मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वकीय ?

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
गर्दी आकांत माझ्या ओशाळणारे ओठ हलले, ज्यांनी केले वार शेवटी धीर देऊन गेले ! वादळातील शरीर माझे पाहायला तमाशा आले, केले चौकात उभे ज्यांनी नजरा उंचावून गेले ! कारणे ऐकवण्या अपयशाची समीक्षक ते होऊन आले, देऊन धीर उसना भुंग्यांनी वासे पोकळ केले ! हूल भरारीची देऊन बळ वांझोटेच दिले, माझ्या परस्परच त्यांनी आता घरटे माझे हिरावून न्हेले ! फुंकर घालण्याचे नाटक सोद्यांनी हुबेहूब वटवले, उरात दडवल्या दुःखाची शेवटी किंमत करून गेले ! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली

'दु:स्वास'

psajid ·
लेखनविषय:
काव्यरस
रंग उमलत्या मनकळीवर दारिद्र्याचा ठसा उमटतो, अळणी जीवन काय कामाचे सावलीकडूनही 'दु:स्वास' होतो !! मोहोरभरल्या अम्राला वाटसरुही पाईक होतो, भार ओसरता मग भूमीला पोटातील मुळ्यांचा 'त्रास' होतो !! उमंग , इर्षा , धडपड पाहता त्याचा सन्मान 'खास' होतो, थकून डोळ्यावर हात घेता आंबल्या स्वप्नांचा 'वास' येतो !! कूजट कुबट दारिद्र पाहून तापला जीव कासावीस होतो, मूडदुसलेली मान्स बघून हाती घेतला 'घास' राहतो !! कसं जागीवल आजपातुर बाप संघर्षाचा पुतळा वाटतो, वजनाच्या या दुनियेत मातुर शिकून आयुष्याचा 'नास' होतो !! काळोखात किरण दृष्टी पडता कुठेतरी अस्तित्वाचा भास होतो, झेप घेता अनंतामध्ये गुदमरतो, बंद 'श्वास' हो

अशी वाहने येती - ( विडंबन )

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
(चाल - अशी पाखरे येती - ) अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ... खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ... पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ... हात एक तो पुढेच सरला- काठीवर खात्रीने फिरला- देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ... पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती ... .

(गड गड गड)

मिसळलेला काव्यप्रेमी ·

कवितानागेश 15/08/2013 - 23:50
छानच आहे कविता. पण ते गड्गडगड वाचताना अडखळल्यासारखं होतय. मात्र या कवितेचं वाचन बॅकग्राउंडला गडगडाट घेउन केले तर छान इफेक्ट येइल. :)

In reply to by कवितानागेश

मात्र या कवितेचं वाचन बॅकग्राउंडला गडगडाट घेउन केले तर छान इफेक्ट येइल.
म्हणूनच ते कंसात आहे. ते वाचण्यासाठी नाही, तो फक्त इमॅजीन करायचे शब्द आहेत.

(गड गड गड) पाऊस थांबायचे नाव घेईना खिडकीचे तावदाने थरारत थडथडतायत तावदानावर एक एक नीरओळ लिहून जातोय पाऊस गूढ, अनाकलनीय भाषेत (गड गड गड) ----- धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट कौलांवरची टीपटीप थेंबांची लय चिंचेच्या पानांवरून सरकणारे ओघळ आणि खालच्या पत्र्याच्या डब्यावर होणारे त्यांचे आघात (गड गड गड) ------ खिडकीतून हे सगळे बिचकत बघणारा मी हातात तुझी आणि माझी लग्नातली तस्बीर त्यात हसणारी तू आणि तुला हसतांना बघून हसणारा मी (गड गड गड) ------ रस्त्यांवरच्या पिवळ्या दिव्यांमध्ये चमचमणारे ते चिंचेचे ओघळ डोळ्यांखाली निसटणारे ओले अश्रु स्स...

शिमगा

अज्ञातकुल ·
लेखनविषय:
काव्यरस
माझे कसे म्हणू मी माझाच मी न आहे स्मरतो कधी कुणाला अंतर उगाच दाहे आवेग भावनांचा माया उतून वाहे अभिषेक तोष तरिही संवेदना दुखावे मेघाळ आसमंती संकेत जड पळांचा वारा थके जरासा अंगी उलाल लाही श्वासात जीव लाव्हा रुसवा भला इरेला आतंक सोसलेला शिमगा सुभान देही ………………अज्ञात

घाबरगुंडी

ऋषिकेश ·

मदनबाण 08/08/2013 - 16:15
समोरुन पाकडे आले आपल्या सैनिकांना ठार केले संसद, चॅनल , वर्तमानपत्र सर्वत्र फक्त चर्चाच आहे ह्यांचा हात म्हणे त्यांच्या बरोबर आहे लष्कराचे निवेदन अन् मंत्राचे निविदेत यात तफावत कशी काय आहे ? हा नक्क्की कसला विरोधाभास ? मी उद्विग्न झालो...पाकड्यांच्या नावाने बोटे मोडु लागलो. सगळेच म्हणतात त्यांना आपण बघुन घेउ,हे तर दरवेळच ठराविक उत्तर आहे !

