मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विखुरलेला चंद्र - अंतिम

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
तिला माहीत होते तिला जावेच लागेल ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही तू गेल्यानंतर इथे फार काही बदलले नाही मीही तसाचं, तो शिकाराही तसाचं, अन् हा किनाराही तसाचं ---- अजूनही शिकारा पाण्यावर तसाचं डुलतोय शिकार्‍याची वल्हे तशीचं पाण्यावर लपलपतायत तश्याचं छोटुल्या लाटा पसरवतायत पाण्यावर झुलणार्‍या तार्‍यांचे ते शेपूट ते अजूनही तसेच मोहक आहे ----- पण तो चंद्र, तो बिचारा नभाच्या त्या मागच्या कोपर्‍यातून ठिकर्‍या ठिकर्‍या होऊन पाण्यावर वाहत वाहत किनार्‍याला लागतोय ------ जातांना तेवढे चांद्रकण घेऊन गेली असतीस... ~~~(समाप्त)~~~ |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (३१/१२/२०१२) विखुरलेला चंद्र - १ विखुरलेला चंद्र - २ विखुरलेला चंद्र - ३

वाचने 2383 वाचनखूण प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया