे मलाही होते, अनभिदन्य ती ही नव्हती शब्दात सांगण्याची फक्त देर होती आतूर भावनाही येऊन दाविते ती डोळ्यात वाचण्याची फक्त देर होती तीसरे कुणीही नव्हते, दोघात रात्र होती वाटून घ्यावयाची फक्त देर होती गेल्या अशाच रात्री, कां दूर राहते ती सर्वांस कारणे ही, फक्त देर होती --अशोक

मिसळपावची चोरी

चित्रगुप्त ·
लेखनविषय:
काव्यरस
मिसळपावची चोरी बटाटेवड्यांची चोरी रबडी-फलुद्याची चोरी मनसोक्त भटकंतीची चोरी तण्णावून झोपंतीची चोरी मित्र-मैफिलींची चोरी डर्टी सिनेमांची चोरी... ह्याची चोरी त्याची चोरी... आता बोला, जगावं तरी कसं, नवरोबांनी... .....('सहज तुझी हालचाल' लिहिणार्‍या भा. रा. तांब्यांना श्रद्धांजली)...

"चिंता करतो मिपाची.."

चिगो ·
काव्यरस
(ढिस्क्लेमर : डोक्याचं भजं झाल्यावर आलेल्या विचार-कुंथनातून स्त्रवलेली ही कविता आहे. विचार-मंथन नाही..

ऐन वसंतात ....

मनिषा_माऊ ·
लेखनविषय:
काव्यरस
ऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||धृ || भरल्या अंगी भिनला ओल्या व्यथेचा गारवा कोर्या मनात घुमला तुझ्या प्रीतिचा पारवा झुले काळीज अंगणी आठवांचा गं हिंदोळा ||१|| मेंधीच्या गं पानामधी जीव गुंतला गुंतला नवतीचा रंग गोरा कसा खुलला खुलला हळदीच्या उन्हामंधी सोनचाफा झाला खुळा ||२|| मन कावरं बावरं , मन केवड्याच रान किती सावरू आवरू आज सुटले हे भान किती जपून ठेवलं तरी लागल्या गं झळा ||३|| नाही संपला अजुनी सये तुझा वनवास तुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास उभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४|| सनईचा सूर का गं असा बेसूर लागला वेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला किती दाबला हु

वाळलेले दोन गजरे..

सांजसंध्या ·
लेखनविषय:
काव्यरस
माणसांशी वागतांना, चूक होणे टाळले मी माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी कायद्याने थांबवाव्या, मीलनाच्या चोरवाटा आसवांशी वैर घेतां, कायदे ते जाळले मी जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी - संध्या २० एप्रिल २०१०

कातर वेळ

अनिरुद्धशेटे ·
लेखनविषय:
काव्यरस
आवरलेल्या मनातुन सावरलेले क्शण आहेत तुझ्यासाठीच राखुन ठेवलेले काही गुलाबी पण आहेत तुझ्याशिवाय दिवस साजरे करण्याची सवय आता मला करुन घ्यायला हवी कारण रात्रींमध्ये तुझ्याच आठवणींची स्पंदनं आहेत फक्त मला भिती वाटत राहते संध्याकाळ्ची कारण या कातर वेळी तुझ्यावर दुसर्याच कोणाची तरी राखण आहे . . . . अनिरुद्ध