बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती
यांना न कसली नीती, यांना न कसली भिती
तो जो ऊभा राहिला, अन्याय बोलण्या काही
तो ही म्हणे आताशा, मद्यात धुंद राही
कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही
हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही
होती काल परवा, हिरवी डौल शेते
केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही
पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही
झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही
तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले
आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही
वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला
मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही
झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही
लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
अप्रतिम!!!!!
1 नंबर
मिका...
उत्तम विचार....
अत्यंत सुंदर तरीही करूण रचना.
मिका.. मिका! कोणत्या जगात
In reply to मिका.. मिका! कोणत्या जगात by इनिगोय
+१
नावीन्यपूर्ण
टोप्या उडवल्या आहेत...
आवडलं!!
सु रे ख.
मस्त!
फार आवडली.
अहा!
मिका रॉक्स ! एक कवितासंग्रह
चालत्या
छान
खास!
सुरेख!
कोंकणातल्या घराचं असं झालंय.
अत्यंत सुरेख!
छा न वाट्ली