(गुलाम अली यांनी गायलेल्या 'जिंदगी को उदास कर भी गया' या गझलचा स्वैर भावानुवाद)
आला ॠतू अनामिक, अवचित निघून गेला
जगणे उदासवाणे, माझे करून गेला
नशिबी वियोग आला, सार्या सवंगड्यांचा
अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला
हुलकावूनीच गेले, दुष्प्राप्य ध्येय होते
चुकता दिशा जराशी, साथी विभक्त झाला
मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली
निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3169
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप भावनिक भावानुवाद ! आवडलं
खुप भावनिक भावानुवाद !
आवडलं :)
खूप छान
मस्त.
मूळ गझलेप्रमाणेच
भावानुवादातही ओळी-ओळीत दु:ख ओथंबतंय हे यशच म्हणायला हवं...I wasn't ready to be melancholy right now, but you succeeded in making me so (हेही यशच!)
सुरेख!
भावानुवाद जमलाय मस्तच!स्वतंत्र रचना म्हणावी इतका चांगला!
अतिसुंदर !
अतिसुंदर !
सुंदर!!
सुंदर!!
सुरेख !
सुरेख ! :)
हा मुक्या कधीतरीच लिहितो, पण
हा मुक्या कधीतरीच लिहितो, पण जोरदार लिहितो राव!
उत्तम...उत्तम...आणी उत्तम...
उत्तम...उत्तम...आणी उत्तम... :-)
सुंदर
सुंदर
क्या बात..
>>नशिबी वियोग आला, सार्या सवंगड्यांचा
अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला
सुंदर भावानुवाद..
आह!
निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झालाकाय कल्पना आहे!
मस्त झालाय तुमचा भावानुवाद. खरतर एखाद्या गोष्टीमुळे फक्त सुरवात होते एखाद्या लिखाणाची, पण मग त्याला (लिखाणाला)स्वतःच अस एक वेगळेपण, एक वलय निर्माण होत, त्यामुळे मुळ प्रेरणेवर किती विसंबायच ते आपणच ठरवु शकतो.
अनूवाद खूप छान ! ! !
क्या बात है ! ! ! 'जिंदगी को उदास कर भी गया' खुप-खूप वेळा ऐकली. पण अनूवाद त्याहिपेक्षा सुन्दर. मजा आली.
+१
+१
मूळ गझलेइतकाच सुरेख भावानुवाद
मूळ गझलेइतकाच सुरेख भावानुवाद.
मूळ गझलेतला भाव तंतोतंत
मूळ गझलेतला भाव तंतोतंत उतरलाय.
नेहमीप्रमाणेच ब्येष्ट. :)
छान.
ही तर उत्कृष्ट अशी स्वतंत्र कविता आहे.
खूप उत्कट. धन्यवाद!
राघव
मृत्यू समोर अंती, सपशेल हार
हे विशेष आवडले
मूळ गझल तर ग्रेट आहेच
पण भावानुवाद पण भावला
झकास
...खूप आवडला भावानुवाद