मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

<बद्ध लेखक>

लंबूटांग ·
प्रेरणा इवलं -इवलं ठावं रोज पाडी लेख उत्तरं सोपी कुणा देईचिना आपली ती तंगडी दरवेळी वरती किती पडलो तेही आठवेना टाकतो त्या जिलब्या, ज्ञानाचा देखावा रेग्युलरली जिणे काही झेपेचिना वेळेची ती त्यक्ती कामाचा कंटाळा डेडलाईनी काही केल्या चुकेचिना एकहार्ट पैसा काल रोब मरून सांगतोय काय नक्की कळेचिना अचाट अध्यात्म, पुचाट विचार जगतो ते लिहितो कोणा पटेचिना उपप्रतिसादी ओशट या जिलब्या लेख झाला जुना तरी संपेचिना वाचकाचा खात्मा, बद्ध हा लेखक आपटली डोकी, तरी थांबेचिना

कातरवेळ..

मस्त कलंदर ·
प्राचीला गच्ची जोडण्याचा आमचाही एक प्रयत्नः आठवांचे सूर, अश्रूंचे पूर, लागे हूरहूर, जीवालागी.. नि:शब्द बोलणे, हळूच ते स्मरणे, अव्यक्त भावना, हृदयात... मनात तू, स्पंदनात तू, जीवघेण्या श्वासात तू, ध्यानीमनी... दिशा सांजावल्या, गोकुळे बहरली, परि एकलेपण, कातरवेळी...!! - सुधीर बागुल, मस्त कलंदर

" आई "

कुलमयु ·
एक नाव जिचे मी अस्तित्व आहे जिची मी ओळख आहे एक नाव जिचे मी स्वप्न आहे जिची मी इच्छा आन्कांक्षा आहे एक नाव जिच्या आयुष्यातील मी एक आनंद आहे एक नाव जिने मला हसायला शिकवले अन रडायला शिकवले एक नाव जी माझ्या दु:खात बुडालेली आहे एक नाव जिच्या ओंजळीत आकाशही ठेंगण आहे एक नाव जी मला प्रत्येक संकटातून मार्ग काढून जपत आहे एक नाव जिने मला ह्या जगात आणल्याचे उपकार आहे हो, तेच एक नाव जिचा मी प्राण आहे फक्त आणि फक्त " आई "

सबूर

धनंजय ·
सबूर --- अवचित वाटेवर जुडलेले साथीदार-- काय त्यांच्या गाठोड्यांत? काय खपल्यांच्या आड, कोण घाव काळजात चिघळले काळ फार? . चिंधी जखमेची सोडू, सोडू पोतडीची गाठ सारे उघड उघड… तरी लपलेले जणू गोंधळात गडबड! शोधू काळजीने वाट... . आशा-भीती एकसाथ, निरखून बघू आत भांबावून खूप वेळ... बोचू, खोचू, कधी क्लांत, कधी शांत, लावू मेळ, सबूरीची आहे बात. --- --- Slow Going --- What all is crammed in sailors' chests Of bunkmates met by chance? What wounds we bear within our breasts What abscesses to

<पिवून हय क्यु?>

विजुभाऊ ·
दारोळ्या १. प्यासा बार मंडई समोर बाटल्या रित्या २. उठला नाना लावे समाधी तुळशी बागेत ३. नाच पराचा हैदोस वाचताना मोडते समाधी प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944

तुझ्या विना

आनंद भातखंडे ·
तुझ्या विना ही रात्र माझी सरते काळी काळी तुझ्या विना मी लावून आलो संसाराची होळी || तुझ्या विना हा अल्लड वारा रुंजी घालत नाही तुझ्या विना या पाउसधारा रुसून गेल्या काही || तुझ्या विना हा कुंद मोगरा गंध सांगत नाही तुझ्या विना या मैफलीचा रंग रंगत नाही || तुझ्या विना बघ उडून गेले रांगोळीचे रंग तुझ्या विना मी करत बसतो आठवणींशी संग || तुझ्या विना मी शोधात आहे जगण्याची आशा तुझ्या विना मज अवगत नाही प्रेमाची भाषा || तुझ्या विना हे सुटतच नाही विरहाचे कोडे तुझ्या विना हे मन म्हणते ‘श्वास उरले थोडे’ ||

आशा

sneharani ·
नावच कशाला हवं एखाद्या नात्याला ऋणानुबंध समज हवं तर..... हिर्‍याच्या तेजासम असणारा जिव्हाळा - त्याला नात्याच्या नावाचं कोंदण हवच कशाला? हिराही चमकतो की मग तो सोन्याचांदीच्या कोंदणात असला काय किंवा नसला काय.... अशा जिव्हाळ्याच्या हिर्‍यामधून आशेची किरणं परिवर्तित होतात... अन् मग रंगबेरंगी स्वप्नं आकार घेतात स्वप्नं सत्यात उतरताना आशेची किरणं सदोदीत साथ देत राहतील ही कदाचित पण नशिबाची साथ मिळायला लागतेच की... म्हणतात की लाख शिंपले उघडले की एखादा अनमोल मोती सापडेल इतके प्रयत्न करूनही नाही सापडला तर "नशीब" खोटं ठरत पण शिंपली उघडण्याची आस अन् त्या प्रत्येक क्षणात असणारी आशा सत्य होतीच ना? अगदी तसच

का ग धरिला

अरुण मनोहर ·
जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला मी दिला होता सखे, चन्द्र तुझिया हाती फेकुनी पाण्यामधे, कवडसा का ग धरिला पाहिली होती सखे तू बेवफाई माझी श्वासातल्या जाणिवांचा, भरवसा का ग धरिला ओलावा शोधित, फिरलीस वणवण सखे संग ऐसा कोरडा, गरमसा का ग धरिला मखमली पाकळ्यानी लपविले मी कफन पदर त्याचा रेशमी, तलमसा का ग धरिला जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला

टप टप टप...

मिसळलेला काव्यप्रेमी ·
पाऊस थांबून खरं तर बराच वेळ झाला घराचे छत अजूनही गळतेय टप टप टप... --------------- तुला निरोप देऊन परतलो तसाचं बसून आहे बराच वेळ चंद्राने आपले साम्राज्य वाढवायला सुरवात केली टिपूर चांदणे पसरत गेले ते डोळ्यात उतरतांना कां कुणास ठाऊक पण एक आवाज कानात घुमतोय टप टप टप... -------------- बाजुच्या खोलीतला तुझा वावर तसा अजुनही तस्साचं बुद्धीचे मनाशी वाद सुरु झाले एक म्हणे तु नाहीस, अन् एक तु आहेस.. खिडकीच्या काचेवर परत तोच पाऊस.. टप टप टप... -------------- तुझा आवाज घरभर दाटून राहीलाय कोपर्या-तल्या उदबत्तीच्या सुवासासारखा जाणवतोय..