कविता भयंकर आवडली.
मग मी शांत झालो.. मोकळं कोकरू कळपात आलं
ऐवजी "मोकळं कोकरू कळपात आलं.... मग मी नवे कोकरु शोधु लागलो" हे वस्तुस्थिती धरुन झाले असते. ड्रॅकुलाला घाबरणार्‍या माणसाचा जेव्हा ड्रॅकुला होतो तेव्हा इतरांना ड्रॅकुला बनवण्यासाठी तो धडपडु लागतो

ऋषिकेश 14/08/2013 - 09:04
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे, प्रोत्साहकांचे आभार! गेले काही दिवस हाफिसातून मिपा अ‍ॅक्सेस होत नसल्याने प्रतिसाद देणे राहत होते. उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व!

साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात! समोरून नेता आला तावातावात बोलू लागला हा आपला तो तुपला ऐकलं नाहीस तर तू धुपला तुमची भाषा धोक्यात आहे तुमचा धर्म धोक्यात आहे माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्यांना मत देऊन आलो उगाच कशाला? माझा धर्म, माझी भाषा संपली तर! समोरून दुसरा आला तावातावात बोलू लागला अमुक पॅटर्न तमुक फॉर्मॅट आमचंच आतून सारं ग्याटमॅट आमच्याविना आहे काय? करियर धोक्यात आलं हाय माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्या क्लासमध्ये दाखल झालो उगाच कशाला?

पाऊस एक चिंतन

मिसळलेला काव्यप्रेमी ·

चाणक्य 03/08/2013 - 09:38
सुरेख. पाऊस दरवेळी नव्याने भेटतो खरा. जे मनात तेच पावसात...

In reply to by तिमा

बॅटमॅन 06/08/2013 - 17:38
असेच म्हणतो....पहिला पाऊसच जास्त आवडला. फेबु आणि अन्य ठिकाणी सर्क्युलेट होणार्‍या आणि मला बेहद्द आवडणार्‍या "आयुष्य म्हंजे नानाचा अंगठा...पावनखिंडीत हातात घेतलेली मूठभर माती..." इ.इ. या राईटअपची आठवण झाली.

स्पा 05/08/2013 - 13:56
__/\__ कमाल .. कमाल ... कमाल .... निवांत वाचण्यासाठी राखून ठेवलेली होती चीज झालं .. हायलाईट काय करू ? एकूण एकूण कडवं कहर आहे जियो मिका

सईसखी 05/08/2013 - 23:24
तिघीजणी एकदमच आल्याने पाऊस फारच जोरदार झालाय..पण पाऊस तो पाऊसचं भिजायला कोणाला आवडणार नाही? एक एक कविता वाचत गेले आणि मनापासुन आवडल्या...पावसासारख्याच..मस्त..बहारदार.

मदनबाण 06/08/2013 - 18:51
मिका तू इतके सुंदर लिहले आहेस की यावरुन मला थोडासा रुमानी हो जाये या चित्रपटातला नाना पाटेकरचा एक सीन आठवला होता... माझ्या आधीच्या प्रतिसादात तो द्यायचा राहुन गेला होता, तो आता इथे देतो. हा मेरे दोस्त वही बारिश वही बारिश जो आसमान से आती है बूंदों मैं गाती है पहाड़ों से फिसलती है नदियों मैं चलती है नेहरों मैं मचलती है कुवे पोखर से मिलती है खाप्रेलो पर गिरती है गलियों मैं फिरती है मोड़ पर संभालती है फिर आगे निकलती है वही बारिश ये बारिश अक्सर गीली होती है इसे पानी भी कहते है उर्दू मैं आप मराठी मैं पानी तमिळ मैं कन्नी कन्नड़ मैं नीर बंगला मैं… जोल केह्ते है संस्क्रित मैं जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते है ग्रीक मैं इसे aqua pura अंग्रेजी मैं इसे water फ्रेंच मैं औ’ और केमिस्ट्री मैं H2O केह्ते है ये पानी आँख से ढलता है तो आँसू कहलता है लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है और कभी कभी यह पानी सरकारी फ्य्लो मैं अपने कुए समेत चोरी हो जाता है पानी तो पानी है पानी जिन्दगानी है इसलिए जब रूह की नदी सुखी हो और मन का हिरण प्यासा हो दीमाग मैं लगी हो आग और प्यार की घागर खाली हो तब मैं….हमेशा ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूँ मेरी मानिए तो ये बारिश खरिदेये सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश सिर्फ 5 हज़ार रुपये मैं इस्से कम मैं दे कोई तो चोर की सज़ा वो मेरी आपकी जुती सिर पर मेरी मेरी बारिश खरीदये सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश

पैसा 06/08/2013 - 21:33
मस्त लिहिलंस! बाकी थेम्सवरच्या पावसाची आता सवय झाली असेल ना! :)

स्पंदना 07/08/2013 - 03:50
जेंव्हा शब्द सपडत नाहीत तेंव्हा वाट पहावी लागते प्रतिसाद द्यायला. या वेळी अजुनही काही सुचल नाही लिहावं असं, कदाचित मनाचा पिळा जरा जास्तच थबथबलाय पावसानं.

