Skip to main content

मी काय करू??..........

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 02/12/2012 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय करू??.......... तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे.. मग मी काय करू?? त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे मग मी काय करू?? त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे मग मी काय करू?? म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय मग मी काय करू?? तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान मग मी काय करू?? आणि तो म्हणे भारताची नवीन WALL मग मी काय करू?? फेसबुक BAN होणार आहे म्हणे मग मी काय करू?? अरे पेट्रोल महाग ..Gas महाग महागाईची भडकलीये आग तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही.. कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही" तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू.. अशी कोणीच विचारपूस करत नाही कारण, आहे मी एक सामान्य माणूस जस्ट " A Stupid Common Man" !! ज्याला महागाईचा भस्मासुर फाडून खाई... पण, मी काय फक्त जन्मभर मरायचंच का? ह्या कणखर जीवनात फक्त हरायचंच का?? सांगा ना काय करू मी??? मग मी काय करू?? कुणी ऐकतंय का माझं... मीsss ...कायsssss ...करूssssssssssssss !!!!!!!! -बटाटा चिवडा (A Stupid Common Man!!)

वाचने 7832
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

लाज वाटते राजे, या जगात जगाव लागतं समाजाच अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघाव लागतं नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत..... कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही राजे, सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे, आया,बहिणी,लेकी,सुना पवित्रा राहिली नाहीत नाती, शासन करणार्‍या तलवारींची गंजून गेलीत पाती, आपल्या अब्रुच लक्तर,अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत

In reply to by अविनाशकुलकर्णी

आपण इंटरनेटवर येतो याचा अर्थच सगळं व्यवस्थित चाललय आणि फावला वेळ आहे असा होतो. हे म्हणजे लिव्ह- इन मधे राहणार्‍यांनी आय्-पिल्सचा खर्च परवडत नाही असा त्रागा करणं झालं.

उद्वेग चांगला व्यक्त झालाय. आमचं आपलं एकच धोरण तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे.

In reply to by पैसा

तुका म्हणे उगी रहावे, मिपावर जे जे होईल ते ते पहावे प्रसंगे अखंडीत मारीत जावे पाचर...

In reply to by अनिल तापकीर

ते "आई तुझं लेकरु वेडं गं कोकरु, रस्ता चुकलय. सांग मी काय करु" अभंग आहे? का तुम्ही म्हणता तो अभंग अजून वेगळा आहे?

कुणाला शाळेतलं गाणं, कुणाला गोविंदाचं टपोरी गाणं, कुणाला अभंग कायकाय आठवतंय. हा धागा काढणाऱयाची प्रतिभा सूत्रे रचणाऱ्या शास्त्रकारांच्या तोडीची आहे असे म्हणावे काय ?

नीली नीली आखें मेरी 'मैं क्या करू?' गोरे गोरे गाल मेरे 'मैं क्या करू?' आणि आत्ताचं इस दिल का क्या करूं मैं क्या करूं (लूप टिल इन्फिनिटी)

हे वाचायचं राहिलंच होतं. भारीये.

स्वगृहावरच्या लेखांच्या यादीत असे वाचले... "मी काय करू??.......... बटाटा चिवडा" :) (हघ्या) स्वगत आवडले. हातावर हात ठेऊन न बसता प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे शक्य तेवढे केले तरी पुरे होईल असे वाटते.