मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

दुष्काळी शेतकऱ्याचे मनोगत ...

अमितसांगली ·
भिखेची तिजोरी, पैशाचा तुटवडा जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... निसर्गाची साथ नाही, नशिबाचा हात नाही, दुष्काळाची अवकृपा पाठ काही सोडत नाही, थकलेल्या हातांनी या, करू कसा सामना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... उसालाही दर नाही, कापसालाही भाव नाही, दोन वेळच्या अन्नाची पण, सोय काही होत नाही, हरलेल्या जीवाचा या, प्राण काही जाईना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... प्याकेजच्या नावाखाली केला विकासाचा भास, मतांचे राजकारणच फक्त, यांच्यासाठी खास जीवघेण्या या राज्यात, कोंडतोय माझा श्वास, नाही राहिली आता मला, कशाचीच आस, दारिद्र्याचे चटके आता, काही केल्या सोसेना, जीव घे रे

अंगणात बाप, दारात माय,

ज्ञानोबाचे पैजार ·
अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय

सुप्रभात .. शुभ रजनी ...

विदेश ·
सुप्रभात .. शुभ रजनी ... कशासाठी दोस्त ? अफजलगुरू कसाब मजेत मस्त आपण महागाईने नेहमीच त्रस्त गृहिणी टंचाईत नित्य चिंताग्रस्त सामान्यांची स्वप्ने धुळीत उध्वस्त नेतेमंडळीचे दौरे कायम जबरदस्त जनतेची कमाई दलालाकडून फस्त सभागृह नेहमी गोंधळातच व्यस्त गुड मॉर्निंग... गुड नाईट... कशासाठी दोस्त ? "

(एक चारोळी)

कुंदन ·
श्रेय : दोन चारोळ्या - http://www.misalpav.com/node/21589 ओळखीच्या पाणवठ्यावर रात्रभर, पिउन जाई राजकुमार ! दिसतो जरी रुबाबदार, पितो मात्र उधारीवर !!

पानी आनाया जावू कशी

पाषाणभेद ·
पानी आनाया जावू कशी हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ|| दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया? आगं विहीर कोरडी, हापसा तुटका नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१|| दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी?

( नको देव राया , राज्यसभा पाहू )

अमोल केळकर ·
आमच्या देवाला , राज्यसभेवर न जाण्यासाठी ही प्रेमळ विनंती :) ------------------------------------------------------------------------------------------------ नको देव राया , राज्यसभा पाहू ! खेळ हा सर्वथा , जाऊ पाहे ! विश्वकप पुढचं, बाकी आहे येणे ! तूला काय जाहले, अरे देवा ! तुजविण कोण न दिसे संघातुनी ! पळू लागे धोनी, घरीबाई ! निवृतीची आस, दिसते आम्हास ! घेई जहिरात आपुल्या कवेत !! -------------------------------------------------------------------------- मुळ गाणे - नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सवर्था, जाऊ पाहे हिरणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले मजलागी जाहले तैसे देवा तुजविण ठाव न

मी बघत बसतोय माझ्या मुलाकडे ....!!..

प्रकाश१११ ·
तो माझे बोट धरून चालत असतो शाळेचा रस्ता माझ्या घराजवळच आहे त्याची शाळा रस्ता वळला की लगेच दिसू लागते त्याची शाळा जशी शाळा जवळ येते तशी त्याची पकड घट्ट होते माझ्या बोटांची थरथर जाणवते त्याच्या बोटांची माझ्या बोटांना मी पण माझ्या हाताची पकड घट्ट करतो त्याच्या चिमुकल्या पंजाची नि अलगद सोडून देतो त्याला त्या घनगर्द जनअरण्यात पाण्यात ढकलले की प्रथम जसे घाबरायला होते तसा तो बिचकून जातो मग कोणी मित्र भेटला की त्याचा हात धरून हलकेच मला टाटा करतो रात्री अगदी घट्ट बिलगून झोपतो मी बघत बसतो त्याच्याकडे त्याच्या पापण्याची कधीतरी दिसते फडफड नि त्याच्या बोटांची घट्ट पकड माझ्या बोटाना जाणवत अ

मोहोळ

जयवी ·
आठवणींचं मोहोळ आज फुटलं फिरुन सयी छळती जीवाला डंख मारुन मारुन जखमा जुन्या पुराण्या पुन्हा नव्याने सलती भळाभळा लागे वाहू जरी खपली वरती कधी आसूड शब्दांचे गेले कातडी सोलून कधी कुणी फसविले गळा केसाने कापून घाव वर्मावर झाले काही काळजाच्या पार परी दुखावून गेले सग्या सोयर्‍याचे वार सार्‍या कटू आठवांचे येई मळभ दाटून होई चित्त सैरभैर राही काळोख भरुन ओझे झाले पापण्यांना काळ्या सावळ्या ढगांचे कोसळे झडझडून मन ऋणी आसवांचे जयश्री

दुष्काळाच्या झळा

पाषाणभेद ·
दुष्काळाच्या झळा दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा डाळींबाचे होवूनी हाल द्राक्षबाग ती उखडली गहू होणे दुरच होते मान मोडून बाजरी पडली कुठून आणावे पाणी विहीर तर सुकली बांधावरची जुनी बाभूळ आताशा वठली कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई कसे जगावे कळेना कसे जगवावे न उमजेना दुष्काळाने मन कोरडे पण पाणी येई डोळा पुर्वप्रकाशित - पाषाणभेद

तुझी आठवण येते....

रसप ·
"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ९०" मधील माझा सहभाग - भिजऱ्या पाउलवाटा आणिक टपटप गळती पाने दरवळ मृद्गंधाचा पाणी खळखळ झुळझुळवाणे हळवी रिमझिम अंगणवेडी ठाव मनाचा घेते धुंद लाघवी संध्याकाळी तुझी आठवण येते मोत्यांनी चमचम करणारी हरिततृणांची पाती सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते नवी पालवी बघुन कोवळी तुझी आठवण येते ओली वाळू फसफस लाटा अनवाणी पाऊले भुरभुर पाऊस नकळत भिजवे थेंब-थेंब ओघळे डबडबल्या डोळ्यातुन कविता गालावरून झरते लोभसवाण्या कातरवेळी तुझी आठवण येते चिंब चिंब तू चिंब चिंब मी आसमंत भिजलेला गोजिरवाणा शब्द मनाचा ओठांवर थिजलेला दोघां