आतिवास 09/08/2013 - 23:55
एकदम खूप अंगावर आल्यागत झाला पाऊस! शिवाय कवीला स्वतःला काय वाटतं नेमकेपणानं हे समजलं नाहीच.... सवडीने वाचते परत, निवांत बघते काही कळतंय का ते! :-)

psajid 14/08/2013 - 11:48
कधी ... लेकीच्या डोळ्यात चमकणार्‍या आनंदी तार्‍यासारखा विजेरी पाऊस आणि .... कधी बाबांच्या अभिमानाने भरलेल्या छातीतील श्वासासारखा घनव्याकुळ पाऊस हे खूपच छान आणि भावनिक ! सुन्दर कविता !

चिगो 18/08/2013 - 22:19
तिन्ही कविता सुंदर आहेत.. दुसर्‍या कवितेने "तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही" हे गाणं आठवलं..

थोडी प्रस्तावना: पाऊस म्हणजे नेमकं काय? वाट पहाणे? मिलनाचा आनंद? एक अनामिक हुरहुर? एक अविरत सुरु असणारा काळाचा, विश्वाचा अनंत प्रवास? कि आणखी काही? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडत आलेले आहेत. या प्रश्नांची उकल करतांना स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादाही ध्यानात आल्या. मग एक दिवस या तिघीजणी भेटल्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेल्या आणि काही नवे प्रश्नही.

नार्सिससचा स्वप्नदोष

नगरीनिरंजन ·

आतिवास 20/07/2013 - 17:32
हं! कविता आवडली. (शीर्षक मात्र पुरेसं उलगडलं नाही - शोधते त्याचा अर्थ ...)

आतिवास 20/07/2013 - 17:32
हं! कविता आवडली. (शीर्षक मात्र पुरेसं उलगडलं नाही - शोधते त्याचा अर्थ ...)
लेखनविषय:
काव्यरस
काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं प्रतिबिंब पाहतो काचेत अ‍ॅनिमिक प्रकाशात बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात क्षणात रंग बदलणार्‍या बत्तीस बिटी भिंती अन् आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात कंटाळा भरून राहिलेला असतो मख्खपणे त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्‍यात स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे यंत्रांच्या आधाराने या एकविसाव्या श

" हे असे चालायचेच!! "

निनाव ·

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

निनाव 19/07/2013 - 02:24
मि . का. नक्कीच! तुमचे आशिष असेच असू द्यावे ! आपला विनम्र निनाव

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

निनाव 19/07/2013 - 02:24
मि . का. नक्कीच! तुमचे आशिष असेच असू द्यावे ! आपला विनम्र निनाव
लेखनविषय:
काव्यरस
बोललो न मी काही न काही होते बोलायचे न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे! गाव आले , प्रवास थांबले न होते काही आठवायचे ओझे अवघड घेऊन सोबत न होते कुणास शोधायचे ! काठा सोबत, काठ शोधत , न होते परतायचे थांबवून सावलीस मागे, सोबत न होते न्यायचे ! तरी काही आलेच सोबत, न होते माझे नाव ते मग तोच म्हणाला , जाउदे 'निनाव' हे असे चालायचेच !! बोललो न मी काही न काही होते बोलायचे न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!

राते- हिंदी रचना आणि भावानुवाद

मिसळलेला काव्यप्रेमी ·

चाणक्य 15/07/2013 - 12:26
खरंतर, त्याचा भावानुवाद माझ्या मूळ रचनेपेक्षा सुंदर झाला आहे.
काहिही....आपण किती नम्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न! (ह.घे.वे.सां.न.ल)

सुधीर 16/07/2013 - 13:21
यावेळी हिंदी मधला शब्दसंग्रह अपुरा पडल्याने मराठी जास्त आवडली. शब्दार्थ दिले नसते तर पंचायत झाली असती.

पैसा 16/07/2013 - 15:30
पण यात हिंदीपेक्षा ऊर्दू शब्द जास्त आहेत वाटतं!

चिगो 19/07/2013 - 13:27
मिका, हिंदी कविता सुंदर. चाणक्य ह्यांची गजलही सुंदरच.. माफ करा. मला कवितेतलं फार काही कळत नाही, पण ही गजल तुमच्या कवितेचा भावानुवाद म्हणण्यापेक्षा तीवरुन सुचलेली, स्फुरलेली आहे आहे असं मला वाटतं. दोन्हीमधले 'नुआंसेस' (मराठी?) खुप वेगवेगळे आहेत..

ढिश्क्लेमरः जिंदगी जम चुकी है च्या वेळेस झाला तसा गोंधळ होऊ न देता या वेळेस मी सरळ चाणक्यलाच गळ घातली. म्हटले बाबा रे, ते अनुवाद, भावानुवाद काय मला जमत नाही ते तूच कर, तुला ते भन्नाट जमते. आणि त्याने माझ्या प्रेमाखातर केले त्यासाठी त्याला धन्यवाद देऊन त्याचा अपमान कसा करु?