<बद्ध लेखक>
लेखनविषय:
- Read more about
- 16 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रेरणा
इवलं -इवलं ठावं रोज पाडी लेख
उत्तरं सोपी कुणा देईचिना
आपली ती तंगडी दरवेळी वरती
किती पडलो तेही आठवेना
टाकतो त्या जिलब्या, ज्ञानाचा देखावा
रेग्युलरली जिणे काही झेपेचिना
वेळेची ती त्यक्ती कामाचा कंटाळा
डेडलाईनी काही केल्या चुकेचिना
एकहार्ट पैसा काल रोब मरून
सांगतोय काय नक्की कळेचिना
अचाट अध्यात्म, पुचाट विचार
जगतो ते लिहितो कोणा पटेचिना
उपप्रतिसादी ओशट या जिलब्या
लेख झाला जुना तरी संपेचिना
वाचकाचा खात्मा, बद्ध हा लेखक
आपटली डोकी, तरी थांबेचिना