विखुरलेला चंद्र - अंतिम
लेखनविषय:
तिला माहीत होते तिला जावेच लागेल
ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही
तू गेल्यानंतर इथे फार काही बदलले नाही
मीही तसाचं, तो शिकाराही तसाचं, अन् हा किनाराही तसाचं
----
अजूनही शिकारा पाण्यावर तसाचं डुलतोय
शिकार्याची वल्हे तशीचं पाण्यावर लपलपतायत
तश्याचं छोटुल्या लाटा पसरवतायत
पाण्यावर झुलणार्या तार्यांचे ते शेपूट
ते अजूनही तसेच मोहक आहे
-----
पण तो चंद्र,
तो बिचारा नभाच्या त्या मागच्या कोपर्यातून
ठिकर्या ठिकर्या होऊन
पाण्यावर वाहत वाहत किनार्याला लागतोय
------
जातांना
तेवढे चांद्रकण घेऊन गेली असतीस...
~~~(समाप्त)~~~
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(३१/१२/२०१२)
विखुरलेला चंद्र - १
विखुरलेला चंद्र - २
विखुरलेला चंद्र - ३
वाचने
2383
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
आजच चारीही काव्ये वाचली.
In reply to आजच चारीही काव्ये वाचली. by स्पंदना
आजच चारीही काव्ये वाचली...
छा...............न,एंडींग.
आह!
उत्क्रुष्ट काव्यचित्र.
झ का स !!
सुंदर.. क्लोजिंगही सुंदर जमले
सैरभैर झाले परत एकदा...
शब्दन्च्या पलिकडले!
अप्रतिम !!
अन्तिम ???